Total Pageviews

Friday, 17 May 2019

खानदानी_भ्रष्टाचारी_नंबर_वन डिसेंबर 1987.- सूरज उदगीरकर.




कोचीनपासून पश्चिमेला साडेचारशे किमी अंतरावर लक्षद्वीप बेट समूह आहे. नितांत सुंदर बेटं आहेत. निळाशार समुद्र, चंदेरी शुभ्र वाळू, स्वच्छ शुद्ध हवा आणि हिरवीगार झाडी. अश्या जागी सुट्टी घालवायला जाणे कोणाला आवडणार नाही? तुम्हाला आम्हाला जायला आवडेल तसं देशाच्या पंतप्रधानाला देखील जायला आवडेलच ना? म्हणून 1987 सालच्या डिसेंबर महिन्यात तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी ह्यांनी लक्षद्वीप बेटांमधल्या "बंगारम" बेटावर सुट्टी घालवण्याचे ठरवले.

ह्या सहलीत सहभागी कोण कोण होते? तर राजीव-सोनिया, राहूल, प्रियांका आणि त्यांचे 4 मित्र-मैत्रिणी, अमिताभ आणि जया बच्चन, त्यांची मुले, अजिताभ बच्चन ह्यांची मुलगी, सोनिया गांधींच्या आई, सोनिया गांधींच्या बहीण व भाऊजी आणि त्यांची मुलगी, सोनिया गांधींचा भाऊ आणि सोनिया गांधींचा मामा तसेच दोघे तिघे इतर परदेशी व्यक्ती!

माध्यमांना ह्या सहलीबद्दल काहीही थांगपत्ता लागू नये म्हणून सरकार तर्फे कसोशीने प्रयत्न झाले पण काही ना काही कारणास्तव ही माहिती पत्रकारांच्या हाती लागत गेली. पत्रकारांना पहिला सुगावा लागला तो 26 डिसेंबर रोजी जेंव्हा राहूल आणि त्यांचे 4 दोस्त लक्षद्वीप प्रशासनाच्या हेलिकॉप्टरमधून उतरले तेंव्हा!

30 डिसेंबरच्या दुपारी राजीव आणि सोनिया बंगारमला पोचले. दुसऱ्या दिवशी स्टार गेस्ट अमिताभ बच्चन कोचीन-करवटी(लक्षद्वीपमधले अजून एक बेट) स्पेशल हेलिकॉप्टरने तिथे पोचले. फक्त एका माणसासाठी सरकारी हेलिकॉप्टर वापरले गेले. ते ही असा माणूस ज्याच्या सख्ख्या भावावर करोडोंच्या घोटाळ्याचा ताजा ताजा आरोप होता.(अजिताभ बच्चन)

ह्या सहलीसाठी अनेक स्वैपाकी बेटावर तैनात केले गेले. बाजूच्या अगट्टी बेटावर 100 कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म उघडला गेला. 100 ब्रेडच्या लाद्या, 300 मिनरल वॉटरच्या बाटल्या, शितपेयांचे 40 क्रेट्स, अमूल चीज-बटर, बासमती तांदूळ, पीठ, ताज्या भाज्या, ताजे मासे इत्यादी उपलब्ध करण्यात आले. शिवाय पपई, चिकू, मोसंबी इत्यादी फळे देखील मागवण्यात आली.

जोडीला कॅडबरी चॉकलेट्स, उंची दारू आणि वाईन्स देखील होत्या बरं! आणि हे सगळं 3 वेळा पोचवण्यात आलं.

राजीव गांधी आणि इतर जण बेटावर वाळूत खेळायचे, पाण्यात पोहायचे, इतर बेटांवर फिरायचे पण सोनिया मात्र दम्याचा त्रास असल्या कारणाने आईशी गप्पा मारत काचेच्या बोटीतून समुद्र पहायच्या.

एवढं ठिकाय पण खाजगी सुट्टीसाठी राजीव गांधी साहेब चक्क INS विराट घेऊन गेले! युद्ध नौका! आणि एखादी युद्धनौका एकटीच संचार करत नसते. तिच्यासह इतर डिस्ट्रॉयर जहाजे देखील असतात. हा सगळा लावाजमा घेऊन गांधी साहेब बायका-लेकरांसकट, इटलीच्या सासुरवाडीच्या नातेवाईकांसकट, इतर पाहुण्यासह दारू पीत बीचवर लोळायला, पोहायला न् मजा मारायला गेले!

एवढं कशाला? बाजूच्या अगट्टी बेटावर एक सॅटेलाईट लिंक देखील बसवण्यात आली!

=========

वाह! काय पंतप्रधान!

वास्तविक सुट्टी कोणासोबत, कुठे आणि कशी साजरी करावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. राजीव गांधी मायनो आणि बच्चन खानदानाला घेऊन लक्षद्वीपला जावोत की चंद्रावर जावोत. कोणाला फारसा आक्षेप असण्याचं कारण नाही.

पण युद्ध नौका? देशाची सुरक्षा सोडून एक मुख्य युद्धनौका डिस्ट्रॉयर जहाजांसह अरबी समुद्रात पश्चिम किनाऱ्याची सुरक्षा वाऱ्यावर सोडून ह्या राजीव गांधी नामक माणसाला आणि त्याच्या फुकटछाप पाहुण्यांना सोडायला लक्षद्वीपला गेली! का? ही ब्याद पंतप्रधान होती म्हणून? कोणी हक्क दिला?

सोनिया गांधी देखील मनमोहन सरकारच्या काळात सैन्याच्या हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करत. कुठल्या हक्काने? एक सामान्य सांसद सोडून काय अशी योग्यता होती त्यांची?

युद्धनौकेचा दर दिवशीचा खर्च किती असेल? सॅटेलाईट लिंकचा खर्च? देशाच्या पंतप्रधानाचा पगार किती असतो? ठिकाय, बाप जादे श्रीमंत असतील पण म्हणून युद्धनौका काय भाड्याने मिळणारं होडकं आहे का?

राजीव गांधी आणि एकूणच सगळे गांधी देशाला बापाची जागिर समजायचे की काय? कोण कुठचं मायनो आणि बच्चन खानदान? देशाच्या नागरिकांच्या कराच्या, मेहनतीच्या पैशातून दारू धोसायला देशाच्या युद्धनौकेतून जातात म्हणजे काय?

राहूल आणि प्रियांकाचे दोस्त, सोनिया गांधींचे इटलीचे नातेवाईक कुठल्या लायकीनुसार युद्धनौकेवर प्रविष्ट झाले? का झाले?

बाकी बोफोर्स आरोप, अँडरसनला पळवणे, भोपाळ गॅस दुर्घटना, 1984चे शीख हत्याकांड वगैरे जाज्वल्य कारकीर्द आहेच युवराजांची...

राजीव गांधी पंतप्रधान होते, मालक नव्हते देशाचे! हेच मोदींनी केलं असतं तर?

आणि अमिताभ बच्चन ही एक केस झाली. असे किती फुकट सेलेब्रिटी आणि पत्रकार पोसले असणार काँग्रेसी लोकांनी?

दूरदर्शनच्या त्या सिनिअर पत्रकाराचा व्हिडीओ आठवतो? कश्या प्रकारे हे लुटयेन्सचे फुकटछाप पत्रकार सरकारी खर्चावर बिझनेस क्लासमध्ये फॉरेन दौरे मारत आणि फाईव्ह स्टार हॉटेलात राहून, ब्लॅक लेबल ढोसून परराष्ट्र मंत्रालयाच्या पैशावर विदेश फिरत असत. ह्या पत्रकारांना महागड्या भेटवस्तू आणि ब्लॅक लेबलच्या बाटल्या मिळत. ही पत्रकार आणि सेलेब्रिटी पोसायची संस्कृती काँग्रेसने रुजवलीय. मग गांधी नेहरू खानदानाचे पोवाडे गाऊन ते खाल्ल्या मिठाला आणि ढोसल्या दारूला जगतात त्यात नवल ते काय?

एकदा एका इंटरव्ह्यूमध्ये बरखा दत्त बोलता बोलता म्हणते की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आम्हा पत्रकारांना विदेशात त्यांच्या विमानात नेतच नाहीत, हवं तर त्यांनी आमच्याकडून पैसे घ्यावेत. हवं तर पैसे घ्यावेत म्हणजे इतकी वर्षे फुकटछाप प्रवास व्हायचा ही कबुली नव्हे काय?

आता ही सगळी थेरं बंद झाली आहेत. पत्रकार परदेशी गेले तरी ब्लॅक लेबल ऐवजी चहा बिस्किटे मिळतात, भेटवस्तू बंद झाल्या, दारू बंद झाली फुकट लाड बंद झाले.

लूटयेन्स पत्रकारांचा आणि अत्यंत साधारण बुद्धी बाळगून असणाऱ्या पण स्वतःला बुद्धिवादी म्हणवून घेणाऱ्या सेलेब लोकांच्या मोदींविषयी असणाऱ्या पराकोटीच्या द्वेषामागे हे एक कारण असावं.

बघा ना, ह्या पत्रकारांचा म्हणा किंवा उदारमतवादी आणि विचारवंत म्हणवून घेणाऱ्या बुद्धिवाद्यांचा म्हणा- फक्त द्वेष प्रामाणिक आहे. विचारांशी किंवा तत्वांशी हे लोक कधीच प्रामाणिक नसतात. फक्त सोयीस्कररित्या तत्व पाळणारे हे लोक द्वेष आणि टीका मात्र अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडतात! ह्याची हजारो उदाहरणे देता येतील.

मेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये वगैरे उपरती होणाऱ्या दल्ल्या पत्रकारांना सावरकर, पर्रीकर, अटल बिहारी वाजपेयी इत्यादी लोकांबद्दल बोलणाऱ्यांबद्दल बोलता नाही आलं ह्यात देखील जराही आश्चर्य नाही.

मेलेल्या माणसांचा वारसा ही दुहेरी वाहतूक आहे. येता जाता त्यांच्या नावे योजना चालवायच्या असतील तर केलेल्या चुका देखील ऐकून घ्याव्याच लागतील.

शेवटी तात्पर्य काय? ज्याचं त्याने शोधावं....माझ्यासाठी काय तात्पर्य आहे हे पुढच्या वेळी सांगतो....!!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीव गांधींच्या लक्षद्वीप सहलीमध्ये INS विराटचा उपयोग वैयक्तिक वापरासाठी टक्सीप्रमाणे केल्याचा आरोप लावल्यावर राजीव गांधींच्या बचावासाठी अनेकजण मैदानात उतरले. अॅडमिरल एल. रामदास, अॅडमिरल पसरीच्या यांसारख्या नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांनीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खोटारडेपणाचे आरोप लावले. मोदी विरोधी मिडीयाने अपेक्षेप्रमाणे या बातम्या उचलून धरल्या.

आता मुद्देसूद रीतीने या पूर्ण प्रकरणाकडे बघुया : वर्षांच्या नोंदी महत्त्वाच्या आहेत.

Narendra Modi यांनी ज्या घटनेचा संदर्भ दिला ती घटना India Today ने २०१३ मध्ये कव्हर केलेली आहे.

 https://tinyurl.com/y5u6a36l

ही लिंक मोदींच्या फेसबुक खात्यावरूनपण शेअर केली गेली आहे.

घटना १९८७ ची आहे आणि INS विराटचा वापर झाला आहे, हे स्पष्ट आहे. आपल्याला बघायचं आहे, १९८७ ची सहल वैयक्तिक होती कि सरकारी?

१ . पुस्तकाचे नाव - The Muslim tribes of Lakshadweep Islands: An anthropological appraisal of island ecology and cultural perceptions

दुवा : https://tinyurl.com/y6awt4wx :

या पुस्तकात कोणत्या व्हीआयपींनी लक्षद्वीपला कितीवेळा भेटी दिल्या याच्या नोंदी आहेत. अगदी डॉ. राजेंद्र प्रसादांपासूनच्या सर्व नोंदी दिलेल्या आहेत. या पुस्तकाप्रमाणे राजीव गांधी यांनी २ वेळा लक्षद्वीपला भेटी दिल्या. एकदा १९८५ ला आणि दुसऱ्यांदा "डिसेंबर अखेर १९८७ ते जानेवारी १९८८"

२ . सेन्ट्रल मरीन फिशरीज रिसर्च इंस्टीट्युटच्या रेकॉर्ड्सप्रमाणे :

 http://eprints.cmfri.org.in/8213/1/Bulletin_No_43.pdf

 : १९८५ साली राजीव गांधी, लक्षद्वीप बेटांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी, एका बैठकीसाठी म्हणजेच सरकारी कामासाठी लक्षद्वीपला गेले होते. इथे साल महत्त्वाचे आहे - १९८५ !

३ . एबीपी न्यूजच्या बातमीप्रमाणे :
 http://staging.abplive.in/blog/how-rahuls-holidays-differ-from-his-fathers

१९८४-८९ दरम्यान, राजीव गांधी नेहमी ख्रिसमसच्या दरम्यान सहलीला जात असत - १९८५ ला कान्हा राष्ट्रीय उद्यान, १९८६ रणथंबोर, १९८७ अंदमान, १९८८ लक्षद्वीप(डिसेंबर अखेर १९८७ ते २ जानेवारी १९८८)

सारांश : राजीव गांधी २ वेळा लक्षद्वीपला गेले. प्रथम लक्षद्वीप बेटांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी १९८५ ला गेले आणि दुसऱ्यांदा १९८७ ला. परंतु मिडीयाने १९८५ ची सरकारी भेट १९८७ ची भेट म्हणून दाखवली आहे. सर्व नौदलाचे अधिकारी याच भेटीचे संदर्भ देत आहेत, पण वर्ष मात्र १९८७ दाखवत आहेत, इथेच खोटारडेपणा झालेला आहे.

दोन भेटी दिल्या ही गोष्ट मिडीया लपवतो आहे.

१९८७ च्या सहलीसाठी राजीव गांधींना वाचवण्यासाठी १९८५ ची सरकारी भेट लोकांच्या तोंडावर मारण्यात आली आहे. एबीपी न्यूजच्या जुन्या बातमीप्रमाणे १९८५ च्या राजीव गांधींनी केलेल्या सहलीत लक्षद्वीपचा उल्लेख नाही, कान्हा राष्ट्रीय उद्यानाचा उल्लेख आहे. म्हणजेच १९८५ मध्ये सरकारी कामासाठी आणि १९८७-८८ मध्ये सहलीसाठी लक्षद्वीपला गेले हे स्पष्ट आहे. इंडिया टुडेचा २०१३ मधला लेख बरोबरच आहे, १९८७ मधली सहल वैयक्तिक होती आणि वैयक्तिक सहलीत आयएनएस विराट वापरले गेले हे यावरून स्पष्ट होत आहे.

अजून एक पुरावा म्हणजे - लक्षद्वीपमधल्या हॉटेल चालकानेदेखील राजीव गांधी सहलीला आल्याचा उल्लेख केलेला आहे. India's Prime Minister Rajiv Gandhi had them made for his private holidays with Sonia Gandhi back in the mid-1980s, years before the resort was opened to foreign tourists.

अपडेट्स :

१. सोनिया अ बायोग्राफी पुस्तकात रशीद किडवई यांनी राजीव गांधींच्या सहलींबद्दल लिहिले आहे. स्क्रिन शॉट दिला आहे.

२. फक्त लक्षद्वीपच नाही तर अंदमानमध्ये पण नौदलाचा मिसयुज करण्यात आला होता. स्क्रिन शॉट दिला आहे.

#सुचिकांत

: सुचिकांत वनारसे यांची पोस्ट.

======

मी नेहेमी जे म्हणतो ना - भ्रष्टाचार, राजकीय लोक, राजकीय पक्ष वगैरे गोष्टी मूळ समस्या नाहीत. हे सगळे तर मूळ समस्येचे रिझल्ट्स आहेत. खरी समस्या आहेत - हे प्रॉपगंडा पंडित लोक. जे स्वतःचे हितसंबंध जपण्यासाठी, हवा तो र्हेटोरिक रुजवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात.

कल्पना करा, राजीव गांधींच्या या वादग्रस्त भेटीची माहिती समोर आल्यावर सर्व विचारवंत पत्रकार वगैरे मंडळींनी प्रामाणिकपणे या घटनेचा निषेध करून, "इथे राजीव गांधी चुकलेच!" असं स्पष्टपणे म्हटलं तर काय होईल?

हो, काँग्रेस पक्ष एकटा पडेल. बॅकफूटवर जाईल. पण याने माध्यम पंडितांना नि विचारवंतांना फरक का पडावा? कारण स्पष्ट आहे - काँग्रेस बॅकफूटवर जाणं या लोकांच्या हितसंबंधांच्या विपरीत आहे.

अहो अश्या कितीतरी ट्रिप्स काढणे, या लोकांना फिरायला नेणे, फुकट दारू पाजणे, विविध संस्था-विद्यापीठ-समित्यांमधे नेमणे हेच तर काँग्रेसचं गेल्या ७० वर्षांचं संचित आहे! आणि हे पंडित लोकच या संचिताचे लाभार्थी आहेत!

मग स्वतःच्या पायावर कुणी कुर्हाड मारून घेईल काय?

राजीव गांधींच्या त्या सहलीचं समर्थन या स्वार्थातून होतंय.

बाकी आपण सुज्ञ आहातच.


: ओंकार दाभाडकर

No comments:

Post a Comment