Total Pageviews

Thursday, 7 April 2011

CORRUPTION STORY 29-

ANNA HAZARE FAST UPTO DEATH AGAINST CORRUPTION STORY 29
WILL PUBLISH ARTICLES REGULARLY ON CORRUPTION / BAD GOVERNANCE IN INDIA . PASS ON TOAS
MAY HONEST INDIANS AS POSSIBLE
http://brighemantmahajan.blogspot.com/
मुंबई
काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त झालेल्या स्वागत समारंभाचा १५ लाख रूपयांचा खर्च एचडीआयएल या बांधकाम व्यावसायिक कंपनीने केला मुंबई काँग्रेसचे वादग्रस्त अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त महालक्ष्मी रेसकोर्सवर थाटात संपन्न झालेल्या स्वागत समारंभाचा १५ लाख रूपयांचा खर्च एचडीआयएल या बांधकाम व्यावसायिक कंपनीने केला होता, अशी धक्कादायक बाब आयकर खात्याने केलेल्या चौकशीत पुढे आली आहे.
कृपाशंकर सिंह यांनी कोट्यवधी रूपयांची बेनामी मालमत्ता जमवल्याचा तसेच आयकरचुकवेगिरी केल्याचा आरोप करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते संजय तिवारी यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे. हायकोर्टाच्या आदेशानुसार कृपाशंकर त्यांच्या कुटुंबियांच्या आर्थिक व्यवहारांची आयकर खात्याने चौकशी करून आपला अहवाल तयार केला आहे. या अहवालात कृपाशंकर आणि बिल्डर कंपनी यांच्यातील हेअर्थपूर्णसंबंध उघड झाले आहेत.
कृपाशंकर सिंह यांचा पुत्र नरेंद्रमोहन सिंग ऊर्फ संजय सिंग याचा विवाह २९ एप्रिल २००८ रोजी झारखंडमधील राजकीय नेते कमलेश सिंग यांची कन्या अंकिता सिंग हिच्याशी झाला. या विवाहानंतर मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स तसेच ग्रँड हयात पंचतारांकित हॉटेलमध्ये खास स्वागत समारंभ आयोजिण्यात आला होता. यापैकी महालक्ष्मी रेसकोर्सवरील स्वागत समारंभाच्या खर्चापोटी एचडीआयएल कंपनीने १५ लाख रूपये दिले होते, अशी बाब तपासात आढळली आहे.
कृपापुत्र नरेंद्रमोहन सिंग यांनीही एचडीआयएलने स्वागत समारंभाचा खर्च केल्याचे कबुल केले आहे. माझे काही मित्र आहेत, स्वागत समारंभासारख्या प्रसंगांचा खर्च ते करू शकतात, असा युक्तिवादही त्यांनी केला आहे.
जी घोटाळा प्रकरणी अटकेत असलेला बिल्डर शाहीद बलवा याच्याशी संबंधित डीबी समूहाने कृपापुत्राला कर्जापोटी कोटी ५० लाख रूपये दिल्याची बाबही अलिकडेच उघड झाली होती. कृपापुत्र नरेंद्रमोहन सिंग यांना अनेक कंपन्यांनी अशाप्रकारे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिल्याचे आढळले आहे. कृपापुत्रावरून या कंपन्यांनी एवढी मेहेरनजर दाखवण्याचे कारण काय, असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे.
वॉरन
बफे-बिल गेट्स या जीवन-मार्गावरील संत प्रचंड पैसा कमवा, अमर्याद भोग घ्या, दान केलंत म्हणजे झालं. व्यक्ती-समाज यांच्या सुखी-समाधानी जीवनाचा हाच एकमेव मूलमंत्र आहे. वॉरन बफे-बिल गेट्स या जीवन-मार्गावरील संत आहेत!',
आपली लक्ष कोटींची संपत्ती समाजासाठी दान केल्यावर तसे अप्रत्यक्ष आवाहन हळूवारपणे करण्यासाठी दोन अमेरिकन दानशूर भारतात येऊन गेले. वायुवेगाने धनसंचय होणाऱ्या आजच्या काळामुळे बफे-गेट्स वयाच्या चाळिशी-पन्नाशीतच सहस-कोट्यधीश झाले. इथे जुन्या काळात एकत्र कुटुंबातील अनेकांच्या पिढ्यान्-पिढ्यांच्या प्रचंड कष्टांनी कोणाची बेताबाताची संपत्ती जमायची, कमी-अधिक दान व्हायचे. कधी आपली आयुष्यभराची पुंजी समृद्ध मुलांच्या अनेक युरोप टूर्ससाठी ठेवता गावच्या शाळेसाठी देणारी सामान्य माणसेही निघायची. ?
नवभांडवलशाही जागतिकीकरणाच्या घोडदौडीत समता-समाजवादी विचारांची पीछेहाट होऊन, बाजार-स्पर्धा जीवनाच्या केंदस्थानी आल्या आहेत. अत्यंत वेगाने प्रचंड नफा, संपत्तीसंचय, अमर्याद भोग-सुविधायुक्त जगणे हे जीवनसार्थकाचे सर्वश्रेष्ठ मूल्य बनत आहे. 'प्रचंड पैसा कमवा, अमर्याद भोग घ्या, दान केलंत म्हणजे झालं. व्यक्ती-समाज यांच्या सुखी-समाधानी जीवनाचा हाच एकमेव मूलमंत्र आहे.' (बफे-गेट्स त्या जीवनमार्गावरील संत आहेत . धनसंचय झाल्यावर दान येते. पण असे बफे-गेट्स संख्येने किती? धनार्जनासाठी मूलत: एक वृत्ती लागते. (त्यात लोभ कष्टांची तयारी दोन्ही आली. गैर काही नाही.)


'
भांडवलशाही-दानें ठेविले, तैसे जगावे' यापेक्षा 'चित्ती असो द्यावे समाधान' या जीवनाच्या श्रेयसासाठी 'या' अनंताचे टाळकुटेपण आम्हा सामान्यांच्या दृष्टीने अधिक विश्वसनीय आहे   

No comments:

Post a Comment