Total Pageviews

Friday, 8 March 2024

#८ मार्च #महिला दिवसाच्या निमित्याने #स्रियांची सुरक्षा,अवलोकन व ऊपाय योजना

महिलांची सुरक्षितता हा येत्या काळात महत्त्वाचा मुद्दा असेल. त्यामुळेच प्रत्येक कुटुंबियांनी आपल्या घरातील महिला आणि मुली सुरक्षित राहाण्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना करायला हव्यात. कारण प्रत्येक परिसरातील धोके वेगवेगळे असतात. त्या भागात राहाणारे नागिरकच ठरवू शकतात की त्यांच्या भागात महिलांना कोणत्या प्रकारचे धोके आहेत. थोडक्यात आपले कुटुंबिय, सहकारी, शेजारी राहाणारे लोक यांच्या मदतीने महिलांच्या सुरक्षेसाठीचा आपल्या भागा पुरता आराखडा बनवला तर त्याचा वापर करून महिलांना सुरक्षित ठेवता येईल. घटना घडल्यानंतर निदर्शने करून,कँडल मार्च करून काहीही निष्पन्न होणार नाही. आज कृतीशील कारवाईची गरज आहे. 

No comments:

Post a Comment