Total Pageviews

Friday 14 July 2023

बांगलादेशी घुसखोरीचा भारतावर परिणाम

दिल्लीमध्ये  २०२० सालापासून दंगली घडत आहे. २०१९ साली सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात बसविण्यात आलेले शाहीनबाग, त्यानंतर २०२० सालात घडविलेली दंगल,२०२० मध्ये कृषी सुधारणा कायद्यांविरोधातील कथित शेतकर्यांचे आंदोलन आणि २६ जानेवारी, २०२१ रोजी घडविलेली दंगली, आता २०२२ सालात जहांगीरपुरीमध्ये झालेली दंगल. यामुळे देशाची राजधानी दरवर्षी हिंसाचारामध्ये होरपळत आहे. यामध्ये नियोजनबद्ध पद्धतीने हिंदू समाजाला घेरून हल्ला केले गेले. या दंगलीद्वारेदेशहिताचे कायदे लागू करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही गृहयुद्धाची परिस्थिती घडवू,’ हा  संदेश देण्यात आला . 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील प्रमुख शहरांमध्ये एकाचवेळी संघर्षाची स्थिती निर्माण करण्यापूर्वीची रंगीत तालीम तर नव्हे?

 बांगलादेशी आणि रोहिंग्या  घुसखोर

दिल्लीतला जहांगीरपुरी  मुस्लीमबहुल आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात बसविण्यात आलेल्या शाहीनबागे मध्येसी ब्लॉक’, कुशल चौकातूनच भारतात बेकायदेशीरपणे राहणार्या  ३०० बांगलादेशी आणि रोहिंग्या  महिला, मुले आणि पुरुषांना नेण्यात आले होते. त्यानंतर जहांगीरपुरीमध्येहीसीएएविरोधी आंदोलनमध्ये महिलांसह लहान मुलांचा वापर करण्यात आला . यावेळीही त्याच भागातून हल्ल्यास प्रारंभ झाला.

 ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा याच काळात झाला.  असेच २०२० साली डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौर्यावेळीही घडविण्यात आले होते.

त्यांना रेशनकार्ड निवडणुकीचे ओळखपत्र मिळवून देण्याचे काम आपलेच अधिकारी करतात. 5 हजाराचे पॅकेज दिले, की त्याला बांगलादेशातून उचलून भारतीय शहरा पर्यंत सारेच काम केले जाते. गेल्या वर्षामध्ये शहरात भारतीय म्हणून स्थायिक होऊ पाहणार्या दीड हजार बांगलादेशी आणि रोहिंग्या  घुसखोरांना विशेष शाखेने अटक केली.

घुसखोरीचे मार्ग प्रकार

 

बांगलादेशी आणि रोहिंग्या  घुसखोरी ही गटागटाने होत असते. बांगलादेश भारतात दोन्ही ठिकाणी त्यांची दलाली करणारेएजंटअसतात. घुसखोरांना भारतात शिरण्यापूर्वीउडिया’, ‘बंगाली’ (शुद्ध), ‘असमियाआणिहिंदीभाषा शिकवण्याची केंद्रेही बांगलादेशाच्या सीमेवर या सरकारने/दलालांनी निर्माण केली आहेत. बांगलादेशींना भारतात घुसविण्यासाठी एजंटांच्या टोळ्या बीएसएफ आणि बांगलादेश रायफल्सशी संधान साधून आहेत. त्यात तो एजंट रेल्वेचे तिकीटही काढतो, सीमापार नेतो आणि पुन्हा आणूनही सोडतो. घुसून आलेले प्रथम पडीक सरकारी जमिनींवर तळ ठोकतात स्वस्त मजूर म्हणून शहरात लोकप्रिय बनतात. या घुसखोरांमुळे होणारा आर्थिक लाभ पाहता, शासकीय यंत्रणेला लाच देऊन त्यांना तेथे स्थायिक होण्यास कंत्राटदार व्यापारी साह्यभूत ठरतात.

घुसखोरीचे परिणाम

 

 महिलांवर बलात्कार करणे, त्यांना पळवून नेणे अवैध व्यापार करणे इत्यादी घटना अनेक बांगलादेशी आणि रोहिंग्या  बहुसंख्य  गावात घडत आहेत. तिरंगा जाळणे, राष्ट्रीय सणात दहशतीचे वातावरण पसरवणे, हेही तिथे घडते. घरफोडया, चोऱ्या आदींचे तर पेव फुटलेले दिसते. कायदा सुव्यवस्था धोक्यात येते हा पहिला परिणाम, तर देशातील कामगारांच्या पोटावर पडणारा पाय हा दुसरा परिणाम.  स्वस्त दरात काम करणाऱ्या बांगलादेशींना जेव्हा येथील व्यापारी कंत्राटदार जवळ करतात, तेव्हा भारतीय मजूर मात्र बेरोजगारीच्या आणि उपासमारीच्या संकटात सापडतो. संपूर्ण भारतात घुसून बसलेल्या बांगलादेशींचा, आपल्या देशावर पडणारा आर्थिक बोजा हा आणखी एक स्वतंत्र परिणाम आहे. त्याची गंभीर दखल घेणे निकडीचे आहे.

त्यांना परदेशातून आर्थिक मदत मिळते. जमिनी खरेदी करण्याच्या उद्योगात ही धनवान मंडळी गुंतली आहेत. ते ओळीने घर विकत घेत नाहीत वा शेतीही तशी घेत नाहीत. मधील एक दोन शेत, घर वगळता ते आजूबाजूची घरे, शेती विकत घेतात. त्यामुळे दोन घुसखोरांत भारतिय सापडतात. मग या घुसखोरांच्या लीला सुरू होतात आणि त्याला कंटाळून, शेती वा घर त्यांनाच विकून माणसे मोकळे होतात.

भारतिय विस्थापित होतो आणि घुसखोर प्रस्थापित होतो. अशा प्रकारे भारतात जनसांख्यिकीय आक्रमण सुरू झाले आहे. त्याची चिंता ना राजकिय पक्षाना ना नोकरशाहीला ना सामान्य जनतेला.

बांगलादेशींना मदत करणार्या स्लीपर सेलसना शोधणे सर्वात महत्वाचे

 

एखादा  अतिरेकी भारतात काही घातपात करतो तेव्हा त्याला भारतातले पत्ते, महत्त्वाची ठिकाणे, वाहतुकीच्या सोयी, पासपोर्ट, मोबाईल कार्ड, फोन, राहण्याची जागा इत्यादी गोष्टी आपोआप मिळत नाहीत. कोणी तरी स्थानिक व्यक्ती त्यांना मदत करत असतेच. माहिती देत असते म्हणूनच या घातपाती कारवाया यशस्वी होतात.  अशी मदत करण्यासाठी कार्यरत असणार्या संघटनांच्या अड्डय़ांना  स्लीपर सेल म्हटले जाते. पोलीस हे सेल उद्ध्वस्त करण्याचा म्हणावा तसा प्रयत्न करत नाहीत, त्यात काम करणारे लोक अनेकदा उघडपणे काम करूनही मोकळे राहतात,काही वेळा या स्लीपर सेल्सचे स्वरूपच असे काही असते की त्यांना अटक करणे राजकिय कारणामुळे शक्य होत नाही. स्लीपर सेल हे दहशतवादी संघटनांना मदत करणारे एक जाळेच असते.

स्लीपर सेलचा सदस्य कधीच उघड होत नाही. अशा स्लीपर सेलच्या छुप्या हालचाली टिपण्याचे काम फार बारकाईने करावे लागते. या करता पोलिसांना सतत जागरूक रहावे लागते. एखाद्या वस्तीत नवा आलेला माणूस कोण आहे, कोणत्या वस्तीतली काही मुले एकदम बेपत्ता झाली आहेत, एखादा तरुण मध्येच काही दिवस बेपत्ता होऊन एकदम उगवला आहे, तेव्हा तो कोठे होता, त्याबाबत लोक काय बोलतात अशा बारीक-सारीक माहितीवर सतत लक्ष ठेवावे लागते. या दृष्टीने प्रत्येक पोलीस ठाण्यावर दोन दोन खास प्रशिक्षण दिलेले पोलीस नेमण्यात यावेत. त्या परिसरात असा एखादा स्लीपर सेल कार्यरत आहे का आणि असला तर त्या दृष्टीने काही छुप्या हालचाली होत आहेत का यावर लक्ष ठेवणे हे त्यांचे एकच काम असावे. 
स्लीपर सेलचे सदस्य आपापला व्यवसाय करत असतात.  तो एखाद्या स्लीपर सेलचा सदस्य आहे याचा पत्ता कोणालाही लागत नाही. भारतात असे २५०-३०० स्लीपर सेल .या स्लीपर सेल्सचे २०००-२५०० सदस्य असावेत .आता हे स्लीपर सेल उद्ध्वस्त करायचे आहे.


घुसखोरी करून भारतात आलेल्या बांगला देशी घुसखोरांना त्यांची ओळख पटवून त्यांच्या देशात परत पाठवले पाहिजे आणि या लोकांना भारतात राजकीय आणि अन्य सर्व प्रकारचा आश्रय देणार्यांविरुद्ध, मग ते राजकीय नेते असले तरी, राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. बांगलादेशी समर्थकांनवर कारवाइ करणे जास्त महत्वाचे आहे.

No comments:

Post a Comment