Total Pageviews

Friday, 17 May 2019

नरेंद्र मोदी: दुफळी निर्माण करणारा प्रमुख नेता’ ‘टाईम’ मासिकातून मोदींवर ताशेेरे


भारतात निवडणूकांचे दोन टप्पे शिल्लक असताना जागतिक व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना दुफळी निर्माण करणारा नेता असे उथळ शीर्षक देऊन खळबळ माजवण्याचा प्रयत्न केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेतील जगप्रसिद्ध असणाऱ्या टाईम मासिकामध्ये झळकले आहेत. मात्र मासिकामध्ये दुफळी निर्माण करणारा भारतातील प्रमुख नेता, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. नेहमी प्रमाणे मोदींवर चिखलफेक करण्यासाठी आंतरराष्ट्रीय शक्तीचा विकृत प्रयत्न आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापक कट काय असतो ते पहा.

कोण आहे मोदींवर नरेंद्र मोदी: दुफळी निर्माण करणारा प्रमुख नेताअशी कव्हर स्टोरी करणारा पत्रकार?

म्हैसूरला जन्म झालेल्या तवलीन सिंग या स्त्री लेखिका आहेत.The Statesman, The Telegraph, Sunday Times,  India Today, The Indian Express इत्यादी नियतकालिके आणि माध्यम संस्थांमधून त्यांनी पत्रकार म्हणून काम केले आहे. तवलीन सिंग यांची पाकिस्तानी राजकीय नेते आणि उद्योगपती सलमान तासीर यांच्या एका कार्यक्रमात भेट झाली, भेटीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न केले. मोदींवर टाइम्स मध्ये पूर्वग्रहदूषित कव्हर स्टोरी करणारा अतिष तासिर हा यांचा मुलगा.

पुढे तवलीन सिंग आणि सलमान तासिर यांचे वैयक्तीक आयुष्यात बेबनाव झाले. सलमान तासिर यांचे इतर महिलांशी असलेली जवळीक हे त्यांच्यातील बेबनवाचे कारण असल्याचे बोलले गेले. पुढे सलमान आणि तवलीन वेगळे झाले. मुलगा अतिष आई सोबत दिल्लीत राहू लागला. पाकिस्तानी उद्योगपती आणि राजकारणी असलेल्या सलमान तासिर यांनी दुसरे लग्न केले त्यांना सहा अपत्य झाले.

पुढे तवलीन सिंग यांची ओळख मोठे धनाढ्य उद्योगपती अजित गुलाबचंद यांच्याशी झाली. Hindustan Construction Company या मोठ्या कंपनीचे मालक आहेत. मुंबईतील अतिशय श्रीमंत लोकांचा रहिवास असलेल्या मरीन ड्राइव्ह या भागात दोघांचे एकत्रित वास्तव्य आहे. त्यासाठी तवलीन सिंग दिल्लीहून मुंबईत वास्तव्यास आल्या. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला परंतु लग्न न करता दोघे लिव्ह इन मध्येच राहिले. मुलगा अतिष आता जगप्रसिद्ध टाईम मॅगझीन मध्ये कार्यरत आहे. दिल्ली आणि लंडन मध्ये त्याचे वास्तव्य असते.

अजित गुलाबाचंद हे भारतीय उद्योग जगतातले मोठे प्रस्थ सोबतच सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकीचे चेरमन सुद्धा आहेत. या सगळ्या प्रकरणात गंमत अशी की अजित गुलाबचंद आणि आदरणीय शरद पवार यांचे अर्थपूर्ण मैत्रीचे संबंध आहेत. २००१ मध्ये शरद पवारांनी आपल्या भव्यदिव्य स्वप्नासाठी पुण्यालगतची १० हजार एकर जमीन लवासा साठी महाराष्ट्र सरकार कडून मंजूर करून घेतली. या लवासा सिटी प्रोजेक्ट मध्ये शरद पवारांचे जावई सदानंद सुळे २००७ पर्यंत १२.५ % चे भागीदार होते. शरद पवार, अजित गुलाबाचंद, सदानंद सुळे, अनिरुद्ध देशपांडे आणि इतर असे लोक लावसा प्रकल्पात सामील होते. पुढे लवासा बारगळा खूप मोठे वादंग निर्माण झाले आदिवासींच्या जमिनी कवडीमोल भावात लुटल्या गेल्याची तुफान चर्चा माध्यमात झाली.

बघा, तारा कशा जोडल्या जातात ते! पाकिस्तानी राजकारणी नेते सलमान तासिर त्यांच्याशी लग्न करणाऱ्या तवलीन सिंग, कव्हर स्टोरीचा लेखक त्यांचा मुलगा अतिष तासिर, पुढे अजित गुलाबचंद आणि त्यांचे मित्र शरद पवार.. टाइम्स मध्ये छापून आलेला लेख हाच व्यापक कटाचा भाग आहे, कुमार केतकर सारखे रमणेबाज उगाच व्यापक कटाच्या कांड्या सोडत असतात. व्यापक कट काय असतो ते या प्रकरणात सिद्ध झाले आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांचा कसा वापर केला जातो आणि भारतीय निवडणुकांवर कसा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होतो याचे हे उत्तम उदाहरण. चालायचंच यालाच तर राजकारण म्हणतात.. पण समाज माध्यमं आता इतकं शक्तिशाली झालं आहे की प्रत्येक माहिती लोकांपर्यंत पोहोचते आहे.. नरेंद्र मोदींना दुफळी निर्माण करणारा प्रमुख नेता म्हणून खळबळ माजवण्याचा प्रयत्न थेट अमेरिकेतून केला जातो.. नरेंद्र मोदी सबका साथ सबका विकास म्हणून मार्गक्रमण करत आहेत; असेले कट ते रचणाऱ्यांवरच जनता उलटवेल! तूर्तास वाट पाहू २३ मे ची, समर्थ बलशाली भारताची!
5/11/19, 12:29 PM - +91 95616 88881: *INTEGRATOR-IN-CHIEF:* * Narendra Modi has acted as a National Uniting Catalyst for *
( 1 ) anti-nationals
( 2) black-money holders
( 3 ) provincial parties
( 4 ) power brokers
( 5 ) multi communalists
( 6 ) Pro - Pakistanies
( 7 ) Congress-disintegrators
(8) Sycophants of Nehru - Gandhi Dynasty
(9) Naxalites
( 10 ) Muslim League & Rahul - Priyanka Congress
( 11 ) Nationalists
( 12 ) Sangh Parivar

*(DILIP DEODHAR, +91-95616-88881)*

No comments:

Post a Comment