Total Pageviews

Friday, 29 December 2017

पाकाकडून अमानवीपणाचा कळसभारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात आणि जागतिक समुदायापुढे याविरोधातील भूमिका ठामपणाने मांडली पाहिजे.

 

 Dec 29 2017 10:55AM | Last Updated: Dec 29 201




पाकिस्तानने आजवर अमानुषपणाचा, दुतोंडीपणाचा, क्रौर्याचा प्रत्यय अनेकदा दिला आहे. कुलभूषण जाधव यांच्या एकूण प्रकरणातून याचा पुन्हा प्रत्यय आला आहे. जाधव यांच्या आई आणि पत्नीला मिळालेली अमानवी वागणूक हा भारतातील सर्व स्त्रियांचा, भारताचा अपमान आहे. पाकिस्तानने हे नाटक मुद्दाम केले आहे. भारताची आंतरराष्ट्रीय पटलावर उंचावत चाललेली मान, प्रतिमा खाली कशी करता येईल यासाठीचा हा प्रयत्न होता. भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात आणि जागतिक समुदायापुढे याविरोधातील भूमिका ठामपणाने मांडली पाहिजे. 
पाकिस्तानने आजवर अमानुषपणाचा, दुतोंडीपणाचा, क्रौर्याचा प्रत्यय अनेकदा दिला आहे. कुलभूषण जाधव यांच्या एकूण प्रकरणातून याचा पुन्हा प्रत्यय आला आहे. जाधव यांच्या आई आणि पत्नीला मिळालेली अमानवी वागणूक हा भारतातील सर्व स्त्रियांचा, भारताचा अपमान आहे. पाकिस्तानने हे नाटक मुद्दाम केले आहे. भारताची आंतरराष्ट्रीय पटलावर उंचावत चाललेली मान, प्रतिमा खाली कशी करता येईल यासाठीचा हा प्रयत्न होता. भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात आणि जागतिक समुदायापुढे याविरोधातील भूमिका ठामपणाने मांडली पाहिजे. 
भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना 3 मार्च 2016 रोजी पाकिस्तानच्या गुप्‍तचर यंत्रणेने अटक केली. त्यांच्यावर हेरगिरीचे आरोप ठेवण्यात आले. मध्यंतरीच्या काळात त्यांना फाशीची शिक्षाही सुनावण्यात आली. मात्र, भारताने त्याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये धाव घेतली आणि न्यायालयाने या फाशीला स्थगिती दिली. तसेच कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याची परवानगी द्यावी, असेही न्यायालयाने सांगितले. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी यांना भेट देण्याचे मान्य केले. ही मान्यता देताना आम्ही मानवतेच्या द‍ृष्टिकोनातून भेटण्याची परवानगी देत आहोत, असे सांगितले. हे सांगताना मानवता या शब्दावर त्यांनी जोर दिला. त्यामुळे ते मानवतेला धरून वागतील अशी अपेक्षा होती. तसे अभिवचनही त्यांनी भारताला दिले होते; परंतु नेहमीच्या सवयीनुसार पाकिस्तानने कोलांटउडी मारली. 
कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी भेटण्यासाठी गेल्या असता त्यांची प्रत्यक्ष भेट घडवून न आणता बंद काचेआडून टेलिफोनिक यंत्रणेच्या सहाय्याने ती घडवण्यात आली. तसेच भेटण्यासाठी   जाताना त्यांना अंगावरील मंगळसूत्र आणि चप्पला काढून ठेवण्यास सांगण्यात आले. इतकेच नव्हे तर मातृभाषेतून म्हणजेच मराठीतून संवाद साधण्यासही मनाई करण्यात आली. पाकिस्तानचे हे वर्तन अतिशय धक्‍कादायक होते. वास्तविक, या दोन अबला कुलभूषण जाधव यांना धोका पोहोचवणार नव्हत्या की तिथे घातपाती कृत्यही करणार नव्हत्या. मात्र, तरीही त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक पाकिस्तानात मिळाली. हे सर्व पाकिस्तानने हेतूपुरस्सर केले आहे. या कृतीतून पाकिस्तानने केवळ दोन स्त्रियांचा अपमान केलेला नसून प्रत्येक भारतीय स्त्रीचा अपमान केला आहे, असेच म्हणावे लागेल. 
आता प्रश्‍न उरतो तो पाकिस्तानने असे का केले? यामधून पाकिस्तानने दोन गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे. एक म्हणजे या भेटीची निश्‍चिती झाली त्यावेळी पाकिस्तानने याबाबतची बातमी आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांना पुरवली आणि त्याचे एक प्रकारे मार्केटिंग केले. आम्ही किती उदारमतवादी आहोत हे जगाला दाखवण्याचा प्रयत्न केला. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तान हेही सांगायला विसरले नाही की, आम्ही फक्‍त ‘कौन्सिलर अ‍ॅक्सेस’ दिलेला नाही किंवा आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या अधिन राहून आम्ही पावले टाकत नसून आम्ही माणुसकीचे कैवारी आहोत. मात्र, पाकिस्तानचा हा ढोंगीपणाचा प्रयत्न पूर्णपणे फसला आहे. कूलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नी यांनी त्यांच्यात काय बोलणे झाले आहे हे अद्यापपर्यंत जाहीररीत्या स्पष्ट केलेले नाही. मात्र, मला तर अशी भीती वाटते आहे की खरोखरच काचेच्या पलीकडे कूलभूषण जाधव होते की अन्य एखाद्याला सोप्यावर बसवून त्याला मास्क घालण्यात आला होता. ही भीती अकारण नाही. कसाबला फाशी दिल्यानंतर मी स्वत: पाकिस्तानला गेलो होतो. त्या दौर्‍यादरम्यान मला अनेक धक्‍कादायक गोष्टी कळाल्या. त्यावरून माझ्या मनात ही भीती आहे. पाकिस्तानने हे नाटक मुद्दाम केले आहे. भारताची आंतरराष्ट्रीय पटलावर उंचावत चाललेली मान, प्रतिमा खाली कशी करता येईल यासाठीचा हा प्रयत्न होता. 
एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, पाकिस्तानबरोबर आपला कोणत्याही स्वरूपाचा गुन्हेगार हस्तांतरण करार नाही. त्यामुळे या कायद्याचा आपल्याला कुठेही उपयोग करून घेता येणार नाही; परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती देताना पाकिस्तानचे संपूर्ण म्हणणे ऐकून दिलेली आहे. ती स्थगिती कायम करत असताना आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, पाकिस्तान देखील व्हिएन्‍ना समझोता कराराचा सदस्य आहे. त्यामुळे या कराराचे पालन करण्यास तो बांधिल आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या व्हिएन्‍ना करारामध्ये असे स्पष्टपणाने ठरवले गेले आहे की, दुसर्‍या देशाच्या व्यक्‍तीला आरोपी म्हणून कैद केले असेल तेव्हा त्याला ‘कौन्सिलर अ‍ॅक्सेस’ दिलाच पाहिजे. ही अट दोन्ही देशांना बंधनकारक आहे. कौन्सिलर अ‍ॅक्सेस म्हणजे पाकिस्तानातील भारतीय वकिलातीतील किंवा दुतावासातील अधिकार्‍यांनी सदर आरोपीची विचारपूस करून त्याला योग्य कायदेशीर मदत पोहोचवणे. मात्र, पाकिस्तानने यासाठी परवानगी नाकारली. 
कुलभूषण जाधव यांना गुप्‍तहेर ठरवून पाकिस्तानने त्यांच्यावरील खटला लष्करी न्यायालयात चालवला. यासाठी जाधव यांच्या कबुलीजबाबाचा आधार घेतल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे; तथापि, जाधव यांनी कोणताही जबाब दिलेला नाही किंवा अमानुष छळवणूक करून त्यांच्याकडून खोटा जबाब घेण्यात आलेला आहे. पाकिस्तानने   कुलभूषण जाधव यांचा जबाब म्हणून एक व्हिडीओ समोर आणला होता; मात्र त्यामध्ये फेरफार करण्यात आला होता. म्हणूनच पाकिस्तान जाधव यांना कौन्सिलर अ‍ॅक्सेस देण्यास घाबरत आहे. तसे केल्यास आपला खरा चेहरा उघडा पडेल याची पाकिस्तानला भीती आहे. 
कुलभूषण जाधव हे माजी लष्करी अधिकारी आहेत. जेव्हा एखादा लष्करी अधिकारी बोलत असतो तेव्हा त्याची देहबोली अत्यंत बोलकी असते. कुलभूषण जाधवांचे सर्व व्हिडीओ पाहिल्यास ते एखाद्या यंत्राप्रमाणे बोलत होते. याचे दोन अर्थ होतात. एकतर त्यांना काही अमली पदार्थ देऊन बोलायला लावले असावे किंवा अ‍ॅट द गन पॉईंट म्हणजेच बंदूक लावून बोलायला लावले असावे. नेमकी परिस्थिती काय होती हे आपण सांगू शकत नाही. मात्र, पाकिस्तानचा क्रूरपणा, लबाडी, कावेबाजपणा आपण इतिहासात अनेकदा पाहिला आहे. त्यामुळे उपरोक्‍त शक्यता नाकारताही येत नाहीत. यासंदर्भात एक मूलभूत मुद्दा मला मांडावासा वाटतो. तो म्हणजे मुळातच कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी यांनी ही भेटच नाकारायला हवी होती. मात्र, शेवटी आईची, पत्नीची माया, काळजी यांचा विचार करता तसे शक्य नव्हते. भेटीनंतर त्यांच्या चेहर्‍यावर खिन्‍नता स्पष्टपणे दिसत होती. त्यांचा ज्याप्रकारे अपमान करण्यात आला तो आपण गिळून टाकता कामा नये. यासंदर्भात आपल्याला आंतरराष्ट्रीय समुदायाकडे तक्रार करता येईल. 
आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या नियमांनुसार ही सुनावणी दोन ते अडीच महिन्यांत येण्याची शक्यता आहे. पाकिस्तानची पूर्ण मदार कुलभूषण जाधव यांच्या तथाकथित कबुलीजबाबावर आहे. पाकिस्तानच्या कायद्यानुसारदेखील एखाद्या आरोपीचा कबुलीजबाब जर दडपण टाकून घेतला असेल तर तो ग्राह्य धरला जात नाही. पाकिस्तानच्या ‘इव्हिडन्स अ‍ॅक्ट’मध्ये तशी तरतूद आहे. म्हणून आपल्याला कुलभूषण जाधव यांनी अशा प्रकारचा कबुलीजबाब दिला आहे का याची शहानिशा करावी लागेल. आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर पाकिस्तानचा बुरखा फाडण्यासाठी ती गरजेची आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने नैसर्गिक न्याय तत्त्वाचे पालन न करता, आरोपीला पुरेशी संधी न देता निकाल दिलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, लाहोरमधील बार असोसिशनच्या वकिलांनी जाधव यांचे वकीलपत्र घेतल्यास त्या वकिलांचे वकीलपत्र रद्द करू, असा ठराव केला आहे. वास्तविक, आपल्याकडे कसाबच्या बचावासाठी आम्ही दोन वकील दिले होते आणि सरकारतर्फे मी एकटा वकील होतो. अशा प्रकराचा न्याय पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना का दिला नाही? हा व्हिएन्‍ना कराराचा भंग आहे. म्हणूनच व्हिएन्‍ना कराराची अंमलबजावणी व्हावी यासाठी अमेरिकेच्या माध्यमातून आपल्याला पाकिस्तानवर दडपण आणावे लागेल. आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दहशतवादाच्या उच्चाटनाची गर्जना करत आहेत. पाकिस्तानला ते प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणाने इशारा देत आहेत. अशा वेळी आपण पाकिस्तानचा हा अमानवीपणा, दुटप्पीपणा जगापुढे आणला पाहिजे. भारतीय  नेत्यांनी आपली शिष्टाई, मुत्सद्दीपणा पणाला लावून अमेरिकेचे मत आपल्या बाजूने वळले पाहिजे

No comments:

Post a Comment