Total Pageviews

Monday, 3 July 2023

#नेपाळी गोरखा #वॅग्नर ग्रुपच्या खासगी सैन्यदलात?#तिबेटन सैनिकांची चिनी स...

ग्नर ग्रुप आणखी वाढत असून, जगाच्या अनेक भागांतून या ग्रुपमध्ये भरती सुरू असल्याचे समोर आले आहे. नेपाळचे नाव यामध्ये घेतले जात आहे. ‘फर्स्टपोस्ट’च्या लेखानुसार नेपाळमधील लोकप्रिय गोरखा योद्धे वॅग्नर ग्रुपमध्ये मोठ्या प्रमाणात सामील होत असल्याची बाब समोर आली आहे. नेपाळमधील योद्ध्यांना मॉस्कोत जायची गरज का भासली? रशियाच्या खासगी सैन्यदलात भरती होण्याचे काय फायदे आहेत? आणि याचा भारताशी संबंध काय? याबाबत घेतलेला हा आढावा…
वॅग्नर ग्रुपमध्ये गोरखाची भरती?
‘फर्स्टपोस्ट’च्या लेखातील माहितीनुसार, गेल्या काही काळात नेपाळमधील गोरखा रशियामध्ये जाऊन पीएमसी वॅग्नर ग्रुपमध्ये सामील झाले आहेत. किती नेपाळी युवकांनी रशियाच्या खासगी सैन्यदलात सामील होण्याचा निर्णय घेतला? याची आकडेवारी समोर आलेली नाही. पण, नेपाळी युवक रशियात जात आहेत, हे उघड सत्य आहे.
गोरखा हे नेपाळमधील योद्धे म्हणून ओळखले जातात. अनेक शतकांपासून त्यांनी आपल्या युद्धकौशल्याने पराक्रम गाजवला आहे. ‘भेकडाप्रमाणे जगण्यापेक्षा मृत्यू बरा’ हे गोरखांचे घोषवाक्य आहे. यावरून त्यांची रणांगणातील धाडसी वृत्ती दिसून येते. गोरखांच्या या शौर्यामुळेच अनेक वर्षांपासून नेपाळमधील युवकांना ब्रिटिश आणि भारतीय सैन्यदलात अधिकृतपणे प्रवेश दिला जातो. १८१५ सालापासून नेपाळी युवक गोरखा योद्धा म्हणून ब्रिटिशांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहेत. त्यावेळी त्यांना ब्रिटिश गोरखा म्हटले जात असे. हीच प्रथा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही सुरू राहिली. भारतीय सैन्यदलात इंडियन गोरखा म्हणून त्यांचा समावेश होतो. गोरखांच्या लोकप्रियतेमुळे काही वर्षांपासून चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’मध्येही गोरखांची भरती केली जात आहे.
आताही रशिया आणि नेपाळमध्ये याबाबत काही अधिकृत करार झालेला नाही. पण, अनेक नेपाळी युवक रशियातील खासगी सैन्यदलात भरती होण्यासाठी जात आहेत. नेपाळ सैन्यदलातून निवृत्त झालेल्या एका सैनिकाने परराष्ट्र विभागातील अधिकाऱ्याला सांगितले की, दुबई येथे खासगी सुरक्षा रक्षक म्हणून काम केल्यानंतर त्याने मॉस्कोमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मॉस्कोमध्ये पर्यटक म्हणून गेल्यानंतर तिथे जाऊन रशियाच्या खासगी सैन्यदलात सामील झालो, अशी माहिती त्याने दिल्याचे ‘फर्स्टपोस्ट’ने नमूद केले आहे. तसेच ‘वॅग्नर’मध्ये सहभागी होणारा हा एकटाच गोरखा नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडीओंमधून नेपाळी युवकांनी रशियात सैन्याशी संबंधात प्रशिक्षण घेतले असल्याचे दिसून आले आहे.
‘वॅग्नर’मध्ये भरती होण्याचे कारण काय?
पण नेपाळी गोरखांना रशियात जाऊन खासगी सैन्यदलात भरती होण्याची गरज का भासली, या प्रश्नाचा शोध घेतल्यास काही महत्त्वाची कारणे समोर येतात. सर्वांत पहिले म्हणजे १६ मे रोजी रशियाने रशियन नागरिकत्व प्राप्त करण्याच्या नियमांमध्ये शिथिलता आणली. जे लोक रशियन सैन्यदलात किमान एक वर्षासाठी सेवा देतील त्यांच्यासाठी नागरिकत्वाची प्रक्रिया अधिक सोपी केली जाईल, असे रशियाने जाहीर केले आहे. रशियाने केलेल्या नव्या कायद्यानुसार जी व्यक्ती किंवा ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती रशियन सैन्यदलात सेवा देतील, त्यांना रशियन नागरिकत्व बहाल केले जाईल. त्यासाठी त्यांचा रहिवासी परवाना विचारात घेतला जाणार नाही.

No comments:

Post a Comment