ANNA HAZARE FAST UPTO DEATH AGAINST CORRUPTION STORY 30
WILL PUBLISH ARTICLES REGULARLY ON CORRUPTION / BAD GOVERNANCE IN INDIA . PASS ON TOAS
MAY HONEST INDIANS AS POSSIBLE
http://brighemantmahajan.blogspot.com/नववर्षाचे
स्वागत करताना चार लाख लिटर,उपांत्य , अंतिम विजयाचा जल्लोष करताना मुंबईकरांनी सहा लाख लिटर दारू फस्त केली, घरोघरी असलेल्या 'स्टॉक'चा समावेश नाहीमहाराष्ट्राचे वर्णन आता 'क् रिकेट-जल्लोष-दारूच्याही देशा' असे वर्णन करायला हवे. भारताने वर्ल्ड कप जिंकल्यापासून दारूविक्रीचे जे तडाखेबंद आकडे प्रकाशित होत आहेत, ते थक्क करणारे आहेत. या विक्रमी 'दारूकामा'ची सुरुवात भारताने पाकिस्तानला मात दिली तेव्हा झाली. उत्तरोत्तर ती रंगत वाढते आहे! नुसता मुंबईचा विचार केला तरी मद्यसंस्कृतीचा अंमल कसा चढला आहे, याची कल्पना येईल. होळीच्या दोन दिवसांत मुंबईकरांनी साडेतीन लाख लिटर दारू रिचवली. नववर्षाचे स्वागत करताना चार लाख लिटर. मात्र, हे विक्रम मोडून उपांत्य आणि अंतिम विजयाचा जल्लोष करताना मुंबईकरांनी सहा लाख लिटर दारू फस्त केली. यात आधीच घरोघरी असलेल्या 'स्टॉक'चा समावेश नाही. तो 'घेतला' तर हा आकडा बराच वाढेल. हीच स्थिती राज्यातल्या बहुतेक शहरांत आणि देशातल्या बहुतेक राज्यांमध्ये होती. कर्नाटक, आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश इथून येणाऱ्या बातम्या हेच सांगत आहेत. या उत्सवात दारूविक्रीचे विक्रम मोडले. मात्र, खरा प्रश्ान् आहे तो आनंद किंवा सेलिब्रेशनचा आपण दारूशी जो अन्योन्य संबंध जोडला आहे त्याचा. ज्या विजयाच्या क्षणी राष्ट्रपती स्वत: हजर होत्या, त्याचा आनंद करताना परस्परांना शॅम्पेनची अंघोळ घालण्यात किंवा तिची कारंजी पिण्यात खेळाडूंना काही गैर वाटले नाही! सर्व वयोगटांतील किमान ४० कोटी प्रेक्षक तो प्रसंग टीव्हीवर पाहात होते. आनंद कसा साजरा करायचा, याचा प्रत्यक्ष धडा आपल्या हिरोंकडून शिकत होते. तोच गिरवून त्यांनी दोन दिवसांत सगळे विक्रम तोडले, यात नवल काय? या सर्वव्यापी नशेचा अंमल ओसरला तेव्हा उंची दारूचे षौकीन घरात पसरले होते. पण सकाळी रस्ते-फूटपाथवर बेहोष नवऱ्यांना उठवणाऱ्या-सावरणाऱ्या बायका दिसत होत्या. मन-बुद्धीची सावध अवस्था माणूस नशेच्या आधीन होऊन तात्पुरती तरी का गमावतो; या प्रश्नाचे उत्तर तत्त्वचिंतकांना सापडलेले नाही किंवा आधुनिक वैद्यकांनाही. ते कधी ना कधी सापडेल. मात्र, दारू पिण्याला वैयक्तिक नीतिमत्तेचे जे भक्कम कुंपण होते, ते धडाधड ढासळते आहे. या दोन्हींचा दारूला रोखणारा प्रभाव आज झपाझप ओसरतो आहे. या 'खासगी'पणा पलीकडची गोष्ट सामाजिक नीतिमत्तेची. ज्या देशामध्ये दारूमुळे लाखो माणसे व्यसनी होतात, कामातून जातात, स्त्रियांचे जीणे हराम करतात, असंख्य मुलांचे बालपण काळवंडते त्या दारूशी आपले नि:संदिग्ध भांडणच असायला हवे, असे कितीजणांना अगदी मनापासून वाटते? सोशल ड्रिंकिंग, हेल्दी अल्कोहल, हार्ड नसणारे डिंक या सगळ्या चोरवाटा आहेत. र्वल्ड कप विजयानंतरचा माहोल देशभर असा होता की या चोरवाटांचे प्रशस्त राजमार्ग व्हावेत.
No comments:
Post a Comment