Total Pageviews

Saturday 26 July 2014

AKHILESH/ UP GOVT BUILDS MOSQUE AT DISPUTED SITE

मटा ऑनलाइन वृत्त । कादलपूर (ग्रेटर नोएडा) आयएएस अधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता, अनधिकृत मशिदीची जी भिंत पाडली होती, त्या जागेवर आता भव्य मशिद उभी राहिली आहे. सरकारच्या वरदहस्ताशिवाय हे शक्यच नसल्यानं, दुर्गाला बाजूला करून अखिलेश सरकारनं मुस्लिम तुष्टीकरणाचा आपला डाव साधल्याचंच बोललं जातंय. ग्रेटर नोएडाच्या प्रांताधिकारी असलेल्या दुर्गा शक्ती नागपाल यांनी गेल्या वर्षी २७ जुलै रोजी कादलपूर येथील निर्माणाधीन मशिदीची भिंत पाडण्याचे आदेश दिले होते. सरकारी जमिनीवर ही मशिद उभी राहत असल्यानं कर्तव्यदक्ष दुर्गानं ही धडक कारवाई केली होती. परंतु, यूपीतल्या वाळू माफियांना दिलेला दणका आणि नंतर मशिदीचं काम रोखण्याची हिंमत दाखवणं त्यांना महागात पडलं होतं. उत्तर प्रदेश सरकारनं त्यांची पाठराखण करण्याऐवजी, स्वतःचं हित लक्षात घेऊन त्यांना निलंबित केलं होतं. धार्मिक भावना भडकवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यावरून बरंच राजकारण रंगलं होतं, पण अखेर दुर्गाशक्तीपेक्षा माफियाशक्तीच वरचढ ठरली होती. दुर्गा शक्ती नागपाल यांचा अडथळा सरकारनं दूर केल्यानंतर, कादलपूर इथं त्याच सरकारी जमिनीवर मशिदीचं बांधकाम पुन्हा सुरू झालं होतं आणि आता बरोब्बर वर्षभरानंतर तिथं भव्य मशिद उभी राहिल्याचं समोर आलं आहे. आता तिथे प्लास्टर आणि रंगकाम शिल्लक राहिलंय. आश्चर्य म्हणजे या बांधकामाबाबत जिल्हा प्रशासन अनभिज्ञ आहे, किंवा ते तसं दाखवताहेत. कादलपूर गावात मशिदीचं काम सरकारी परवानगीनं होतंय की नाही, हे आपल्याला ठाऊक नसल्याचं गौतमबुद्ध नगरचे मॅजिस्ट्रेट ए वी राजामौली यांनी सांगितलं. एसडीएम बच्चू सिंह यांनीही या प्रकरणातून हात झटकले. आपल्या नियुक्तीआधी दहा महिने मशिदीचं काम झालं आहे, असं सांगून ते मोकळे झालेत. या सगळ्या उडवाउडवीमुळे यूपीतील अंदाधुंद प्रशासकीय कारभाराचंच पुन्हा दर्शन घडलं आहे. दुसरीकडे, सगळ्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन अखिलेश सरकारनं मुस्लिमांना मशिद भेट दिल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यावरून पुन्हा मोठा 'राडा' होण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment