Total Pageviews

Sunday 31 July 2011

NO WORD FROM UNGRATEFUL CHIEF MINISTER  KASHMIR/
HOME MINISTER OF COUNTRY
दहशतवाद्यांची घुसखोरी रोखताना ३ जवान हुतात्मा
वृत्तसंस्था
Sunday, July 31, 2011 AT 01:33 PM (IST)
श्रीनगर: कुपवारा जिल्ह्यात भारत-पाकिस्तान प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ काल (शनिवारी) रात्री सैन्यदलाचे जवान व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन जवान ठार झाले. 

ताबा रेषेजवळच्या फुर्कीन गली येथील टेम्पल चौकीजवळ काही दहशतवाद्यांची हालचाल दिसून आल्याची माहिती मिळाल्यानंतर सैन्याच्या १९ राजपूत रायफल्सच्या जवानांची तुकडी तेथे पाठविण्यात आली.

जवानांनी आव्हान दिल्यानंतर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला, त्यानंतर दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर गोळीबार झाला. या चकमकीत दोन जवानांचा गोळी लागून जागीच मृत्यू झाला तर तीन जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. श्रीनगरमधील बदामीगढ कॅन्टॉनमेन्ट येथील ९२ तळ रुग्णालयात उपचार सुरू असताना जखमींपैकी एका जवानाचा मृत्यू झाला.

आढळलेले दहशतवादी पुन्हा ताबा रेषेच्या पाकव्याप्त काश्मीरकडच्या बाजूला पळून गेले असण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले. अशा प्रकारे दहशतवाद्यांनी भारतीय सीमेमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याची गेल्या तीन दिवसांमधली ही दुसरी घटना आहे.

२७ जुलैला जेव्हा भारत व पाकिस्तान यांच्यामध्ये नवी दिल्लीत चर्चा सुरू होती तेव्हाही दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता; त्यावेळी एक अधिकारी हुतात्मा झाला तर दोन जवान जखमी झाले आणि दहशतवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.

No comments:

Post a Comment