INDIA AGAINST CORRUPTION & BAD GOVERNANCE STORY 60
WILL PUBLISH ARTICLES REGULARLY ON CORRUPTION / BAD GOVERNANCE IN INDIA . PASS ON TO AS MAY HONEST INDIANS AS POSSIBLE
इतका विलंबित न्याय :आजोबाच्या जिवंतपणी दाखल झालेल्या दाव्याचे निकाल नातवाच्या हाती पडतातइतरांच्यात्यामुळे न्यायालयाने मारलेले सर्व शेरे-ताशेरे कोणासाठी मारले? आज तरी ते बहिर्यापुढचे गायन ठरले आहे. मध्ये अनेक वर्षे गेली. नंतरच्या राज्यकर्त्यांनीसुद्धा अशाच अनेक चुका केल्या असतील. वर्षे उलटून गेल्यानंतर न्यायसंस्थेने दाखवलेली ही जागरुकता म्हणजे अरण्यरुदनच नाही का? अण्णासाहेब हजारे यांच्या आंदोलनाला चूक ठरवणारे अनेक आवाज आता उठू लागले आहेत. ‘सिस्टीम’चा पुळका अनेक विद्वानांना दाटून आला आहे. ज्या सिस्टीममध्ये न्यायाचीदेखील वर्षानुवर्षे फरफट होते तो न्याय कोणाच्याही बाजूने झाला तरी सामान्य जनतेपुरते त्याचे स्वरूप अन्यायापेक्षा किती वेगळे राहते? वेळीच निर्णय दिला गेला असता तर राज्याचा बुडालेला महसूल कदाचित थोडाफार तरी वसूल करता आला असता. न्यायदानाच्या मुदतीवर काही मर्यादा घातल्याशिवाय जनतेला खरा न्याय मिळणे दुरापास्त आहे. आजोबाच्या जिवंतपणी दाखल झालेल्या दाव्याचे निकाल नातवाच्या हाती पडतात. या वैफल्यातूनच गावोगावी भाई उदयाला येत आहेत. समांतर न्यायव्यवस्था उभ्या राहत आहेत. हे अपयश हा देखील सिस्टीमचा अपरिहार्य भाग बनत असेल तर जनतेला अण्णा हजारेंची आंदोलने आवश्यक वाटली तर त्यात चूक काय?
दोषांकडे बोट दाखवताना चार बोटे स्वत:कडेच असतात याचे भल्या भल्यांना भान राहत नाही. न्यायसंस्थाही त्यास अपवाद नसावी. मायकेल जॅक्सनचा कार्यक्रम मुंबईत झाला त्याला जवळपास चौदा वर्षे उलटून गेली. त्या कार्यक्रमाला तत्कालीन युतीच्या शासनाने करमाफी दिली होती. ती अयोग्य असल्याबद्दल दाखल झालेल्या दाव्याची मुंबई उच्च न्यायालयात नुकतीच सुनावणी झाली. करमाफीचा तो निर्णय अत्यंत घिसाडघाईने घेतला गेला. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी करमाफीची विनंती करणारा अर्ज दाखल झाला. तत्कालीन मंत्री प्रमोद नवलकर यांनी विनंती ताबडतोब मान्य केली. कार्यक्रम खरोखरीच जनहितार्थ असल्याची शहानिशादेखील केली गेली नाही, असे ताशेरे न्यायालयाने ओढले आहेत. हादेखील न्यायालयीन तत्परतेचा विपरीत दाखला म्हणावा लागेल. महसुलाशी संबंधित बाबीवर निर्णय घेताना राज्यकर्त्यांनी सद्सद्विवेकबुद्धी वापरली पाहिजे, असा अभिप्राय न्यायालयाने नोंदवला आहे. तो सर्वस्वी योग्य आहे; पण ‘बैल गेला आणि झोपा केला’ इतका विलंबित आहे. युतीची राजवट संपली. तत्कालीन सांस्कृतिकमंत्री प्रमोद नवलकरांनी जगाचा निरोप घेतला. शिवउद्योग सेनेच्या उभारणीसाठी मायकेल जॅक्सनचा तो कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगितले गेले होते. ती शिवउद्योग सेनादेखील आज अस्तित्वात नाही. तेव्हाचे खंदे शिवसैनिक राज ठाकरे यांनी तो कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र ठोकला.
No comments:
Post a Comment