वेगाने
वाढणारा भारत हे डीप स्टेटचे लक्ष्य
अमेरिकेमधील डीप
स्टेट यामध्ये जॉर्ज ,तिथली नोकरशाही सामील आहे जी भारताच्या विरोधात आहे. आशा करूया की या डीप स्टेट
वरती डोनाल्ड ट्रम्प यांचा हातोडा पडेल.
वेगाने वाढणारा भारत हे डीप स्टेटचे लक्ष्य आहे. डीप स्टेट, भारतातील आपल्या एजंटांच्या मदतीने
वेळोवेळी देशविरोधी कारवायांना खतपाणी घालत असते. एवढेच नव्हे तर देशविरोधी
कारवायांमध्ये गुंतलेल्या लाखो स्वयंसेवी संस्थांनाही या डीप स्टेटकडून निधी दिला
जातो, जेणेकरून येथे राजकीय गतिरोध आणि
प्रशासकीय अस्थिरतेचे वातावरण कायम राहावे.
बांगलादेशात
नुकत्याच झालेल्या सत्तापालटानंतर 'डीप स्टेट' पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
भारतात इतकी
विविधता, भाषा, प्रांत असतानादेखील आपण एकसंध आहोत. भारतात इतकी राज्ये असूनही
आपण आपले अखंडत्व कायम ठेवले आहे, , ‘ब्रेकिंग इंडिया फोर्स’ आणि जागतिक स्तरावर ‘डीप स्टेट’ भाषिक, प्रांतीय वाद, जातीभेद,
‘कल्चरल मार्क्सिझम’, ‘अफजलखान फॅन क्लब’, ‘खान मार्केट गँग’, ‘वोकिझम’ अशा विविध मार्गांनी एकत्रित
प्रहार करत आहे.
सॉरोसवर
कारवाई करणे जरुरी
ट्रम्प यांनी
जाहीर केले आहे की, जेव्हा ते
सत्तेत येतील, तेव्हा ते अमेरिकेतल्या डीप स्टेटला पूर्णपणे
ध्वस्त करतिल.काही प्रमाणात, जे डीप स्टेट
ट्रम्प यांच्या विरोधात काम करत आहे, तेच भारताच्या विरोधातही सक्रिय आहे. त्यामुळे, जर ट्रम्पनी अमेरिकेतील डीप स्टेटला
नष्ट केले, तर त्याचा लाभ भारतालाही होऊ शकतो.
भारतविरोधी
उपक्रमांना आर्थिक मदत करणारे जॉर्ज सॉरोस यांसारखे उद्योगपतीवर ,भारतविरोधी डीप स्टेटचे हस्तक, ऍक्टिव्हिस्ट किंवा संस्थांवर कायम
लक्ष ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांच्या कारवाया वेळेत
थांबवता येतील.
No comments:
Post a Comment