Total Pageviews

Saturday, 16 March 2024

सुरक्षा बळकट करणारा सेला बोगदा

अरुणाचल प्रदेशातील सेला बोगद्याचे  लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 मार्च 2024 रोजी इटानगर येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे सेला बोगद्याचे  केले लोकार्पण केले.तवांगला जोडणाऱ्या सेला बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. सीमा रस्ते संघटनेने (बीआरओ ) बांधलेला हा बोगदा संरक्षण दलांची सज्जता वाढवेल तसेच सीमावर्ती भागाच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देईल.बोगदा तवांगला सर्व ऋतूंमध्ये कनेक्टिव्हिटी प्रदान करेल आणि लोकांसाठी प्रवास सुखकर करेल.

हा बोगदा बीआरओने अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यातील तवांगला आसामच्या तेजपूरशी जोडणाऱ्या रस्त्यावर फूट उंचीवर बांधला आहे. एकूण 825 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला हा बोगदा बलीपारा - चरिदुआर - तवांग रोडवरील सेला खिंड ओलांडून तवांगला सर्व ऋतूंमध्ये कनेक्टिव्हिटी प्रदान करेल .

आपल्या भाषणात, पंतप्रधानांनी ईशान्य क्षेत्राच्या विकासाप्रति  सरकारची  अतूट  वचनबद्धता व्यक्त केली . ते म्हणाले की ईशान्य प्रदेशात अनेक बोगद्यांचे काम सुरू आहे.सीमावर्ती गावांच्या विकासाकडे यापूर्वी दुर्लक्ष झाले होते,कारण चीनची भिती. हा बोगदा अभियांत्रिकी कौशल्याचा नमुना आहे.उद्घाटन समारंभाला अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू उपस्थित होते.

जगातील सर्वात लांब द्वि-लेन बोगदा 

सेला बोगदा नवीन ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धती वापरून बांधण्यात आला आहे आणि त्यात सर्वोच्च मानकांची सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. हा प्रकल्प या प्रदेशात केवळ  जलद आणि अधिक कार्यक्षम वाहतूक मार्ग प्रदान करणार नाही, तर देशासाठी सामरिकदृष्ट्या देखील तो महत्त्वाचा आहे.

बोगद्याची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते 9 फेब्रुवारी 2019 रोजी करण्यात आली आणि 1 एप्रिल 2019 रोजी बांधकामाला सुरुवात झाली. कठीण भूप्रदेश आणि प्रतिकूल हवामानासारख्या आव्हानांवर मात करून हा बोगदा अवघ्या पाच वर्षांत बांधून पूर्ण झाला आहे. सीमावर्ती भागाच्या विकासात बीआरओ नेहमीच आघाडीवर राहिले आहे. गेल्या तीन वर्षांत, बीआरओ ने 8,737 कोटी रुपये खर्चून  विक्रमी 330 पायाभूत सुविधा प्रकल्प बांधून पूर्ण केले आहेत.

सेला बोगदा हा जगातील सर्वात लांब द्वि-लेन बोगदा आहे. सेला पासच्या 400 मीटर खाली स्थित, सेला बोगदा हिवाळ्याच्या हंगामातही एक महत्त्वाचा रस्ता सुरु ठेवतो. बोगदा भारतिय सैन्याला चीन-भारत सीमेवर सैन्य, शस्त्रे आणि यंत्रसामग्री जलद हलवण्यास मदत करतो. सेला NH 13 शी एका नवीन 12.4 किमी रस्त्याने जोडलेले आहे, ज्यामुळे दिरांग आणि तवांगमधील अंतर 10 किमीने कमी केले आहे. बीआरओने दोन बोगदे बनवले आहे. साधारण १३ हजार ८०० फुट उंचीवर सेला पासच्या खाली दोन बोगदे बनवले गेले. एक बोगदा १७९० मीटर लांबीचा तर दुसरा ४७५ मीटर लांबीचा असून ९८० मीटर लांबीचा आपत्कालीन मार्गही या बोगद्याच्या ठिकाणी बांधला जात आहे. दोन बोगदे एकत्रितपणे सेला खिंडीच्या खालुन जातात . 

जसवंत गढ युद्ध स्मारक, अरुणाचल प्रदेश

1962 च्या चीन-भारत युद्धादरम्यान, महावीर चक्र पुरस्कार विजेते जसवंत सिंग रावत यांनी सेला आणि नूरा नावाच्या दोन स्थानिक मोनपा मुलींच्या मदतीने या पर्वतीय खिंडीत चिनी सैन्याला रोखले . युध्दात नंतर सेला मारली गेली आणि नुरा पकडली गेली. चिनी सैन्याने एका स्थानिकाला ताब्यात घेईपर्यंत रावत यांनी शत्रूला 72 तास रोखून धरले. नंतर चीनला कळाले की ते फक्त एका शुर लढाऊ भारतिय सैनिकाबरोबर सामना करत आहेत. त्यानंतर चिनी सैन्याने केलेल्या हल्यात रावत मारले गेले.  भारतीय सैन्याने जसवंत सिंह यांचे जसवंत गड युद्ध स्मारक बांधले आणि खिंड, बोगदा आणि तलावाला सेला मुलीच्या बलिदानासाठी सेला नाव देण्यात आले. सेला बोगद्याच्या उत्तरेस आणि जंगच्या पूर्वेस २ किमी अंतरावर असलेल्या नुरानांग धबधब्याला नुरा हे नाव देण्यात आले आहे. 

तवांग लष्करीदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण  

भुतान आणि तिबेट ( चीन ) च्या सीमेवरील एक मोठे शहर आणि लष्करीदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण म्हणून तवांगची ओळख आहे. हिवाळ्यात काही महिने तवांगला रस्त्याने पोहचणे अशक्य होते. बर्फ़ पडल्यामुळे तवांगकडे जाणारा ‘सेला पास’ काही महिने बंद असायचे.आता दररोज सुमारे 4,000 सैन्य आणि नागरी वाहने या बोगद्याचा वापर करतील. बोफोर्स तोफांसह सर्व प्रकारची जड लष्करी वाहने आणि लष्करी हार्डवेअरच्या हालचालींना बोगद्याचे परिमाण सपोर्ट करेल.

हा मोक्याचा बोगदा वर्तक प्रकल्पाअंतर्गत बीआरओद्वारे बांधला गेला . बोगदा तेजपूर येथील भारतीय सैन्याच्या IV कॉर्प्स मुख्यालयापासून तवांगपर्यंतच्या प्रवासाच्या वेळेत किमान 10 किमी किंवा 1 तासाने कमी करेल .

बीआरओ  भारत -चीन वास्तविक नियंत्रण रेषेवरील संगेस्टर त्सो (तवांगच्या उत्तरेकडील) ते बुमला पासपर्यंतचा रस्ता सुधारत आहे . NH13 चे रूपांतर 2-लेन रोडमध्ये करण्यात आले आहे. 

सेला पास 4,200 मीटर वर स्थित आहे परंतु दोन बोगदे 3,000 मीटर (10,000 फूट) उंचीवर आहेत. बोगद्यापासून 12.37 किमी लांबीचा नवीन ग्रीनफील्ड रस्ता नुररंग बाजूच्या सध्याच्या बळीपारा-चौदूर-तवांग रस्त्याला भेटेल आणि सेला खिंडीकडे जाणारा हेअरपिन वळणे टाळले जाईल, पासमध्ये 30 वळणे आहेत, त्यामुळे वाहतूक अनेकदा विस्कळीत होते.

हिवाळ्यातील अतिवृष्टीमुळे सेला खिंडीत प्रचंड बर्फ साचतो. त्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद होतो. आता सेला बोगद्यामुळे तवांगकडे जाणारा रस्ते प्रवास अधिक सुरक्षित होईल, पण त्यापेक्षा हिवाळ्यातही तवांगशी संपर्क ठेवणे, शक्य होणार आहे. गेल्या काही वर्षात सीमावर्ती भागात रस्ते वाहतुकीचे जाळे हे मजबूत करण्याचे धोरण अवलंबण्यात आलं आहे, सेला बोगदा हा त्याच कामााचा एक महत्वपूर्ण टप्पा आहे.

सेला बोगद्यामुळे धोकादायक बर्फाच्छादित सेला बायपास करून प्रवाशांसाठी एक सुरक्षित पर्याय मिळेल.हा बोगदा तवांगच्या पर्यटन क्षमतेत भर घालेल आणि अधिक पर्यटकांना आकर्षित करेल आणि तवांग हे ईशान्य प्रदेशातील अधिक लोकप्रिय ठिकाण बनवेल. 

नवीनतम न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (NATM) वापरून बांधण्यात आलेला बोगदा बर्फाच्या रेषेच्या खूपच खाली आहे, ज्यामुळे बर्फ पडुन रस्ता बंद होणार नाही. यामुळे वास्तविक नियंत्रण रेषेच्या भारताच्या विरुद्ध असलेल्या चीनच्या वेस्टर्न थिएटर कमांड बरोबर मुकाबला करण्यासाठी भारतीय सैन्याची क्षमता वाढेल. भारतीय लष्कर वेगाने पुढे पोचेल, चीनला चोख प्रत्युत्तर देऊ शकेल .भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा बोगदा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. 



 

No comments:

Post a Comment