शिवसेना सर्व धर्मांचा सन्मान करते व हाच आमचा संस्कार आहे. जोपर्यंत धर्माची फालतू मिजास कोणी दाखवत नाही तोपर्यंत आम्हाला काहीच घेणेदेणे नाही. ज्याने त्याने आपापला धर्म घरात व मनात सांभाळावा. श्रद्धांचा विषय व्यक्तिगत आहे, पण त्याचा असा राजकीय बाजार करून शिवसेनेस बदनाम करण्याचा प्रयत्न होणार असेल तर मात्र गाठ आमच्याशी आहे.
महाराष्ट्र सदनातील बेबंदशाही
गाठ आमच्याशी आहे!
भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय खासदार किरीट सोमय्या यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील भ्रष्टाचार सर्वप्रथम चव्हाट्यावर आणला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच. सोमय्या यांनी नव्या महाराष्ट्र सदनाच्या निर्मितीत कुणा मंत्र्याचे व अधिकार्याचे खिसे गरम झाले ते पुराव्यासह समोर आणले, पण इतका अतिरेकी खर्च होऊनही दिल्लीतील महाराष्ट्र सदनात ‘महाराष्ट्र’ व मराठीपण कोठेच दिसत नाही. तेथे मराठी माणसाला हक्काने पाय ठेवता येत नाही. महाराष्ट्रातून नव्याने निवडून गेलेल्या खासदारांचा मुक्काम सध्या नव्या महाराष्ट्र सदनात आहे व गेल्या महिनाभरापासून त्यांची अवस्था ‘गोठा’ बरा, पण या ‘सदनी’ राहणे नको अशीच झाली आहे. पिण्याचे पाणी नाही, स्वच्छता नाही, कॅण्टीनची धड व्यवस्था नाही. हा सर्व मनस्ताप रोकडा पैसा मोजून विकत घ्यावा लागत असेल तर संतापाचा भडका उडणारच. तसा तो उडाला आहे. मात्र या भडक्यास राजकीय व धार्मिक रंग देऊन वणवा पेटविण्याचा प्रयत्न महाराष्ट्राच्या मंत्रालयातून होत आहे. शिवसेना-भाजपचे खासदार आणखी महिना-दोन महिने नव्या सदनात राहतील व त्यांना संसदेकडून ‘घरे’ मिळाली की निघून जातील, पण महाराष्ट्र सदनात जो गैरव्यवहार, गैरप्रकार चालला आहे तो तसाच ठेवायचा काय? मराठी माणसाला दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या उंबरठ्याबाहेर ठेवण्याचे कारस्थान तसेच चालू द्यायचे काय, हा खरा प्रश्न आहे. या बेबंदशाहीविरुद्ध आवाज उठवणे हा जर अपराध असेल तर होय, हा अपराध आमच्या मर्दांनी दिल्लीत केला आहे. दिल्लीत महाराष्ट्राचा अपमान होतो हा इतिहास आहे, पण
महाराष्ट्र सदनात घुसलेले ‘उपरे’
मराठी माणसाला तुच्छ समजणार असतील तर हा अपमान शिवसेना सहन करणार नाही. शिवसेना खासदारांनी नव्या महाराष्ट्र सदनातील बजबजपुरीविरोधात हिमतीने आवाज उठविला. ही अरेरावी नसून एक आंदोलन आहे. कॅण्टीनचा ठेकेदार रोकडा पैसा मोजूनही जेवण नावाचा प्रकार, खासकरून ‘प्रयत्न’ करूनही न तुटणार्या ‘रबरी’ चपात्या खायला घालतो. या चपात्यांचा बोळा खरे तर राज्याचे मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री, मुख्य सचिव व दिल्लीत महाराष्ट्राचे म्हणून जे ‘कमिशनर’ बसले आहेत त्या बिपीन मलिकच्या तोंडात कोंबायला हवा, पण कॅटरिंग ठेकेदाराच्या तोंडाशी ही चपाती नेऊन ‘बाबारे, आम्ही जे कदान्न खातोय ते तू खाऊन दाखव’, असे जरा जोरात सांगितले म्हणून नसता गहजब कशाला? आता हा जो कोणी ठेकेदार आहे तो कोणत्या धर्माचा, पंथांचा, जातीचा आहे हे काय त्याच्या कपाळावर लिहून ठेवले होते? पण तो निघाला मुस्लिम बांधव. त्याचा म्हणे उपवास सुरू होता व शिवसैनिकांनी एका मुस्लिमाचा ‘रोजा’ तोडण्याचा प्रयत्न केल्याच्या ‘खबरा’ दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातून व मुंबईच्या मंत्रालयातून पद्धतशीर पेरल्या गेल्या. पुन्हा महाराष्ट्र सदनातील या नसत्या वादाला फोडणी देणारी मीडिया काय किंवा त्यावरून संसदेत घसा फुटेस्तोवर बोंब मारणारे मतलबी राजकारणी काय, या मंडळींना अफगाणिस्तानातील एका मौलवीने पवित्र रमजानच्याच काळात दहा वर्षांच्या चिमुरडीवर मशिदीतच केलेला बलात्कार दिसत नाही. त्यावर ना मीडिया तोंड उघडते, ना संसदेत प्रश्न उपस्थित केला जातो, ना भावना दुखावल्याची ओरड होते. बंगळुरू येथील एका मुस्लिम शिक्षकाने रोजा असताना शाळेतच लहान मुलीवर बलात्कार केल्याची घटनाही नुकतीच घडली आहे. त्याबाबतही ना मीडिया तोंड उघडते ना स्वार्थी राजकारणी. एका चपातीवरून विनाकारण गदारोळ का घातला जातो आणि रमजानच्या पवित्र महिन्यात काही विकृत मुस्लिमांकडून झालेल्या बलात्काराबद्दल ओरड का केली जात नाही हे लोकांनाही समजते. मीडियावाले आणि भंपक राजकीय पक्ष-नेत्यांना
रेप चालतो, पण चपाती चालत नाही
असाच त्याचा अर्थ. हा नीचपणाचा कळसच म्हणावा लागेल. महाराष्ट्र सदनातील भ्रष्टाचार व बजबजपुरी दाबण्यासाठी असे राजकारण करणारे व त्यास धार्मिक रंग देणारे स्वत:च्याच हाताने स्वत:साठी मोठा खड्डा खणत आहेत. त्या खड्ड्यात या कॉंग्रेसवाल्यांना कायमचे गाडून त्यावर माती टाकण्याचे काम महाराष्ट्राची जनता उद्या नक्कीच करणार आहे. शिवसेना सर्व धर्मांचा सन्मान करते व हाच आमचा संस्कार आहे. जोपर्यंत धर्माची फालतू मिजास कोणी दाखवत नाही तोपर्यंत आम्हाला काहीच घेणेदेणे नाही. ज्याने त्याने आपापला धर्म घरात व मनात सांभाळावा. श्रद्धांचा विषय व्यक्तिगत आहे, पण त्याचा असा राजकीय बाजार करून शिवसेनेस बदनाम करण्याचा प्रयत्न होणार असेल तर मात्र गाठ आमच्याशी आहे. दिल्लीतील नवे महाराष्ट्र सदन हा नक्की कुणाचा खासगी अड्डा झाला आहे? पुन्हा हा अड्डा बनविणार्या बिपीन मलिकला राज्याचे मुख्यमंत्री ‘प्रेयसी’प्रमाणे मांडीवर घेऊन बसतात. हा मराठी माणसाचा अपमान आहे. इतके मराठी खासदार दिल्लीत आवाज उठवतात. त्याची साधी दखल राज्याचे मुख्यमंत्री व मुख्य सचिव घेत नाहीत व संपूर्ण प्रकरणास ‘धार्मिक’ वळण देण्याचे ‘बायकी’ प्रयोग करतात. हा प्रकार महाराष्ट्राच्या इभ्रतीवर लांच्छन आणणारा आहे. लोकसभा निवडणुकीत याच राजकारणावर राज्याची मराठी जनता थुंकली आहे, तरीही यांना ना लाज ना लज्जा. आज जे कोणी स्वत:च्या भानगडी लपविण्यासाठी नव्या महाराष्ट्र सदनात धर्माचे राजकारण करीत आहेत, त्यांना एकच इशारा शेवटी देत आहोत, उद्याची महाराष्ट्राची राज्यकर्ती शिवसेना आहे हे त्यांनी विसरू नये!
No comments:
Post a Comment