Total Pageviews

Tuesday, 29 July 2014

STOPPING TERROR ATTACKS IN INDIA

दहशतवादी हल्ले कसे थांबवावे:भाग १ दहशतवाद थांबवण्यासाठी आर्थिक नाड्या आवळणे जरुरी: हिवाळ्यापूर्वीच भारतामध्ये घुसखोरी करण्याच्या इराद्याने १५० ते २०० अतिरेकी हे सीमेपलीकडील छावण्यात दबा धरून बसले असल्याचा गौप्यस्फोट लेफ्टनंट जनरल के.एच सिंग यांनी कारगिल विजय दिवसाला पंधरा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ते नाग्रोटा येथील मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात केला. पाकिस्तानने जो गोळीबार केला व दोन महिन्यांत अखनूर येथे दोन हल्ले झाले, त्याला पुरेसे प्रत्युत्तर देण्यात आले असे ते म्हणाले. त्यात अनेक अतिरेकी मारले गेले आहेत. गाझा हल्ल्यांचा आम्ही बदला घेऊ! १९९३ साली आम्हाला पकडण्यात तुम्हाला यश मिळाले. आता तुम्ही आम्हाला पकडून दाखवा, अशा धमकीचे पत्र पोलिस आयुक्त राकेश मारिया यांना शुक्रवारी मिळाले .पत्राची सत्यता पडताळून पाहण्यात येत असून, शहरात हाय अॅलर्ट घोषित केला आहे. पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मिळालेल्या या पत्रात गाझा पट्टीत सुरू असलेल्या हल्ल्यांचा संदर्भ देत, आम्ही त्याचा बदला घेऊ, असे म्हटले आहे. हिंदी आणी इंग्रजीत हे पत्र लिहिण्यात आले असून, पोस्टाद्वारे ते पोलिसांना मिळाले.ईद व आगामी सण पाहता शहरात सुरक्षा व्यवस्था चोख राहील याची काळजी घेण्यात येत आहे. नागरिकांना कुठलीही माहिती मिळल्यास ती पोलिसांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहनही राकेश मारियानी केले आहे. पुण्यात ऐन वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या तपासाचे आव्हान उभे असतानाच कल्याणमधील चार तरुण इराकमध्ये दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याच्या वृत्ताने एकच खळबळ माजली. या चौघांच्या कुटुंबीयांनी या वृत्ताचा इन्कार केला. आता या प्रकरणातील नेमके तथ्य समोर आणण्याचे नवे आव्हान तपास यंत्रणांसमोर उभे आहे. अनेक वर्षांपासून ठाणे जिल्ह्यातील १५ ते ३५ वर्षे वयोगटातील काही तरुण हरवले आहे.कल्याणमधील चार तरुण इराकमध्ये 'आय‌ एसआय‌कएस'मध्ये कार्यरत असल्याची धक्कादायक बाब त्यांच्या पालकांनी तक्रार केल्यानंतर उघड झाली. यामुळे दहशतवादी तसेच कट्टर धर्मांध गटांकडून तरुणांवर होणारे स्लो पॉयझनिंगचे प्रयोग वर प्रकाश पडला आहे. आता त्याच्या सामाजिक पार्श्वभूमीचा अभ्यास करावा ला्गेल. बेपत्ता तरुणांचा डेटाबेस तयार करून तो एनआयएकडे जमा केला पाहीजे. कट्टर धर्मांधता, त्यातून आलेला देशाबद्दलचा अनादर, देशद्रोही घटना याविषयी गुप्तवार्ता, 'एखाद्या विशिष्ट जातीधर्मातील व भागातील तरुण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी त्यांच्या पालकांनी नोंदविल्यानंतर त्यांच्या ठावठिकाण्याविषयी, पाठपुराव्याविषयी काही काळेबेरे होते का, हे पोलिसांनी तपासायला हवे,' नव्या तरूणांची दहशतवादासाठी भरती पुण्यात कोंढबा भागात जिहादी गटांना मदत करणारे काही लोक आहेत.बीड, औरंगाबाद आणि आता कल्याण , ठाणे , मुंबई या भागात जिहादी विचारांशी सबंधित गट आहेत आणि ते नव्या तरूणाना आपल्या गटात आणण्यासाठी प्रयत्न करतात. रियाज भटकळ आणि त्याचा भाऊ हे कर्नाटकातील भटकळचे तसेच सध्या कारावासात असलेला मुंबईवरील हल्ल्याचा एक सूत्रधार अतिरेकी हा बीडचा आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून अशा कारवायंमध्ये भरती केली जात आहे आणि छुपेपणाने ते काम सुरु आहे. बेपत्ता होणारी मुले गुन्हेगारीकडे वळवली जात असतील तर राज्यासाठी ती धोकादायक बाब म्हणावी लागेल. मुले बेपत्ता का होतात? त्यामागील कारणे नेमकी काय असावीत? याचाही शोध घेणे आवश्यक आहे. तरुण मने कोवळी असतात. थोड्याशा कारणाने ती नाराज होतात. मुलांचे संगोपन करताना सतर्कता बाळगली पाहिजे. पालकांकडून मुलांचे अवास्तव लाड व त्यांच्याकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष याला कारणीभूत आहे का? बेपत्ता मुले का सापडत नाहीत? यात पोलीस यंत्रणा कमी पडते का? सुरक्षा यंत्रणांनीही अधिक सतर्कता बाळगून मुले बेपत्ता होण्याच्या प्रकारांचा छडा लावला पाहिजे. यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याबाबत गृहविभाग विचार करेल का? दहशतवादी बनविण्यापूर्वी ब्रेनवॉशिंग 'ब्रेनवॉशिंग करून दहशतवादी बनविण्यापूर्वी किंवा इराकला नेण्यापूर्वी एखाद्या शहरात, गावात एखादी 'जमात' उतरते, आठवडाभरात ते प्रवचने वगैरे आयोजित करतात आणि विशिष्ट घरांमधील मुलांना लक्ष्य करतात. त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी घेतात. मुलगा ताब्यात आला की त्याचे ब्रेनवॉशिंग सुरू होते. ही प्रक्रिया कित्येक वर्षे चालते. कल्याणमधून गायब झालेल्या चार तरुणांना इराकला जाण्यासाठी पैसे कुठून आले तसेच त्यांना कट्टरवादी बनवण्यामध्ये कोणाचा हात आहे, याचा तपास व्हायला हवा. आठवड्याच्या धार्मिक यात्रेसाठी गेलेल्या या चार तरुणांनी प्रत्येकी ५९ हजार ७८६ रुपये रोख मोजले होते. इराकमधील धार्मिक स्थळांना भेट देणारी ही यात्रा होती. यात्रेदरम्यान ३१ मे रोजी टॅक्सी पकडून हे चारही तरुण करबाला भेटीनंतर मोसूलला गेले. मोसूलला गेल्यानंतर इ.स्लामिक स्टेट इन इराक अँड सिरिया (आयसिस) संघटनेने मोसूल ताब्यात घेतले असावे. पंधरा हजारावर मुले बेपत्ता कल्याणमधून बेपत्ता झालेली चार मुले इराकमधील दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्रातून मुले हरवण्याचे, बेपत्ता होण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. याबाबतची सरकारी आकडेवारी थक्क करणारी आहे. २०११ ते २०१३ या तीन वर्षांत राज्यातून बेपत्ता झालेल्या अठरा वर्षांखालील मुलांची संख्या पंधरा हजारावर पोहोचली आहे. न सापडलेल्या मुलांचे प्रमाण धक्कादायक आहे. शोध न लागलेल्या मुलांची संख्या तेरा हजारांहून अधिक आहे. मुलांचे पालक तसेच पोलीस यंत्रणेने शोध घेऊनही ती सापडलेली नाहीत. पैसा सौदी अरेबियासारख्या इस्लामी देशांकडून दहशतवादी संघटनांसाठी पैसा सौदी अरेबियासारख्या श्रीमंत , इस्लामी देशांकडून पुरविला जातो.त्याना जागतिक काळ्या बाजारात हत्यारे मिळतात. दारीद्रयात जगणार्या भाडोत्री म्हणून मर्सिनरी- मारेकरी - जिहादी भरती केले जातात.अल्पवयात हातात बंदूक आलेली आणि हाणामार्या करण्यापलिकडे दुसरे काहीच येत नाही अशी हजारो तरूणांची फौज या पैशाच्या बळावर तयार केली जाते.अफगाणिस्तान, इराक, इराण , सिरिया आदि देशांमध्ये अशी फौज तयार आहे.पाकिस्तानमध्ये अल कायदा आणि तालिबानचे जिहादी तयार होतात व आसरा घेऊन रहात आहेत. जिहादचे हे सारे जागतिक संदर्भ असले तरी भारतातहि त्याचा शिरकाव होतो आहे . त्यात सुशिक्षित तरूण सहभागी होत आहेत.इंटरनेटच्या माध्यमातून जिहादचा प्रसार चालला आहे. आता देशाविषयी आत्मियताही नाहीशी होऊ लागली आहे. या संघटना पद्धतशीर प्रचाराद्वारे तरुणांच्या मनात देशाविषयी व येथील व्यवस्थेविषयी चीड निर्माण करत आहेत. ते प्रमाण मानून तरुण दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होण्यास तयार होत आहेत. त्यामागे सूड भावनाच अधिक प्रमाणात आढळते. अलीकडे करण्यात आलेल्या कारवायांमध्ये अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. अशा परिस्थितीत नवीन तरुणांची भरती करून त्यांना प्रशिक्षित करून सार्मथ्य वाढवण्याचा दहशतवादी संघटनांचा प्रयत्न आहे.तेव्हा समाजातील सर्वच स्तरातील राष्ट्रप्रेमी नागरिकानी या हालचालींवर नजर ठेवली पाहिजे. चुकीच्या मार्गाने जाणार्या तरूणाना रोखा भारतात राहणार्या पाकिस्तान धार्जिण्यांकडून दहशतवादी कारवायांना पाठबळ मिळते. या लोकांना दहशतवादी कारवायांसाठी पैसा आणि प्रेरणा दिली जाते. अर्थात, यात प्रेरणेपेक्षाही पैशाचा भाग महत्त्वाचा ठरतो. एखाद्या सामान्य, गरिब व्यक्तीला अशा कारवाईसाठी १0 लाख ते २0 लाख रुपये मिळणार असतील तर ती त्याच्यासाठी बरीच मोठी रक्कम असते. या रकमेतून त्याच्या कुटुंबीयांना काही काळ आर्थिक दिलासा मिळू शकतो. शिवाय अशा व्यक्तींचा दहशतवादी कारवायांदरम्यान मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबीयांना मोठी रक्कम दिली जाते. या आमिषापोटी दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होणार्यांाची संख्या वाढत आहे. अलीकडे दहशतवाद्यांना अतिरेकी संघटनांकडून नियमित वेतन दिले जात आहे आणि त्याची रक्कम सरकारी अधिकार्यातला मिळणार्याि वेतनापेक्षा किती तरी अधिक आहे. थोडक्यात, जिहादी तत्त्वज्ञानाला भुलून अशा कामासाठी येणार्यांयची संख्या मोजकीच आहे. बाकी सारे भरपूर पैसा मिळतो, आपल्या आणि कुटुंबीयांच्या सर्व गरजा भागतात याच विचाराने दहशतवादी कारवायांसाठी तयार होतात. ही बाब विचारात घेता अशा व्यक्तींना मिळणार्याव मोठय़ा प्रमाणावरील आर्थिक मदतीवर कसे नियंत्रण आणायचे याचा विचार गरजेचा ठरणार आहे. या आर्थिक नाड्या आवळायच्या तर अन्य देशांमधून येणार्या पैशांवर लक्ष ठेवले जायला हवे. त्याच बरोबर दहशतवादी संघटनांच्या जाळय़ात येथील तरुण अडकणार नाहीत याचीही काळजी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. दहशतवाद्यांना राहायला जागा देणारे आणि त्यांना पैसा पुरवणारे यांच्यावरही कठोर कारवाई झाली पाहिजे. दहशतवाद्यांपेक्षा त्यांना मदत करणारे जास्त मोठे गुन्हेगार असतात. हे लक्षात घेऊन पुढे पाऊले उचलली पाहिजेत. तरच असे हल्ले थांबवता येतील.

No comments:

Post a Comment