बांगलादेश मुक्तिसंग्रामात भारतीय
सैनिकांनी दिलेल्या योगदानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरवोद्गार
काढल्याबद्दल बांगलादेशच्या सरकारचे कायदा सल्लागार आसिफ नझरुल यांनी टीका केली .
‘‘भारत त्या युद्धामध्ये केवळ एक मित्र देश होता, आणखी
काही नाही,’’ असा घमेंडखोर दावा नझरुल यांनी फेसबुक
पोस्टमध्ये केला . भारताने १९७१च्या युद्धात
पाकिस्तावर विजय मिळवून बांगलादेशच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली होती.
त्याच्या स्मरणार्थ दरवर्षी १६ डिसेंबरला विजय दिवस साजरा केला जातो.
त्यानिमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर लिहिले होते की,
‘‘आज विजय दिवसाच्या निमित्ताने, आम्ही
१९७१मधील भारताच्या ऐतिहासिक विजयामध्ये योगदान दिलेल्या शूर सैनिकांचे धाडस आणि
त्याग यांचा गौरव करतो.
बांगलादेश सरकारचे मुख्य मुहम्मद
युनुस यांनी नझरुल यांची पोस्ट रिपोस्ट केली. युनुस यांनी सोमवारी ‘विजय
दिवसा’निमित्त भाषण करताना मुजिबुर रहमान यांचा उल्लेख टाळला होता.
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम
मिस्राी ढाक्याच्या दौऱ्यावर 7-8 डिसेंबरला गेले होते .तेथे ते सर्व महत्वाच्या
व्यक्तींना भेटले, मात्र त्यामुळे हिंदुवर होणारा
हिंसाचार कमी झाला नाही.
बांगलादेश आणि भारताचा इंटरनेट करार
रद्द, भारताला धक्का
युनूस सरकारने भारत आणि बांगलादेशमधील
महत्त्वपूर्ण इंटरनेट करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे,
ज्याचा परिणाम भारतातील ईशान्येकडील राज्यांवर होणार आहे.बांगलादेशच्या
इंटरनेट नियामकाने भारतातील ईशान्येकडील राज्यांच्या इंटरनेट पुरवठ्यासाठी
ट्रान्झिट पॉईंट तयार करण्यासाठीचा केला गेलेला करार संपुष्टात आणला आहे.
No comments:
Post a Comment