Total Pageviews

Tuesday 7 May 2019

इलेक्शन टुरिझम Posted: 7:50 PM, 06/05/2019 by Parashuram Patil-TARUN BHARAT

निवडणूक आली की काही लोक खूष आणि काही लोक दुःखी होतात. घरकाम करणाऱया महिला, रोजगार नसलेले लोक खूष असतात. रोज यांना पाचशे रुपये, पोटभर वडापाव आणि चहा देऊन नेत्यांच्या सभेला जाऊन टाळय़ा वाजवणे उमेदवाराची प्रचार फेरी काढणे, वाटते त्यांचा जयजयकार करणे आणि मतदारांच्या घरी जाऊन प्रचार पत्रके वाटणे ही कामे मिळतात. घरकाम करणाऱया महिला खूष असल्यातरी या कामासाठी त्या नेहमीच्या कामाला दांडी मारतात. तस्मात त्या ज्यांच्याकडे कामाला असतात त्या गृहिणी दु:खी असतात. कारण मतदान होईतो त्यांच्यावर कामाचा बोजा पडतो.
याबद्दल सोशल मीडियावर एक विनोद फिरतोय. एक युवक विचारतो, ‘प्रचाराला गेलो तर मला पाचशे रुपये मिळतील. मैत्रिणीबरोबर फिरायला गेलो तर पाचशे रुपये खर्च होतील. काय करावे?’’ लोक त्याला सल्ला देतात, “मैत्रिणीला घेऊन प्रचाराला जा. दोघांना मिळून हजार रुपये मिळतील.’’आपल्याकडील निवडणुकांचे, प्रचाराचे वगैरे स्वरूप इतर देशांपेक्षा निराळे असल्याने विदेशी लोकांना त्या बघायला बोलावता येईल. देशाला भरपूर परकीय चलन लाभेल. ‘या, आमच्या निवडणुका पहा!’ अशा जाहिराती दिल्या तर लाखो पर्यटक येतील. त्यांना आपल्या सभा बघण्यासाठी, प्रचार फेरीत फोटो काढीत फिरण्यासाठी माणशी दहा डॉलर तिकीट ठेवता येईल.
आपले शिवराळ नेते सभेत दर्जाहीन विनोद करतात त्याबद्दल त्यांना आणि त्यांच्या अनुयायांना जनाची किंवा मनाची अजिबात लाज वाटत नाही. सन्माननीय अपवाद वगळता मीडियादेखील टीआरपीसाठी त्यांना डोक्मयावर घेतो. याचा फायदा घेऊन परकीय चलन मिळवायला काय हरकत आहे? भाषणे ऐकण्यासाठी विदेशी पर्यटकांना भरमसाट दरात तिकिटे विकता येतील. नेत्यांनी वेडीवाकडी विधाने सुरू केली की स्टेजवरचे अनुवादक त्या विधानांचे अनुवाद तत्काळ करतील. अनुवादकांना रोजगार मिळेल. इंग्रजीतल्या रग्बी जोक्सच्या धर्तीवर इलेक्शन जोक्स नावाचा साहित्यप्रकार उदयाला येईल. राज ठाकरे यांनी आपल्या प्रत्येक सभेत बोलताना मुद्याच्या पुष्टय़र्थ व्हीडिओ दाखवून त्या गाजवल्या. त्यांच्या लोकप्रिय वाक्मयामुळे पुलंचे हरितात्या आठवले. आज ते असते तर म्हणाले असते,तुला सांगतो पुरुषोत्तमा पुराव्यानिशी शाबीत करीन हे माझं वाक्मय जुनं झालं बघ. परवा त्या राजच्या सभेला आम्ही गेलेलो. केवढी गर्दी सांगू? या यमीच्या केसांच्या सहा हजार पट आणि तो गरजला वाघ-
अरे, तो व्हीडिओ लाव रे!

No comments:

Post a Comment