Total Pageviews

Friday, 24 May 2019

पाकमध्ये धूर आणि जाळ महा एमटीबी -पाकिस्तानमधल्या प्रमुख वर्तमानपत्रांमधील संपादकीय आणि प्रमुख लेख मोदींवरच -TARUN BHARAT-

पाकिस्तानमधल्या प्रमुख वर्तमानपत्रांमधील संपादकीय आणि प्रमुख लेख मोदींवरच लिहिलेले होते, म्हणजे ते मोदींच्या नावाने सुरू झाले आणि रा. स्व. संघाच्या नावाने संपले. आश्चर्यकारकरित्या या सर्व लेखांमध्ये जे लिहिले आहे, त्याचे साम्य ‘भारत तेरे तुकडे होंगे’ म्हणणारे जे ढोंगी निधर्मीवादी आहेत, त्यांच्या विचारांशी आहे.

नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान झाले आहेत. पण, ‘मोदी पुन्हा सत्तेत आले तर आत्महत्या करू, देश सोडू’ वगैरे वगैरे म्हणणारे, मोदींना पर्यायाने भाजपला मतदान करू नये म्हणत सह्यांची मोहीम राबविणारे ते पैसापुजारी कलाकार, साहित्यिकही कुठे फरार झाले देव जाणे?विरोधी पक्ष नेहमीप्रमाणे इव्हीएम वगैरे बोंबलत आहेतच. पण, मोदी विरोधकही ‘काय बोलावे, काय नाही’च्या पावित्र्यात सुन्न आहेत.अत्यंत बोलके असणारे वाक्पटू कौशल्यकाराने केवळ एकच शब्द उच्चारला ‘अनाकलनीय.’ पण हे देशाचे झाले, बाजूच्या पाकिस्तानला याचे काय? पण, पाकिस्तानला याचे खूप काही आहे. भारतामध्ये होणाऱ्या निकालांचा जणू काही पाकिस्तानलाच फायदा-तोटा होणार आहे, अशा आविभार्वात पाकिस्तानच्या तमाम वर्तमानपत्रांनी प्रतिक्रिया दिल्या आहेतपाकिस्तानचा जीव आजही भारतात गुंतला आहे का? असू शकते. पण, छे! हा पाकिस्तानी जीव फरिश्त्याचा नसून सैतानाचा आहे, हे सुद्धा सत्यच आहे. असो, पाकिस्तानी वर्तमानपत्रांमध्ये मोदींचा विजय अत्यंत काळजीचा विषय आहे. या वर्तमानपत्रामध्ये मोदींना दक्षिण आशिया खंडामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. काय गंमत आहे, शांततेचे आवाहन कुणी करायचे, तर नेहमी प्रत्येक शेजारी राष्ट्राची कुरापत काढणाऱ्या पाकिस्तानने?पाकिस्तानमधल्या प्रमुख वर्तमानपत्रांमधील संपादकीय आणि प्रमुख लेख मोदींवरच लिहिलेले होते, म्हणजे ते मोदींच्या नावाने सुरू झाले आणि रा. स्व. संघाच्या नावाने संपले. आश्चर्यकारकरित्या या सर्व लेखांमध्ये जे लिहिले आहे, त्याचे साम्य ‘भारत तेरे तुकडे होंगे’ म्हणणारे जे ढोंगी निधर्मीवादी आहेत, त्यांच्या विचारांशी आहे. या वर्तमानपत्रांचे संपादक हे आपल्या देशामध्ये देशविघातक असंतोष निर्माण करणाऱ्या तथाकथित विद्रोही, तथाकथित पुरोगाम्यांचे प्रशिक्षक असावेत किंवा हे उठसूठ विद्रोह, दंगल माजवू पाहणारे आपल्या इथले तथाकथित पुरोगामी विचारवंत हे पाकिस्तानी संपादकांचे प्रशिक्षकच असावेतअसे वाटावे इतके या दोघांच्या विचारांचे साम्य!
 
उदाहरणार्थ ‘द न्यूज’ या पाकिस्तानी वर्तमानपत्राने लिहिले की, हिंदू समुदायाला एकत्रित करत मुस्लीमविरोधी भावना भडकावत ही भगवा पार्टी लोकशाही संविधान आणि विविध प्रशासकीय संस्थेचे स्वरूप पूर्ण बदलेल. निवडणूक आयोग, न्यायपालिका, विद्यापिठे या सर्वांमध्ये रा. स्व. संघाचा हस्तक्षेप आहे आणि येणाऱ्या कालावधीत मोदी सरकारचा यांवरचा प्रभाव आणखी वाढेल आणि या घटकांवरचे मुस्लीम आणि इतर अल्पसंख्याकांचे प्रतिनिधित्व कमी होणार आहे.” ‘डॉन’ या पाकिस्तानच्या प्रमुख वर्तमानपत्राचे संपादकीय होते, “भारतात जातीयवादी राजकारणाचा विजय झाला आहेधार्मिक द्वेष आणि तेढ निर्माण करत मोदी सरकार सत्तेवर आले आहेमुस्लीम आणि पाकिस्तानचा द्वेष करून मोदी विजयी झाले आहेत.” ‘द न्यूज’ च्या एका दुसऱ्या लेखात एक लेखक म्हणतो की, “हे खूप निराशजनक आहे की मोदी जिंकलेत आणि ते वैचारिकदृष्ट्या भारताला ‘धर्मनिरपेक्षता’ या मूल्यापासून दूर नेणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताची नियती बहुसंख्याकांनुसार बदलणार आहे.” बघा वाटले ना की, हे आपल्या इकडचे काही डावे पुरोगामीच बोलत आहेत म्हणून? असो. पण,संविधानाची आणि धर्मनिरपेक्ष मूल्यांची काळजी घेणारे लेखन कुणी केले आहे तर पाकिस्तानी संपादकांनी! त्या संपादकांनी, ज्यांच्या देशात मानवी मूल्यांना जहाल धर्माच्या टाचेखाली चिरडले गेले, ज्यांच्या देशात ‘मुस्लीम राष्ट्र’ म्हणत धर्मनिरपेक्षतेचे मूल्य शरिया आणि कुराण, तसेच आता जिहादच्या दावणीला बांधले आहे त्या वर्तमानपत्रांनी. मुद्दा हा आहे की, आपल्या देशात भाजपविरोधी किंवा मोदीविरोधी आणि या सर्वांच्या आड रा. स्व. संघाच्या विरोधकांनी ‘भाजप जिंकला’ म्हणून जळफळाट केला तर समजू शकतो. पण, पाकिस्तानमध्ये इतका जळफळाट का व्हावा? इव्हीएममध्ये खरंच बिघाड होता की कायकी इथे नरेंद्र मोदी भाजप जिंकले आणि तिकडे पाकिस्तानात धूर आणि जाळ सोबतच झाला

No comments:

Post a Comment