Total Pageviews

Sunday, 8 December 2024

1971 च्या लढाईमध्ये 7 मराठा लाईट इन्फंट्रीचे योगदान,

 


सात मराठा लाइट इन्फन्ट्री

७ मराठा चे नेतृत्व कर्नल बिडकीकर , टूआयसी होते मेजर फ़ड्निस,कंपनी कमांडर होते मेजर निजामुद्दीन- मंगलोरमेजर जाधवमेजर काखानीसकॅप्टन विजय पाटील. या युद्धात मेजर निजामुद्दीन यांच्या तोंडात गोळी लागली होतीमात्र ते जिवंत राहिले. प्रताप साळुंके यांच्या पायातून गोळी गेलीतरीही त्यांनी नेतृत्व केले.

या युद्धात सात मराठा लाइट इन्फन्ट्रीच्या हवालदार मनोहर राणेपेडलान्सनाईक परशुराम रेवंडकरशिपाई शंकर मानेपेडलान्सनाईक  गणपत पार्चेशिपाई बनसोडेबाबू इंगळे आणि रमेश जगनाडेतुकाराम करांडे आणि बलवान नरकेसुभेदार दौलतराव फडतरेहवालदार बळीराम विचारेलान्स हवालदार रामकृष्ण बोरलीकरपेडलान्सनाईक आशाराम तानपुरेशिपाई  हनुमान कोलपेशिवाजी जगदाळेगणपत सकपाळविठ्ठल शिरसाटअंकुश तारीमनप्पा चव्हाणरामचंद्र देसाईरघुनाथ सावंतव्यंकटराव देशमुखमहादेव परबरमेश इंगवलेबाळकृष्ण जाधवविजय कोतवाल यांनी आपल्या प्राणांचे बलिदान देशासाठी दिले.

युद्ध जरी ३ ते १६ डिसेंबर असे झाले असले तरी प्रत्यक्षात नोव्होंबरमध्येच ७ मराठाने युद्धाला सुरुवात केली होती. युद्धाच्या आधी शत्रुला त्रास देण्यासाठी हल्ला करायचा आणि शत्रुला विश्रांती घेऊ न देण्याचे काम केले. त्यानंतर पाचागडला हल्ला करण्याचा आदेश मिळाला  व २६ तारखेला पाचागडवर हल्ला केला. तिथे पाकिस्तानच्या २ बटालियन तैनात होत्या. पाकिस्तानचे अनेक सैनिक मृत्युमुखी पडले. काहींनी आपले सामान सोडून पलायन केले. युनिटने पाकिस्तानी सैनिक असलेल्या तागाच्या गोदामावर एकसाथ हल्ला केला.  आणि त्यानंतर तेथे कब्जा केला. पाकिस्तान्यांनी पूल नष्ट केले तेव्हा नदीत गळाभर पाण्यातूनही वाटचाल केली.

कांतानगर पुलावर हल्ला करण्यापूर्वी रणगाड्याबरोबर जाऊन हल्ला करून परतायचे असा बेत होता. त्यावेळी  लान्सनायक तुकाराम करांडे यांना शत्रुच्या बॉम्बहल्ल्यात  प्राण गमवावे लागले. मात्र या प्रकारामुळे त्या रात्री जेवण करायची इच्छा होत नव्हती. नंतर पुढे मजल मारलीत्यात विष्णु पाटील लढाईत बेपत्ता होते. ते सापडले नाहीत. तेथून पुढे कांता नगर पुलावर गेलो तेथे पाकिस्तानने पूल तोडला होतो. पाण्यातून वाटचाल केली सकाळी सात वाजता पाकिस्तानी तोफखाना चालू होतातरीही पुढे लढत राहिलो.

या लढाईमध्ये कॅप्टन तांबे यांना सेना मेडलसुभेदार दौलतराव फडतरे यांना सेना मेडल मरणोत्तरहवालदार मनोहर राणे यांना सेना मेडल मरणोत्तर ,शिपाई नारायण मालुसरे आणि शिपाई जानु चव्हाण यांना पण सेना मेडल या पुरस्कारांनी गौरवण्यात आले.

पाकिस्तानी सैन्याने लिहिलेल्या इतिहासामध्ये ७ मराठा लाईट इन्फंट्री चे नाव नोंदवण्यात आले आहे .त्यांनी म्हटले आहे की पाचागड आणि कांता नगर मध्ये ७ मराठाने पुन्हा पुन्हा हल्ला करून आम्हाला हरवले. युद्धानंतर शत्रूच्या एक पूर्ण ब्रिगेडने ७ मराठा लाईट इन्फंट्री समोर आत्मसमर्पण केले. युद्ध संपल्यानंतर देशाचे संरक्षण मंत्री श्री जगजीवनराम ७ मराठा ला भेटण्याकरता खास आले होते.

No comments:

Post a Comment