Total Pageviews

Thursday, 24 July 2014

ATTACK ON AMARNATH YATRA IN KASHMIR

सध्या जम्मूमध्ये चिघळणारा प्रश्न म्हणजे अमरनाथ यात्रेत धर्मांधांनी घातलेला धुमाकूळ ! क्षुल्लक कारणावरून लंगर चालवणारे हिंदू आणि घोडेवाले मुसलमान यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर धर्मांधांनी हिंदु यात्रेकरूंचे ११० तंबू जाळले. १५ लंगरच्या संपत्तीची तोडफोड केली. १५० गॅस सिलिंडर पेटवले. अनेक सिलिंडरचे स्फोट केले. अद्यापपर्यंत एकूण १ कोटी रुपयांची हानी धर्मांधांनी केली आहे. हे सर्व पहाता ही क्षुल्लक कारणावरून झालेली किरकोळ मारामारी आहे कि धर्मांधांनी हिंदूंवर केलेले पूर्वनियोजित आक्रमण होते, हे आता निराळे सांगायला नको. हिंदूंच्या यात्रेवर किंवा धार्मिक कार्यक्रमांवर आक्रमण होणे, ही तशी नवीन गोष्ट नाही. अमरनाथ यात्रा तर आतंकवादी आक्रमणांच्या भीतीच्या सावटाखालीच पार पाडावी लागते. वास्तविक देशभरातील हिंदू जम्मूतील अत्यंत प्रतिकूल वातावरणाला तोंड देत मोठ्या श्रद्धेने अमरनाथ येथील शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी येतात. वर्षभरातील केवळ ४६ दिवस चालणार्या या यात्रेतील भाविकांना कोणते अनुदान देणे, तर दूरच शासन सुरक्षाही पुरवत नाही. त्यामुळेच येथे होणार्या आक्रमणांमध्ये वाढच होत आहे. यात्रेवरील जिहादी सावट या आक्रमणांमुळे श्री अमरनाथ श्राईन बोर्डाने अमरनाथ यात्रेत सहभागी होणार्या यात्रेकरूंना विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. वर्ष २०१० मध्ये केवळ मार्गावर होणार्या अपघातांसाठीच हा विमा लागू करण्यात आला होता. आता तो मानवी आक्रमणे, तसेच जम्मू राज्यात अन्यत्र झालेले अपघात यांसाठीही लागू करण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्ती किंवा अपघात यांसारख्या घटना सोडल्या, तर अत्यंत निरपेक्ष वृत्तीने देवदर्शनासाठी जाणार्या भाविकांना विमा संरक्षण द्यावे लागण्याची आवश्यकता का निर्माण झाली, याचा विचार सर्वांकडून होणे अपेक्षित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून धर्मांधांनी अमरनाथ यात्रेला विरोध केला आहे. ख्रिस्ताब्द २०११ मध्ये अमरनाथ यात्रेचा कालावधी अल्प करण्याची मागणीही करण्यात आली होती. त्यानुसार तो कालावधी ६० दिवसांवरून ४६ दिवस करण्यात आला होता. आता आक्रमणे करून हिंदूंनी तेथे यात्रेसाठी येऊच नये, अशी तजवीज केली जात आहे. हिंदू यात्रेकरूंची अशी फरफट होण्याला जम्मू-काश्मीरचे ओमर अब्दुल्ला शासनच उत्तरदायी आहे. अब्दुल्ला यांच्या धर्मांधतेमुळेच तेथे गेलेल्या हिंदूंना संरक्षण मिळणे दुरापास्त झाले आहे. गेले तीन दिवस इतके मोठे आक्रमण होऊनही अब्दुल्ला शासनाने चौकशीसाठी अधिकारी नेमण्याव्यतिरिक्त काहीही केलेले नाही. अमरनाथसारखेच आक्रमण हज यात्रेकरूंवर झाले असते, तर अब्दुल्ला शासनाने हीच भूमिका घेतली असती का ? हिंदुद्रोही प्रसारमाध्यमे हिंदूंची मोठ्या प्रमाणावर हानी होऊनही आणि ६० हून अधिक यात्रेकरू घायाळ होऊनही भारतभरातील प्रसारमाध्यमांना ती बातमी वाटत नाही, ही हिंदूंची आणखी एक शोकांतिका आहे. इतर वेळी हिंदु आतंकवाद म्हणून चर्चा झोडणारे तथाकथित निधर्मी पत्रकार, संपादक, निवेदक आता कुठे आहेत ? भारतभरातील मोजकी वृत्तपत्रे सोडता कोणालाच या घटनेला यथायोग्य प्रसिद्धी द्यावी वाटली नाही. मानवाधिकारवाल्यांनाही त्या यात्रेकरूंसाठी काही करावे वाटले नाही. निधर्मी किंबहुना धर्मांध राजकारणी, हिंदुद्रोही प्रसारमाध्यमे आणि केवळ अल्पसंख्यांकांच्या हिताचे रक्षण करणारे मानवाधिकारवाले यांच्या अभद्र युतीमुळेच ही स्थिती निर्माण झालेली आहे. हिंदूंनी जागृत होण्याची आवश्यकता मक्केला जाणार्या मुसलमानांवर आक्रमण, अशी कधी बातमी येते का ? चुकून कधी असे झाले असतेच तर 'इस्लाम खतरे में' असे म्हणत देशभर दंगली उसळल्या असत्या. राष्ट्रीय संपत्तीची हानी झाली असती. जनजीवन विस्कळीत झाले असते. आता हिंदू पीडित असतांना मात्र यातील काहीच होतांना दिसत नाही. इतकी हानी होऊनही त्याचा प्रतिकार करण्याची हिंदूंची मानसिकता का होत नाही, ही बाब शोचनिय आहे. हिंदूंच्या मतांवर निवडून आलेला भाजप, बलाढ्य हिंदुत्ववादी संघटना या प्रश्नावर काय कृती करत आहेत ? अमरनाथ हे हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. तेथे जाऊन भगवान शिवाची उपासना करणे, हा हिंदूंचा धार्मिक अधिकार आहे, हे लक्षात घेऊन हिंदूंनी आता धडाडीने आणि संघटितपणे पुढे जायला हवे. बालताल मार्गावर जे काही घडले, याविषयी आताच तेथील अब्दुल्ला शासनाला खडसवले, तर हिंदूंची पुढील यात्रा सुरक्षित होईल. श्रावण पौर्णिमेला अमरनाथ येथे मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जातो, त्यासाठी तेथे अनेक हिंदू एकत्र येतात. त्या उत्सवाच्या निमित्ताने लक्षावधी हिंदूंच्या मुखातून हिंदूंच्या यात्रांवर होणार्या आक्रमणांचा निषेध व्हायला हवा. त्यांनी सर्वांनी मिळून आपापल्या राज्यांत होणारी अशी लहान-मोठी आक्रमणे परतवण्यासाठी किंबहुना आक्रमणे होऊच नयेत, यासाठी कृतीशील होण्याची शपथ बाबा अमरनाथाच्या साक्षीने घ्यावी, तरच पुढील अमरनाथ यात्रा सुकर होईल !

No comments:

Post a Comment