Total Pageviews

Tuesday 26 July 2011

RAJA BLAMES HOME MINISTER & PRIME MINISTER


संसदेचे अधिवेशन आठवड्यावर आले असताना त्यांनी मनमोहन सिंग व चिदंबरम् यांच्यावर ‘स्पेक्ट्रम बॉम्ब’ टाकला आहे.

राजा यांचे ओरखडेकॉमनवेल्थ घोटाळ्यातील आरोपी सुरेश कलमाडी यांना स्मृतिभ्रंश झाला आहे. अशा लोकांना मागचे काही आठवत नाही. कलमाडी यांचा ‘गझनी’ झाला असला व त्याचा परिणाम या संपूर्ण खटल्यावर होण्याची भीती असली तरी माजी दूरसंचारमंत्री ए. राजा यांची स्मरणशक्ती ठणठणीत असून स्पेक्ट्रम घोटाळ्यातील प्रत्येक गोष्ट त्यांना व्यवस्थित आठवत आहे. त्यामुळे विशेष न्यायालयापुढे ए. राजा यांनी बचावाचे भाषण करताना अनेकांना झटके दिले आहेत. ए. राजा यांनी त्यांच्या ‘स्मृती’स स्मरून (स्मृती इराणी नव्हे!) जाहीर केले आहे की, स्पेक्ट्रम घोटाळ्याशी आपला काडीमात्र संबंध नसून
‘टू-जी स्पेक्ट्रम’ व्यवहाराची संपूर्ण माहिती पंतप्रधान मनमोहन सिंग यांना वेळोवेळी दिली होती. स्पेक्ट्रमची विक्री ही पंतप्रधान मनमोहन सिंग व अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांच्या संमतीने झाली व मंत्रिमंडळाने त्यावर मोहोर उठवली आहे. ‘एन.डी.ए.’ सरकारने स्पेक्ट्रम विक्रीसंदर्भात जी नीती व धोरणे अवलंबली त्याच आधारे आपण काम केले. जर मी तुरुंगात असेन तर १९९३ पासूनचा प्रत्येक दूरसंचार मंत्री माझ्याबरोबर तुरुंगात असायला हवा अशा प्रकारचा बॉम्बगोळा राजा यांनी टाकल्याने खळबळ माजणे व अनेकांचे मुखवटे फाटणे साहजिक आहे. राजा यांनी विशेष न्यायालयात स्वत:चा बचाव स्वत:च सुरू केला आहे. राजा यांनी जो बाजा वाजवला त्यामुळे कॉंग्रेसची झोप उडणे साहजिकच आहे. राजा यांनी १९९३ पासूनचे स्पेक्ट्रम हिशेब समोर ठेवले. दूरसंचार मंत्री म्हणून अरुण शौरी यांनी २६ लायसन्सचे वाटप केले. दयानिधी मारन यांनी २५ लायसन्स दिले व राजा यांच्या काळात १२२ स्पेक्ट्रम लायसन्स देण्यात आले. राजा यांनी दिलेल्या लायसन्सचा आकडा इतरांच्या तुलनेत जास्त असला तरी लायसन्स देण्याची पद्धत सारखीच आहे व धोरणही तेच आहे. र्‍ल्स्ंीे स्के हद ्ग्र्ंिर्ंिीाहम असा राजा यांचा दावा आहे. राजा हे पाच महिन्यांपासून तिहार तुरुंगात आहेत. त्यांच्या जोडीला करुणानिधी यांच्या कन्या कनिमोझी आहेत. ‘द्रमुक’ पक्षाचे ‘बंटी आणि बबली’ अशाप्रकारे स्पेक्ट्रम घोटाळाप्रकरणी गजाआड आहेत. द्रमुक तरीही एका मजबुरीतून केंद्रातल्या कॉंग्रेस सरकारला पाठिंबा देत आहे. राजा यांनी पंतप्रधानांवरच हल्ला केल्यामुळे आता काय होईल ते पहावे लागेल. राजा हे पेशाने वकील असल्याने कोणत्या वेळी कोणते फासे टाकायचे हे ते चांगले जाणतात. संसदेचे अधिवेशन आठवड्यावर आले असताना त्यांनी मनमोहन सिंग व चिदंबरम् यांच्यावर ‘स्पेक्ट्रम बॉम्ब’ टाकला आहे व त्याचवेळी ‘एनडीए’ सरकारच्या शेपटालाही लवंगी फटाका बांधून ठेवला आहे. संसदेत याप्रश्‍नी कोणी कोणाच्या विरोधात बोंबलायचे हाच आता प्रश्‍न आहे. कॉंग्रेसचे वाचाळ मंत्री कपिल सिब्बल यांनी राजा यांना खोटे ठरवून टाकले. राजा हे खरे बोलतात की खोटे ते न्यायालय ठरवेल. सिब्बल हे गेल्या अनेक महिन्यांत किती वेळा खरे बोलले? स्पेक्ट्रमच्या व्यवहारात सरकारी तिजोरीचा एक आण्याचाही तोटा झाला नाही, असे सिब्बल म्हणत होतेे. सिब्बल यांचे हे म्हणणे खरे मानले तर मग ए. राजा व इतरांना या प्रकरणात आरोपी का केले व सीबीआय त्यांना इतक्या महिन्यांनंतरही जामीन देण्यास का विरोध करीत आहे? सिब्बल हे सर्वोच्च न्यायालयातले श्रीमंत वकील आहेत व त्यांनीच त्याचा खुलासा करायला हवा. राजा हे आरोपी आहेत व एक आरोपी स्वत:च्या बचावासाठी कोणावरही चिखलफेक करतो हा सिब्बल यांचा दावा फुसका आहे. राजा हे कालपर्यंत मंत्रिमंडळाच्या बैठकीत तुमच्याच मांडीस मांडी लावून बसले होते. राजा हे आजही लोकसभेचे सदस्य आहेत व त्यांना कलमाडींप्रमाणे स्मृतिभ्रंशाचा आजार झालेला नाही. राजा यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग व मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय निर्णय झाले ते जाहीर केले व अशा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयाच्या नोंदी रीतसर होत असतात. राजा यांना उद्या विस्मृतीचा आजार जडला तरी या नोंदी व दस्तऐवज न्यायालयासमोर येतीलच व सिब्बल यांना त्यावेळी तोंड लपवून फिरावे लागेल. पंतप्रधान मनमोहन सिंग व चिदंबरम स्पेक्ट्रम घोटाळ्यात काखा वर करू शकत नाहीत. राजा हे द्रमुकचे होते म्हणून त्यांच्या निर्णयात हस्तक्षेप करता येत नव्हता हा पंतप्रधानांचा दावाही
न पटणारा आहे. उद्या देशाच्या संरक्षणमंत्रीपदी असाच कुणी आघाडी धर्मातला ‘मंत्री’ चिकटला व त्याने परस्पर कश्मीर, लेह-लडाखचा सौदा केला तर पंतप्रधान काय करतील? संबंधित मंत्री कॉंग्रेसचे नसल्यामुळे मला त्या सौद्यात हस्तक्षेप करता आला नाही असाच धोषा लावून ते स्वत:ची चामडी वाचवतील काय? ए. राजा यांनी सध्या तरी सरकारच्या चामडीवर ओरखडे मारले आहेत.

सरकारी अनास्थेचे बळी!पंढरपूरहून परतणार्‍या संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या दिंडीला जालना जिल्ह्यात झालेल्या अपघाताने सार्‍या महाराष्ट्राला चटका लावला आहे. या अपघातात ११ वारकरी आणि नंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन निदर्शक असे एकंदर १३ जण ठार झाले. वारकर्‍यांसाठी यमदूत बनून आलेल्या कंटेनरच्या चालकाने दारू ढोसलेली होती, त्यामुळेच गाडीवरील त्याचा ताबा सुटला अशी माहिती आता पुढे आली आहे. पुन्हा अपघातानंतर घटनास्थळी धावलेल्या जमावावर लाठीमार, अश्रुधूर, गोळीबार करून पोलिसांनी माणुसकीलाच काळिमा फासला. गजानन महाराजांच्या दिंडीची शिस्त म्हणजे पंढरीला येणार्‍या सर्वच पालख्यांसाठी आदर्श वस्तुपाठ मानला जातो. पंढरीला जाताना आणि परत येताना ज्या ज्या जिल्ह्यातून दिंडी मार्गक्रमण करते त्या प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकार्‍यांना गजानन महाराज संस्थानातून रीतसर पत्र पाठवून बंदोबस्ताची मागणी केली जाते. जालन्याच्या पोलीस प्रशासनालाही असे पत्र संस्थानने धाडले होते. असे असतानाही पोलिसांनी एक कॉन्स्टेबलही दिंडीसोबत दिला नाही. दिंडीच्या मागेपुढे पोलिसांची व्हॅन असली की अवजड गाड्या गती कमी करतात आणि दबकून वागतात हा अनुभव आहे. मात्र पोलिसांचा असा लवाजमा असतो तो फक्त मंत्री-संत्री आणि पुढार्‍यांसाठी. वारकरी, हिंदू भाविक मेले काय जगले काय, सरकारला त्याचे काही सोयरसुतक नाही. एवढी मोठी घटना घडल्यानंतर त्याचे थोडेफार पडसाद उमटणे हे नैसर्गिकच आहे. जमावाने कंटेनर पेटवला, जिल्हाधिकारी, अधीक्षकांची गाडी जाळली; पण म्हणून काय गोळीबार करून जनतेचे मुडदे पाडायचे? ठार झालेल्या दोघांच्या छातीत गोळ्या घुसल्या आहेत. जखमींपैकी कुणाच्या मानेत तर कुणाच्या खांद्यातून गोळ्या आरपार निघून गेल्या. अपघातानंतर बचाव आणि मदतकार्यास वाहून घेण्याऐवजी पोलिसांनी असे राक्षसी क्रौर्य घडवले. अंबडजवळ ज्या ठिकाणी हा अपघात झाला तो राज्य महामार्ग आहे. वाहतुकीची प्रचंड वर्दळ असणारा हा रस्ता केवळ दुहेरी आहे. दुभाजकही नाही. या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव पाच वर्षांपासून सरकारदरबारी धूळ खात पडला आहे. रस्त्याचे रुंदीकरण वेळीच झाले असते तर कदाचीत ही दुर्घटना टळली असती. त्यामुळे या अपघातातील वारकर्‍यांचे मृत्यू म्हणजे सरकारी अनास्थेचेच बळी आहेत. या अपघाताची आणि नंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबाराची नि:पक्ष चौकशी व्हायलाच हवी

No comments:

Post a Comment