बिटकॉईनसारख्या आभासी चलनाची वाढते मूल्य पाहता गुंतवणूक करणाऱयांना सरकारकडून इशारा देण्यात आला आहे. आभासी चलनासाठी इशारा जारी करत बिटकॉईनसारखे कोणतेही चलनाला कायदेशीर परवानगी देण्यात आलेली नाही, आणि अन्य कोणत्याही संपत्तीप्रमाणे त्याचा व्यवहार करता येणार नाही असे अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी म्हटले. बिटकॉईनमधील गुंतवणूक धोक्यांची आहे. आभासी चलनामध्ये बनावट योजना सुरू करण्यात येत असून स्वतःच्या जोखमीवर गुंतवणूक करण्यास यावी असे मंत्रालयाचे म्हणणे आहे.
भारतासह आंतरराष्ट्रीय पातळीवर बिटकॉईनसारख्या आभासी चलनाचे मूल्य गेल्या काही दिवसांत मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. प्रत्यक्षात त्याचे कोणतेही मूल्य नाही. यामुळे बिटकॉईनच्या किमती बाजारातील व्यवहारावर अवलंबून आहेत. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्यास मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसानाला कोणत्याही प्रकारची मदत करण्यात येणार नाही. सामान्य व्यक्तींनी या प्रकारच्या गुंतवणुकीपासून दूर रहावे असे अर्थ मंत्रालयाने म्हटले.जग अधिकाधिक तंत्रज्ञानाधिष्टित होत असताना आजवर कल्पना केलेल्या कायद्यांच्या, समजुतीच्या, संकेतांच्या पलीकडे ज्या अनेक गोष्टी निर्माण होणार आहेत, त्यांची बिटकॉईन्स ही एक झलक आहे. तंत्रज्ञानातील आधुनिकता पारदर्शकता, परस्पर विश्वास यातून एक नवे आभासी जग निर्माण होत आहे. त्या आभासी जगात व्यावहारिक सीमांच्या पलीकडे जाऊन परस्पर व्यवहार करण्याची शक्ती निर्माण होत आहे. या शक्तीला मान्यता कशी द्यायची आणि त्याला व्यवहारी ज्ञानाचे नियम कसे लावायचे, यात सर्वांची कसोटी लागणार आहे. बिटकॉईन्सच्या निमित्ताने हा प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या बिटकॉईन चलनाची चर्चा सुरु आहे. बिटकॉईन
हे केवळ वेगळ्या प्रकारचे चलनच नाही, तर वेगळ्या संस्कृतीचे
प्रतिनिधीत्व करणारे चलन आहे. वास्तविकरित्या चलनाची अंगभूत किंमत कवडीमोलाची
असते. अगदी नवी दोन हजार रुपयांची नोट घेतली तरी एक कागदाचा कपटा यापलीकडे तिचे
वास्तविक मूल्य होणार नाही. परंतु,
त्या चलनाच्या किमतीची
हमी सरकारने घेतली असल्याने त्या कागदाच्या तुकड्यालाही दोन हजार रुपयाचे मूल्य
येते. पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीच्या निमित्ताने हजार आणि पाचशे रुपयाच्या नोटा
रद्द केल्या, तेव्हा त्यांचेही विनिमय मूल्य समाप्त झाले.
परंतु, बिटकॉईन या चलनामागे कोणतेही शासन उभे नाही.
जेव्हा एखाद्या देशात त्या शासनाने मान्य न केलेले चलन वापरले जाते, तेव्हा ते बेकायदेशीर ठरते. परंतु, बिटकॉईनला तशी कोणत्याही
सरकारने मान्यता दिलेली नाही. तसेच ते बेकायदेशीरही ठरवलेले नाही. याचे कारण, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञतेचा कस या चलनामागे उभा आहे.
या चलनाचा अवमान करणे म्हणजे त्या तज्ज्ञतेला आव्हान देण्यासारखे आहे. या
समजुतीतून बहुधा कोणत्याही सरकारने त्यावर बंदी घालण्याचा विचार केला नसावा.
अमेरिकन सिनेटमध्येही यासंदर्भात चर्चा झाली, तेव्हा तिथल्या सरकारने
या चलनाला ‘मान्यताही नाही आणि विरोधही नाही’ अशी भूमिका घेतली.
बिटकॉईन चलनाची दोन वैशिष्ट्ये आहेत. पहिले वैशिष्ट्य म्हणजे, ते चलन सरकारद्वारा निर्मित नसून ती उच्चतम तांत्रिक बुद्धीतून
निर्माण झालेली निर्मिती आहे. ज्याला माहिती- तंत्रज्ञान क्षेत्रातील पराकोटीची
तज्ज्ञता प्राप्त झाली आहे, अशी कोणतीही व्यक्ती बिटकॉईन निर्माण करु शकते.
प्रत्येक देशातील राजकीय व्यवस्था भिन्न भिन्न असल्या तरी तेथे राज्य करणारी मंडळी
बुद्धिमान असतात, असे म्हणता येणार नाही. यशस्वी राजकीय नेतृत्वासाठी
आवश्यक असलेली डावपेच करण्याची बुद्धीच इतर अनेक गुणांवर मात करते आणि अंतिमत:
अशाच लोकांच्या हाती चलन निर्मितीची सुत्रे असतात. परंतु, बिटकॉईनच्या बाबतीमध्ये मात्र ती निर्माण करत असताना आर्थिक, राजकीय सामाजिक घडामोडीचा संबंध नसतो, तर ती एका अर्थाने उच्चतमबुद्धिमत्तेला दिलेली मान्यता असते. ही
मान्यता एखाद्या छोट्याशा गटापुरती मर्यादित असती तर त्याची जागतिक दखल घेतली गेली
नसती. परंतु, या प्रक्रियेला जगभरातील एका व्यापक गटाचा
पाठिंबा मिळाला आणि त्यामुळे हळूहळू बिटकॉईन्स ही प्रचलित अर्थव्यवस्थेमध्येही
महत्त्वपूर्ण स्थान मिळवू लागले आहेत. जगभरातील एखाद्या विशिष्ट समाजगटात एखाद्या
चलनाला मान्यता मिळाली, तर त्यातून राष्ट्राराष्ट्राच्या सीमा ओलांडून
सुद्धा व्यवहार कसे होऊ शकतात,
याचे उदाहरण बिटकॉईन्सने
जगापुढे ठेवले आहे.
व्यावहारिक पातळीवर जग वेगवेगळ्या गटात, राष्ट्रसमुहात,
वांशिक गटात, धर्माच्या आधारे विभागले गेले आहे. परंतु, संपर्क तंत्रज्ञानाने एक स्वतंत्र आभासी जग निर्माण केले आहे आणि
त्या आभासी जगात घडणार्या घडामोडींचा वेगवेगळा परिणामप्रत्यक्ष जीवनावरही पडत
असतो. या प्रभावाचे प्रत्यंतर अर्थकारणातही पडायला सुरुवात होते. तेव्हा
वेगवेगळ्या संकेतस्थळांच्या माध्यमातून वस्तू आणि सेवा यांची विक्री सुरु झाली, तेव्हा भौगोलिक सीमा अर्थहीन बनण्याची प्रक्रिया सुरु झाली. छोट्या
छोट्या किराणा मालाच्या तुलनेत मोठमोठे मॉल्स किंवा महादुकाने उभी राहिली. भारतात
तर ही महादुकाने उभारण्याची प्रक्रिया सुस्थिर होण्याच्या आतच संकेतस्थळांद्वारे
विक्री करण्याच्या नव्या तंत्रज्ञानाने त्यांना आर्थिक आव्हान द्यायला सुरुवात
केली आणि त्याचे परिणामप्रचंड मोठ्या आर्थिक गुंतवणूक करणार्या या व्यवसायावर
झाले. परंतु, या सर्वांपेक्षाही आगामी भविष्यकाळात येणारे
बिटकॉईन संस्कृतीचे आव्हान अधिक गंभीर आणि मूलगामी स्वरुपाचे असेल.
एखाद्या देशाची आर्थिक स्थिती नियंत्रित
करण्यासाठी पतपुरवठ्यावर नियंत्रण हे सरकारच्या हाती असलेले खूप महत्त्वाचे शस्त्र
असते. सरकारचे उत्पादन प्राधान्यता, चलनवाढ, करप्रणाली, बँकांचे व्याजदर, बँकांच्या पतपुरवठ्याचे
धोरण या सार्यावर पतनियंत्रण धोरणांचा परिणामहोत असतो. परंतु, यापैकी कोणत्याही घटकाचा विचार न करता बिटकॉईन निर्माण करण्याच्या
खाणी ज्यांना म्हटले जाते, त्याद्वारे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील
कठिणात ही कठीण कोडी जो सोडवेल,
तो बिटकॉईन्स निर्माण करु
शकतो. बिटकॉईन या चलनाला मान्यता देणारा वर्ग जसजसा वाढत जाईल, तसतसे बिटकॉईनची उपलब्धता आणि या गटाची खरेदी करण्याची सक्ती यावर
बिटकॉईनचा दर अवलंबून राहील. सध्या तरी बिटकॉईन हे वास्तविक पाहता चलन नमून ती
खरेदी-विक्रीची आभासी वस्तू आहे. या गटाच्या मान्यतेवरच तिची किंमत अवलंबून आहे.
या गटात जे सामील होतात, त्यांना या चलनाच्या संदर्भातील सर्व गोष्टी
पारदर्शकतेने माहिती असल्याने,
कळत असल्याने त्यांचा
विश्र्वास या चलनावर बसलेला आहे. म्हणजेच, तांत्रिक क्षमता, पारदर्शकता आणि परस्परांतील विश्र्वास यातून बिटकॉईन्सचे स्वत:चे
एक स्वतंत्र विश्र्व निर्माण झाले आहे. मात्र, हा व्यवहार करत असताना तो
डॉलरसारख्या प्रचलित मूल्यांच्या आधारे होत असल्याने या चलनाच्या मुख्य चलनाशी
संबंध येतो. त्यामुळे एक चमत्कारिक स्थिती निर्माण झाली. एका आभासी वस्तूच्या व
जिला मान्यता दिलेली नाही अशा वस्तूची खरेदी आणि विक्री कशी नियंत्रित करायची, हा प्रश्र्न सर्वच देशांपुढे उभा राहणार आहे.
आपल्याकडेही वेगवेगळ्या माध्यमातून बिटकॉईन्सचा
प्रभाव वाढू लागल्याचे जाणवत आहे. नुकत्याच गाजलेल्या ‘रुद्रम’ या मालिकेमध्ये बिटकॉईन्समध्ये काळ्या पैशाची
गुंतवणूक केल्याचा उल्लेख होता. अमिताभ बच्चन यांच्या कंपनीने बिटकॉईन्समध्ये
गुंतवणूक केल्याचा आणि त्यांना त्यात किती तोटा झाला, यासंबधींच्या बातम्या प्रकाशित झाल्या आहेत. बिटकॉईन्सच्या
खरेदी-विक्रीची दखल आयकर खात्यानेही घेतल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या आहेत.
त्यामुळे बिटकॉईन्सची खरेदी-विक्री ही अपवादात्मक परिस्थिती राहिली नसून तिची
व्यापकता पुढच्या काळात अधिकाधिक वाढत जाणार हे निश्र्चित. जग अधिकाधिक
तंत्रज्ञानाधिष्टित होत असताना आजवर कल्पना केलेल्या कायद्यांच्या, समजुतीच्या, संकेतांच्या पलीकडे ज्या अनेक गोष्टी निर्माण
होणार आहेत, त्यांची बिटकॉईन्स ही एक झलक आहे.
तंत्रज्ञानातील आधुनिकता पारदर्शकता, परस्पर विश्र्वास यातून
एक नवे आभासी जग निर्माण होत आहे. त्या आभासी जगात व्यावहारिक सीमांच्या पलीकडे
जाऊन परस्पर व्यवहार करण्याची शक्ती निर्माण होत आहे. या शक्तीला मान्यता कशी
द्यायची आणि त्याला व्यवहारी ज्ञानाचे नियमकसे लावायचे, यात सर्वांची कसोटी लागणार आहे. बिटकॉईन्सच्या निमित्ताने हा
प्रश्र्न निर्माण झाला आहे. तो कसा सोडवावा हे न कळल्याने आजवर कोणत्याही देशाने
त्यासंदर्भात निश्र्चित भूमिका घेतलेली नाही. परंतु, ही परिस्थिती फार काळ
चालणार नाही असे हळूहळू स्पष्ट होत आहे.
No comments:
Post a Comment