Total Pageviews

Thursday 21 July 2011

COOPERATIVE SECTOR DEN OF CORRUPTION IN MAHARASHTRA

सहकारातीलखादाड’ Nashik(22-July-2011) Tags : Editorial DESHDOOTएकेकाळी सहकार क्षेत्र महाराष्ट्राचे भूषण मानले जात होते तेच आता राज्याच्या अर्थव्यवस्थेला चिकटलेले बांडगूळ ठरू पाहत आहे. जोपर्यंत या क्षेत्रात सेवाभावी नेते आणि कार्यकर्ते होते तोपर्यंत या क्षेत्राची भरभराट होत राहिली. दत्त सहकारी साखर कारखाना समूहाचे श्री. सा. रे. पाटील, पंचगंगाचे रत्नाप्पा कुंभार, वारणा समूहाचे तात्यासाहेब कोरे, हुतात्मा किसन अहिर साखर कारखाना समूहाचे नागनाथ नाईकवडी, प्रवराचे पद्मश्री विठ्ठलराव विखे, संगमनेरचे भाऊसाहेब थोरात अशा कितीतरी थोरांना त्याचे श्रेय द्यावे लागेल. कालांतराने सहकारी साखर कारखाना म्हणजे आमदार अथवा खासदार होण्याची पहिली पायरी असे समीकरण रूढ झाले. गटबाजी आणि राजकारणाचा आखाडा बनू लागले. कधीकाळी ग्रामीण जनतेचा विकासाचा कल्पवृक्ष ठरलेली सहकारी चळवळ आज अंतर्बाह्य विषवृक्ष बनली आहे. ग्रष्टाचाराची गंगोत्री बनली आहे. बर्‍याच ठिकाणी साखर कारखान्यांच्या संचालकांनीच जिल्हा बँकेची सत्ता हस्तगत केलेली आहे. त्यातले आणखी निवडक गणंग राज्य सहकारी बँकेला विळखा घालून बसले आहेत. या सर्व हितसंबंधियांच्या साखळीतून सहकार क्षेत्रात भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली नसती तरच नवल! या भ्रष्टाचार्‍यांच्याच सक्रिय सहकाराने राज्याच्या मंत्रिमंडळात स्थानापन्न झालेले राज्याचे भग्यविधाते आपल्या समर्थक बगलबच्चांना संरक्षण देण्यातच धन्यता मानू लागले. परिणाम व्हायचा तोच झाला. चार दशकापूर्वी ना. बाळासाहेब भारदे डॉ. धनंजयराव गाडगीळ अशा दिग्गजांच्या मार्गदर्शनाने, काकडे परिवाराच्या पुढाकाराने सोमेश्‍वर सहकारी साखर कारखाना उभा राहिला नावारूपाला आला. आज त्याच काकडे परिवारातील काहींनी पुणे जिल्ह्यातील सहकाराच्या काकडीच्या पिकाला भ्रष्टाचाराची कीड लावण्यात पुढाकार घेतला आहे. अस्तित्वात नसलेल्या मालमत्तेच्या खोट्या कागदपत्रांच्या तारणावर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून करोडो रुपयांची कर्जे घेतली. बँकेला फसवण्याच्या उद्देशानेच योजनाबद्ध रीतीने घेतलेल्या कर्जाची परतफेड कोण करणार? राज्यात अनेक ठिकाणी सहकाराचे वाभाडे निघत आहे. काकडे बंधू तर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचे सबळ पाठीराखे आहेत. साहजिकच कर्जबुडवेपणाच्या त्यांच्या उपद्व्यापाला भक्कम राजकीय आशीर्वाद असल्याचेही बोलले जाते. सध्या मराठी माणसे उठता-बसता छत्रपती शिवाजी महाराजांचा उदोउदो करतात. आषाढी वारीच्या निमित्ताने ज्ञानोबा-तुकारामांचा गरजरही नुकताच दुमदुमला. अशा महाराष्ट्रात सध्या जे काही चालले आहे ते पाहता राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात महाराष्ट्राची कीर्तीपताका काळ्या रंगाने रंगवण्याचा बहुमानदेखील पुणे जिल्ह्यानेच मिळवावा, हा काकतालीय न्याय म्हणावा लागेल

No comments:

Post a Comment