Total Pageviews

Sunday, 24 March 2024

जागतिक सेमी कंडक्टर उद्योगात भारत एक महत्त्वाचा खेळाडू


१.२६ लाख कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाला मंजूरी

सेमी कंडक्टर निर्मितीत भारताने सर्वाधिक प्राधान्य दिले असतानाच केंद्रीय कॅबिनेट मंत्रीमंडळातील बैठकीत सेमी कंडक्टच्या तीन प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली . या प्रकल्पाची किंमत १.२६ लाख कोटी आहे. सरकारकडून हा महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला असून यातील टाटा ग्रुपकडून एक प्रकल्प ढोलेरा गुजरात, दुसरा प्रकल्प मोरीगाव आसाम व सीजी पॉवरकडून साणंद गुजरात येथे बांधला जाणार आहे. १०० दिवसांच्या आत हा प्रकल्प सुरू होणार आहे. प्रकल्प ९१००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याने २०,००० लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

ढोलेरा गुजरातमधील टाटा इलेक्ट्रोनिक प्रकल्प पॉवर चीप सेमी कंडक्टर मॅनुफेक्चरींग कॉर्पोरेशन तैवान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू होणार आहे. प्रस्तावित प्रकल्प चांगल्या गुणवत्तेच्या २८ एनएम चीपची निर्मिती करणार आहेत. ५००० वेफर प्रति महिना क्षमतेची ही प्रकल्प निर्मिती आहे. या वर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, 'एका वेफरमध्ये ५००० चीपची क्षमता असते. या नुसार एका वर्षात हा प्रकल्प ३ दशलक्ष चीपची निर्मिती करणार आहे. या चीपच्या निर्मिती वापर संरक्षण,ऑटो , टेलिकॉम या क्षेत्रासाठी केला जातो .' डेव्हलपमेंट ऑफ सेमी कंडक्टर व डिस्प्ले मॅनुफेक्चरींग इको सिस्टीम' या कार्यक्रमा अंतर्गत या चीपची निर्मिती देशात केली जाईल. या कार्यक्रमासाठी सरकारकडून ७६००० कोटींची मदत होऊन त्यातील ५९००० कोटी रुपये या तीन प्रकल्पासाठी वापरले जाणार आहेत. यातील टाटा कंपनी प्रकल्पात ५०००० वेफर प्रति महिना निर्मिती होणार व एकूण ९१००० कोटींची गुंतवणूक या प्रकल्पात केली जाणार आहे. या शिवाय टाटा सेमी कंडक्टर एसंबली अँड टेस्टटे प्रायव्हेट लिमिटेड (TSAT) मार्फत मोरीगाव आसाम येथे २७००० कोटींचा प्रकल्प सुरू केला जाणार आहे. तिसऱ्या प्रकल्पात ४८ दशलक्ष वेफरची निर्मिती केली जाणार असून या मध्ये ईव्ही , कनज्यूमर इलेक्ट्रोनिक, ऑटोमोटिव्ह, टेलिकॉम, स्मार्टफोन या उत्पादनांसाठी निर्मिती केली जाईल. सीजी पॉवर प्रकल्प हा रेनीसास इलेक्ट्रोनिक कॉर्पोरेशन, स्टार मायक्रो इलेक्ट्रोनिक थायलंड यांच्या साहाय्याने साणंद गुजरात येथे बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाची किंमत ७५०० कोटी रुपये असेल.

भारतीय सेमी कंडक्टरची मागणी 110 अब्ज डॉलर

' मानवी अस्तित्वाच्या प्रत्येक पैलूचे AI-नेतृत्वा खालील डिजिटायझेशनमुळे, सेमी कंडक्टर हा सर्वात महत्वाचा बिल्डिंग ब्लॉक आहे. 2030 पर्यंत, जागतिक सेमी कंडक्टर उद्योग $1 ट्रिलियन पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे आणि भारतीय सेमी कंडक्टरची मागणी 110 अब्ज डॉलर ओलांडण्याची अपेक्षा आहे. "सेमी कंडक्टर उत्पादनात भारताचा प्रवेश लक्षणीय रीत्या जागतिक पुरवठा साखळीत आणि जागतिक सेमी कंडक्टर उद्योगात भारताला एक महत्त्वाचा खेळाडू बनवेल,' जूनच्या अखेरीस कॅबिनेटने मायक्रोन या सुरतमधील सेमी कंडक्टर निर्मिती प्रकल्पाला मान्यता दिली होती. भारताला सेमी कंडक्टर ग्लोबल हाऊस बनवण्यासाठी सरकारकडून हा सेमी कंडक्टर गुंतवणूकीला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहे.

सेमी कंडक्टर आयात ,चीन वरील अवलंबित्व कमी करण्यासाठी

 ‘फॉक्सकॉन’ने ‘वेदांता ’सोबतचा भागिदारी प्रकल्प रद्द केल्याची घोषणा 2023 करताच केंद्र सरकारच्यासेमी कंडक्टर’ योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. हा उद्योग अत्यंत स्पर्धात्मक असून, तो यशस्वी होण्यासाठी कंपन्यांना नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. ‘जागतिक सेमी कंडक्टर बाजारा‘ला चिप्सची कमतरता तसेच वाढत्या खर्चासह अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

भारताचे ‘सेमी कंडक्टर’ धोरण हा एक व्यापक कार्यक्रम आहे. डिसेंबर २०२१ मध्ये धोरण जाहीर करण्यात आले होते.  ज्याचा उद्देश भारताला ’सेमी कंडक्टर डिझाईन’, उत्पादन तसेच चाचणीसाठी जागतिक केंद्र बनवणे, हा आहे.

या क्षेत्रात विदेशी गुंतवणूक आकर्षित करणे, तसेच ज्या कंपन्यांना देशात ‘सेमी कंडक्टर फॅब्स’ची स्थापना करायची आहे, त्यांना प्रोत्साहन देणे; याचा ही यात समावेश आहे. देशातच चाचणी सुविधा उभारणार्‍या कंपन्यांना बळ देऊन चाचणी क्षमता विकसित करणे; प्रशिक्षण देऊन या उद्योगासाठी कुशल मनुष्यबळ उभे करणे, हा ही धोरणाचा एक भाग आहे. अनेक कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखवले आहे.

तथापि , ‘सेमी कंडक्टर फॅब्स’ उभारण्याचा उच्च खर्च तसेच ’सेमी कंडक्टर इकोसिस्टम’चा अभाव ही प्रमुख आव्हाने कंपन्यांसमोर आहेत. भांडवली सबसिडी, कर सूट तसेच संशोधन आणि विकासासाठी निधी यासाठी म्हणूनच केंद्र सरकार प्रोत्साहन देत आहे. ‘सेमी कंडक्टर इकोसिस्टम’ विकासासाठी समर्थन देताना चाचणी सुविधांच्या विकासासाठी , कुशल कामगारांची निर्मिती तसेच संशोधन विकासाला चालना दिली जात आहे. देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. हे धोरण यशस्वी झाले, तर भारत जागतिक उत्पादन केंद्र बनवल, या क्षेत्रात लक्षणीय रोजगार निर्माण करेल.

सेमी कंडक्टर आयात कमी व्हावी; चीन वरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. म्हणूनच भारतात ‘सेमी कंडक्टर’च्या निर्मितीला प्राधान्य दिले जात आहे. नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याबरोबरच पुरवठा साखळीची कार्यक्षमता कशी वाढेल, याची काळजी सरकार घेत आहे. हे धोरण यशस्वीपणे राबवल्या नंतर देशा मध्ये रोजगार, तर मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे, त्या शिवाय अर्थव्यवस्थेला चालना देणार आहे.

 ‘सेमी कंडक्टर’ बाजारपेठ ही जागतिक बाजारपेठ असून, यात उपकरणांची रचना , उत्पादन आणि विक्री यांचा समावेश होतो. संगणक, स्मार्टफोन, ऑटो मोबाईल्स तसेच औद्योगिक उपकरणांमध्ये यांचा वापर होतो . २०२4 ते २०२९ पर्यंत जागतिक ‘सेमी कंडक्टर’ बाजारपेठ १२.२ टक्क्यांच्या चक्रवाढ वार्षिक वाढ दराने वाढेल.

सेमी कंडक्टर क्षेत्रात भारत महासत्ता होणार?

12-Mar-2024 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 1.25 लाख कोटी रुपयांच्या तीन सेमी कंडक्टर प्रकल्पांची पाया भरणी केली. सेमी कंडक्टर चिप उत्पादन भारताला आत्मनिर्भरता आणि आधुनिकतेकडे घेऊन जाईल. सध्याचे एकविसावे शतक हे तंत्रज्ञाना वर आधारित शतक आहे. सेमी कंडक्टरशिवाय त्याची कल्पना ही करता येत नाही . त्यातून भारताला आधुनिकतेकडे नेण्याची क्षमता निर्माण होईल. भारत आता चौथ्या औद्योगिक क्रांती मध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्या साठीच केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी सेमी कंडक्टर मिशन सुरू करण्याची घोषणा केली होती . त्या नंतर वेगवान कार्यवाही करून आज सेमी कंडक्टरचे उत्पादन सुरू होत असून, सेमी कंडक्टरची निर्मिती करणाऱ्या जगातील मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो . भारत प्रगतीसाठी, स्वावलंबनासाठी आणि जागतिक पुरवठा साखळीत आपल्या उपस्थिती साठी सर्वांगीण कार्य करत आहे. भारत अणु आणि अवकाश क्षेत्रामध्ये महाशक्ती आहे. आता लवकरच सेमी कंडक्टरचे व्यावसायिक उत्पादन केले जाईल आणि येत्या काही दिवसांत भारत या क्षेत्रातही महासत्ता बनेल.

या क्षेत्रात ‘इंटेल‘, ’सॅमसंग’ आणि ’टी एसएमसी ’ यांसारख्या कंपन्या नवनवे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी संशोधन आणि विकासासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. चिप्सची कमतरता , वाढती किंमत आणि त्यांची वाढती जटिलता या आव्हानांचा या क्षेत्राला सामना करावा लागत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता , ‘५ जी ’ तसेच ’इंटरनेट ऑफ थिंग्ज’ यां सारख्या नवनव्या तंत्रज्ञानामुळे या बाजारपेठेची मागणी वाढतच आहे. हे लक्षात घेऊनच सरकार ‘सेमी कंडक्टर’च्या निर्मिती साठी प्रोत्साहन देत आहे. या माध्यमातून ’सेमी कंडक्टर’ची जागतिक बाजारपेठ अशी भारताची ओळख जगात होणार आहे. ‘आत्मनिर्भर भारता’चा पुढील अध्याय ‘सेमी कंडक्टर’चाच आहे, यात कोणतीही शंका नाही.

 

 

 

No comments:

Post a Comment