Total Pageviews

Friday 29 July 2011

MAHARASHTRA & SECULARISM FOR CONSIDERATION PLEASE

वारकरी संप्रदाय, हिंदुत्ववादी आणि जैन संघटना यांचा महाराष्ट्र शासनाकडून विश्वासघात !

हिंदु धर्माभिमानी यांना आवाहन !

धर्मद्रोही प्रस्तावित (अंध)श्रद्धाविरोधी कायद्याविरुद्ध अधिकाधिक अभिप्राय पत्रे पाठवा !
महाराष्ट्र शासन करू पहात असलेल्या ‘महाराष्ट्र नरबळी व अन्य अमानवीय अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम २०११’ अर्थात (अंध)श्रद्धाविरोधी कायदा या धर्मावर घाला घालणार्‍या कायद्याच्या विरोधात निषेधपत्र पाठवून जनमताच्या माध्यमातून हा धर्मद्रोही कायदा रहित करण्यास भाग पाडून धर्मसेवा करण्याची आपल्याला संधी आहे.
त्यामुळे अधिकाधिक हिंदु धर्माभिमान्यांना, तसेच प्रतिष्ठित व्यक्ती, समाजसेवक, संप्रदाय, राजकीय पक्ष, विविध संघटना यांनी कायद्याविरुद्धचे मत पत्राद्वारे श्री. शिवाजीराव मोघे, सामाजिक न्यायमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ या पत्त्यावर पाठवावे. त्याची एक प्रत मुख्यमंत्री आणि समितीच्या कार्यालयात पाठवू शकतो. आपण ‘पोस्टकार्ड’ किंवा ‘अंतर्देशीय पत्र’ यांद्वारेही आपले मत वरील पत्त्यावर पाठवू शकता.
या संदर्भात अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या सूत्रांचा आधार घ्यावा, तसेच समितीचे समन्वयक श्री. शिवाजी वटकर (भ्रमणध्वनी क्र. : ९३२२५ ३३५९५) यांच्याशीही आपण संपर्क साधू शकता.
शासनाला निषेधपत्र, वृत्तपत्रांना लेख किंवा पत्र पाठवणे,
जनजागृती करणे यांसाठी उपयुक्त सूत्रे
१. या कायद्यात दिलेल्या गुन्ह्यांकरता सध्याचे प्रचलित कायदे सक्षम असल्याने हा नवीन कायदा करण्याची आवश्यकता नाही.
२. साधना किंवा उपासना करून दैवी शक्तीची कृपा मिळवण्याचे आम्हा नागरिकांना व्यक्तीस्वातंत्र्य आहे. त्यावर या कायद्याने बंधन येणार असल्याने हा कायदा रहित करावा.
३. परंपरागत घरगुती उपचारांवर आणि आयुर्वेद शास्त्रावर या कायद्याने बंदी येऊ शकते. एखाद्याने कोणत्या पद्धतीने उपचार करवून घ्यावयाचा, हा ज्याच्या त्याच्या स्वातंत्र्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. या कायद्यामुळे त्यात आडकाठी येऊन व्यक्तीस्वातंत्र्य धोक्यात येईल; म्हणून महाराष्ट्र शासनाने हा कायदा रहित करावा.
शासनाला हा कायदा आणायचाच असेल, तर त्यात पुढील सुधारणा होणे आवश्यक असणे
१. हा कायदा करण्यापूर्वी सर्व धर्माचार्यांच्या आणि संतांच्या सूचना विचारात घ्याव्यात.
२. कायद्याच्या मसुद्यात तथाकथित चमत्कार, अतिमानुष शक्ती आदी सर्व शब्दांच्या व्याख्या स्पष्ट कराव्यात.
३. धार्मिक विधी, कृती, रूढी, परंपरा आणि संस्कृती यांना हा कायदा लागू होणार नाही, अध्यात्माचा प्रचार-प्रसार, संशोधन, तसेच स्वेच्छेने करून घेतलेल्या आध्यात्मिक उपचार यांना हा कायदा लागू होणार नाही, अशी स्पष्ट योजना त्यात असावी.
४. या कायद्याने दैवी सामर्थ्याची महती सांगून श्रद्धा वाढवणार्‍या ग्रंथांवर बंदी येणार नाही, असे त्यात नमूद करावे.
५. या कायद्यात तक्रार करण्याचा अधिकार सक्षम पीडित व्यक्तीशिवाय तिसर्‍या व्यक्तीला दिला जाऊ नये.
६. हा कायदा महाराष्ट्रात रहाणार्‍या सर्व धर्मियांना म्हणजेच खिस्ती, मुसलमान, शीख, जैन आणि हिंदु यांना लागू होईल, असे त्यात स्पष्टपणे नमूद करावे.
७. देव आणि धर्म यांच्यावर टीका करून किंवा पैसे अथवा तत्सम बाबींचे आमीष दाखवून किंवा विशिष्ट पद्धतीने अथवा धर्माप्रमाणे उपासना न केल्यास शारीरिक, आर्थिक अथवा मानसिक हानी होईल, अशी धमकी देऊन एखाद्या व्यक्तीला अथवा समूहाला धर्म बदलण्यासाठी प्रेरित करणे हा गुन्हा ठरेल, असे कलम या कायद्यात असावे.
हिंदूंनो, प्रस्तावित धर्मविरोधी (अंध)श्रद्धा निर्मूलन कायद्याला तीव्र विरोध करा !
निषेधपत्रे पाठवण्यासाठी संपर्क
१. श्री. शिवाजीराव मोघे, सामाजिक न्यायमंत्री,
सामाजिक न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई ३२.
कार्यालय संपर्क क्रमांक : (०२२) २२८७६०६९, फॅक्स : २२८७६४६३,
ई-मेल पत्ता : min_socjust@maharashtra.gov.in
२. श्री. पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री, महाराष्ट्र, मंत्रालय, मुंबई ३२.
कार्यालय संपर्क क्रमांक : (०२२) २२०२५१५१, फॅक्स : (०२२) २२०२९२१४,
ई-मेल पत्ता : chiefminister@maharashtra.gov.in
३. श्री. अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र, मंत्रालय, मुंबई ३२.
कार्यालय संपर्क क्रमांक : (०२२) २२०२२४०१, फॅक्स : २२०२४८७३,
ई-मेल पत्ता : DeputyChiefMinister@maharashtra.gov.in
--
  • गुरुपौर्निमेला केलेल्या अर्पणाचे महत्व
गुरुपौर्णिमेला गुरुतत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्त्र पटीने कार्यरत असते. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केलेली सेवा अन त्याग ( सत्साठी अर्पण ) यांचा इतर दिवसांच्या तुलनेत १ सहस्त्र पतीने अधिक लाभ होतो . धर्मजागृती आणि राष्ट्र रक्षण या हेतूंनी कार्यरत असलेल्या दैनिक 'सनातन प्रभात 'च्या गुरुपौर्निमेनिमित्त प्रसिद्ध होणार्या वरील विशेषांकासाठी आपण जाहिरात व मागणी दिल्यास ते दान सत्पात्रे ठरेल , अर्थात खर्या अर्थी सार्थकी लागेल!

No comments:

Post a Comment