चीनच्या धोरणाला विरोध
तिबेटी सैनिकांची भरती करण्यासाठी चीनने आपल्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना कामाला लावले. प्रत्येक कुटुंबातील किमान एक सदस्याची भरती केली जात आहे, कारण चीनला असे वाटते की असे करून ते तिबेटी कुटुंबांना चीनशी एकनिष्ठ बनवण्याचा प्रयत्न करू शकतील.
मागील वर्षी गलवानमध्ये भारतीय सैन्याबरोबर (Indian Army) चीनच्या सैन्याची चकमक उडाली होती. त्यात भारतीय सैनिकांनी चीनी सैनिकांना (Chinese Army) चांगलाच धडा शिकवला होता. त्यानंतर चीनी सैन्याने भारतीय सैन्याशी थेट भिडण्याचे टाळले आहे. मात्र आपल्या डावपेचांमध्ये बदल करत चीनी सैन्याने (PLA)आता तिबेटी (Tibtan) जनतेला पुढे करण्याचे ठरवले आहे. भारताविरुद्ध तिबेटींना हत्यारासारखे वापरण्याचा चीनचा (China) डाव आहे. यासाठी चीन आता तिबेटमधील तरुणांची सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भरती करतो आहे. (China's new tactics, issues an order to Tibet to recruit one person from every household in PLA)
प्रत्येक घरातून एका व्यक्तीला सैन्यात पाठवा
एका आघाडीच्या मासिकात देण्यात आलेल्या माहितीनुसार चीनने तिबेटमध्ये राहणाऱ्या सर्व कुटुंबांना एक आदेश दिला आहे. या आदेशानुसार प्रत्येक घरातील एका व्यक्तीला पीपल्स लिबरेशन आर्मीमध्ये भरती होण्यास सांगण्यात आले आहे. या तिबेटी तरुणांना मिलिटरी ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांना लडाख, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशमधील भारत-चीन सीमेवर तैनात केले जाणार आहे.
अनेक पातळ्यांवर होणार तिबेंटींच्या प्रामाणिकपणाची चाचणी
समोर आलेल्या माहितीनुसार चीनी सैन्यात भरती करण्यापूर्वी तिबेटींना (Tibetan) अनेक पातळ्यांवरील चाचण्यांना सामोरे जावे लागणार आहे. या चाचण्या तिबेंटींचा चीनबद्दलचा प्रामाणिकपणा तपासून घेण्यासाठी करण्यात येणार आहेत. या चाचण्यांअंतर्गत तिबेटींना चीनची (China) मंडारिन भाषा शिकावी लागेल. तिबेट हा चीनचाच एक अविभाज्य अंग आहे हे तिबेटींना मान्य करावे लागेल. शिवाय चायनीज कम्युनिस्ट पार्टीला (CCP)आपल्या धारणांमध्ये सर्वोच्च स्थान द्यावे लागणार आहे.
चीनने यामुळे घेतला हा निर्णय
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीनने तिबेटींचा समावेश आपल्या सैन्यात करण्याचा निर्णय अनेक कारणांना डोळ्यासमोर ठेवून घेतला आहे. यामध्ये सर्वात पहिले कारण हिमालयातील अतिशय थंड आणि प्रतिकूल हवामान आहे. चीनी सैनिकांना या हवामानाला आणि परिस्थितीला तोंड देणे अवघड जाते आहे. त्याउलट तिबेटी मात्र या परिसरातील निवासी आहेत. त्यामुळे या हवामानातच ते वाढलेले असल्यामुळे त्यांना या हिमालयात वावरण्यासाठी वेगळ्या तयारीची आवश्यकता नसते. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे चीनवर सध्या वाढत असलेला आंतरराष्ट्रीय दबाव कमी करणे हे आहे. तिबेटींचा समावेश चीनी सैन्यात करून भारताविरोधात एक खास मोहिम चालवण्याचा चीनचा प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये जर तिबेटी सैनिक मारले गेले तर चीन सहजपणे जगाला सांगू शकेल की आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी तिबेटी शहीद झाले आहेत
No comments:
Post a Comment