IT HAS BEEN REPOTED THAT ALL GOVT OFFICERS ARE MISUSING GOVT PAID MANPOWER WHICH IS NOT AVAILABLE FOR PROTECTING COMMON MAN
शहरात दिवसेंदिवस होत असलेल्या घरफोडीच्या पाश्र्वभूमीवर ‘लोकमत’ने केलेले स्टिंग ऑपरेशन एक्सलंट असून, कामचुकार पोलिसांवर कडक कारवाई केली जाणार असल्याची प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केली.
शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आठ दिवसांपूर्वी शहरातील पोलीस ठाण्यातील अधिकार्यांची बैठक बोलावून त्यांची झाडाझडती घेतली होती. तसेच शहरातील घरफोडीच्या पाश्र्वभूमीवर सतर्क राहण्याचे आदेशही दिले होते. मात्र, या बैठकीच्या आदेशाचे पालन या अधिकार्यांकडून न झाल्याचे ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशनवरून दिसून येत आहे. रात्रीच्या वेळी शहरात गस्त न घालता पोलीस यावेळी काय करत होते. याबाबत चार दिवसांत पुन्हा पोलीस अधिकार्यांची बैठक घेऊन जाब विचारणार असल्याचे गृहराज्यमंत्री पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, शहरात घरफोडय़ांच्या पाश्र्वभूमीवर सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले होते. असे असताना काही पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी झोपले असल्याचे ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशनने स्पष्ट केले आहे. सेवेत कामचुकारपणा करणार्या पोलिसांची गय केली जाणार नाही. संबंधितांची माहिती घेऊन दोषींवर योग्य ती कारवाई करणार असल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख विजयसिंह जाधव यांनी सांगितले. दरम्यान, पंढरपूर येथील यात्रेनिमित्त वरिष्ठ अधिकार्यांसह दोनशे पोलीस बंदोबस्तासाठी गेले आहेत. दररोजची आंदोलने यामुळे पोलिसांना चोवीस तास डय़ुटी करावी लागत आहे. अशा वेळी काही पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी थोडा वेळ विश्रांती घेणार हे नाकारता येणार नाही. मात्र, पूर्ण वेळ सेवेत कामचुकारपणा करणार्या पोलिसांची गय केली जाणार नसल्याचे जाधव यांनी सांगितले.
वडिलांच्या दहाव्या दिवसासाठी आलेल्या दोन विवाहित मुलींवर त्यांची आई व इतर नातेवाईक महिलांसमोर बलात्कार करून दरोडा टाकण्याची नगर जिल्ह्यातील वीरगावच्या टेमगिरेवस्तीवरील घटना संतापजनक आहे. क्रौर्याचा हा कळस सुन्न करणारा आहे. महाराष्ट्राचे पुरोगामित्व लयास गेल्याचे निदर्शक असणारी ही घटना माणुसकीची अब्रू वेशीवर टांगणारी आहे. गरीब माणसाची सुरक्षितता धोक्यात आणणार्या या भयानक घटनेचा तातडीने तपास करून गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे. ज्यांच्यावर अमानुष अत्याचार झाले त्यांच्या पुनर्वसनासाठी लोकांनी पुढे आले पाहिजे. महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी केवळ घोषणाबाजी न करता सामान्य स्त्रियांना कोणत्या दहशतवादासाठी चिरडले गेले, याचा गंभीरपणे विचार आणि कृती केली पाहिजे. अत्यंत लाजिरवाण्या अशा या घटनेने राज्यकर्त्यांची झोप उडाली पाहिजे. विशिष्ट वस्तीवर मध्यरात्री जाऊन आया-बहिणींना विवस्त्र करून हैदोस घालण्याची हिम्मत कोठून आली याचाही छडा लावला पाहिजे. टेमगिरेवस्तीवर दरोडेखोरांनी ज्या पद्धतीने नंगानाच केला, त्याचे तपशील पाहता घटना पूर्वनियोजित असावी असे जाणवते. चाकू, कुर्हाडी, काठय़ांचा धाक दाखवून दोन विवाहित तरुणींवर ज्या नराधमांनी बलात्कार केला, त्यांना संबंधित परिसराची पुरेशी माहिती असणार हे उघड आहे. ज्याच्या पोटी आपण जन्माला आलो त्या वडिलांचे उत्तरकार्य करण्यासाठी आलेल्या मुलींवर जो आघात झालेला आहे, तो कधीही भरून येणारा नाही. कोणाला अटक केली आणि कोणाचा शोध सुरू आहे, यासारख्या निवेदनांनी त्यांचे मन सावरले जाणे कठीण आहे. अत्याचार झाल्यानंतर महिला पोलिसांची नियुक्ती करणे यात फारसे शहाणपण नाही. शस्त्रास्त्रे घेऊन वस्तीवर हल्ला चढविला जातो आणि पोलिसांना त्याची कल्पनाही नसते, ही गोष्ट महाराष्ट्राच्या सुरक्षिततेची लायकी स्पष्ट करणारी आहे. वयोवृद्ध महिलांना विवस्त्र करण्यापर्यंतचे वर्तन दरोडेखोरांनी केले याचा अर्थच पोलिसांचा धाक कोणत्या प्रकारचा आहे हे स्पष्ट करणारा आहे. एका महिलेच्या अंगावर थंडगार पाण्याचे दोन हंडे ओतण्याचे अमानुष काम ज्यांनी केले, त्यांना वेळेवर शिक्षा झाली पाहिजे. पुरावे कसे गायब केले जातात याचा अनुभव कोठेवाडी प्रकरणात आलेला होता. धान्याच्या पोत्यात अत्याचार झालेल्या मुलींना कोंबून ठेवण्याचे अमानुष काम कोणाच्या पाठबळावर केले हेही पुढे आले पाहिजे. विकृतीचा कळस केल्यानंतर दरोडेखोरांनी दशक्रिया विधीसाठी उसने आणलेले दहा हजार रुपये लुबाडले. संपूर्ण राज्यभर या घटनेचा निषेध होत असला तरीही यापुढे महाराष्ट्रात बायकांवर क्रौर्याची परिसीमा होणार नाही याची हमी कोण देणार? घटना घडल्यानंतर प्रारंभीच्या प्रतिक्रिया ओसरताच जो वेळकाढूपणा दिसतो तोही अमानुष ठरविला पाहिजे. ज्यांच्यावर अत्याचार झाले त्यांनाच अडथळ्यांची शर्यत भोगावी लागू नये या दृष्टीनेही प्रशासकीय यंत्रणेने काम केले पाहिजे. अनेकदा अशा विकृत आणि क्रूर घटनांनंतर राजकीय कार्यकर्त्यांचा आक्रमणपणा कायदेशीर प्रक्रियेत अडसर ठरू शकतो. त्यामुळे परिस्थिती हाताळताना वेळेचे भान ठेवून आणि माणुसकीची कदर बाळगून प्रशासन काम करते आहे, असे चित्र दिसले पाहिजे. ज्या बायकांवर अत्याचार झाले त्यांना केवळ पोकळ सहानुभूतीची गरज नाही. त्यांची ज्या पद्धतीने बेअब्रू झाली त्यासंबंधी संवेदनशील समाजाला आणि राज्यकर्त्यांना लाज वाटली पाहिजे. वेळ मध्यरात्रीची असताना आणि बायका दरोडेखोरांच्या पाया पडल्या असताना त्यांनी जे थैमान घातले, त्याला केवळ विकृती म्हणूनही चालणार नाही. माणुसकी पायदळी तुडविणारा हा उन्माद वेळीच चिरडून काढला पाहिजे
No comments:
Post a Comment