Total Pageviews

Thursday, 19 January 2017

कानपूरजवळच्या पुखरावा येथे गेल्या वर्षीच्या वीस नोव्हेंबरला झालेल्या रेल्वे दुर्घटनेमागे पाकिस्तानच्या कुख्यात "इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स' (आयएसआय) या गुप्तहेर संघटनेचा हात बिहार पोलिसांच्या तपासात माहिती उघड


पाटणा- कानपूरजवळच्या पुखरावा येथे गेल्या वर्षीच्या वीस नोव्हेंबरला झालेल्या रेल्वे दुर्घटनेमागे पाकिस्तानच्या कुख्यात "इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स' (आयएसआय) या गुप्तहेर संघटनेचा हात होता. बिहार पोलिसांसह या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या तपास संस्थांनी हा खुलासा केला आहे. पाटणा- इंदूर एक्स्प्रे सला झालेल्या अपघातात 152 जण ठार झाले होते. पूर्व चंपारण्यचे पोलिस अधीक्षक जितेंद्र राणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळ आणि दुबईत असलेल्या "आयएसआय'च्या बड्या म्होरक्यांानी एजंटांची मदत घेऊन दहशतवादी कारवाई घडविण्याची योजना आखली होती. नेपाळ सीमेवर अटक करण्यात आलेल्या मोतीलाल पासवान याच्या कबुलीजबाबातून चक्रावणारी माहिती पोलिसांना मिळाली. कानपूर रेल्वे दुर्घटनेमागे आपली महत्त्वाची भूमिका असल्याचे पासवानने कबूल केले आहे. त्याने सांगितले, की पूर्व चंपारण्य जिल्ह्यातील घोडासहन येथे लोहमार्ग उद्‌ध्वस्त करण्यासाठी नेपाळच्या बृजकिशोर गिरी याला वीस लाख रुपये दिले गेले होते. दुबईतील शमशुल होदा याने या संदर्भातील योजना आखली होती. कानपूर रेल्वे दुर्घटनेनंतर आपण इंदूर, दिल्ली आणि नेपाळमार्गे घरी परतलो, असे मोतीलालने सांगितले. शमशुल होदा आघाडीवर या सगळ्या घटनाक्रमात दुबईत राहणारा शमशुल होदा आघाडीवर असल्याचे पोलिसांना तपासात आढळले. नेपाळमधील एजंटांमार्फत तो बेरोजगार तरुणांना जाळ्यात ओढतो. पैशांचे आमिष दाखवून त्यांना काम कारण्यास प्रवृत्त केले जाते. नेपाळच्या बृजकिशोर गिरीनेच मोतीलालसह अन्य तरुणांना घातपाती कारवायांमध्ये सहभागी करून घेतले होते, असे तपासात स्पष्ट झाले. मोतीलालसह उमाशंकर आणि मुकेश या तरुणांनाही पोलिसांनी अटक केल्याची माहिती राणा यांनी दिली. रेल्वे दुर्घटनेमागे "आयएसआय'चा हात असल्याची माहिती केंद्रीय गुप्तचर संस्थांनाही देण्यात आली आहे. पकडण्यात आलेल्या तिघांना आता दिल्लीत नेऊन चौकशी केली जाणार असून, बृजकिशोर गिरीला पकडण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. इस्लामाबाद - पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाज्वा यांनी आयएसआय या देशातील अत्यंत प्रभावी गुप्तचर संथेच्या प्रमुखांची हकालपट्टी केली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण व अंतर्गत राजकारणात अत्यंत संवेदनशील भूमिका बजावत असलेल्या आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल रिझवान अख्तर यांची झालेली हकालपट्टी हा सैन्यात महत्त्वपूर्ण बदल घडविण्याच्या नव्या लष्करप्रमुखांच्या प्रयत्नांमधील पहिला टप्पा मानला जात आहे. उचलबांगडी झालेल्या अख्तर यांचे स्थान सांभाळण्यासाठी अद्यापी कोणाच्याही नावाची औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही. अख्तर यांना आता येथील राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. अख्तर यांच्यानंतर पाक सैन्यामधील अन्य एक महत्त्वपूर्ण अधिकारी असलेल्या लेफ्टनंट जनरल नवीद मुख्तार यांची नेमणूक आयएसआयच्या प्रमुखपदी करण्यात येईल, असा अंदाज पाकिस्तानमधील महत्त्वपूर्ण वर्तमानपत्र असलेल्या "डॉन'ने वर्तविला आहे. मुख्तार यांना गुप्तचर खात्यामधील मोठा अनुभव आहे. याचबरोबर, आयएसआयच्या दहशतवादविरोधी विभागाचे प्रमुखपदही त्यांनी सांभाळले आहे. पाळचा नागरिक असलेला पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयचा एजंट शमशुल हुदा सद्या दुबईच्या ताब्यात आहे. त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी नेपाळ सरकारने केली असून प्रत्यार्पण प्रक्रिया सुरू झाली आहे. शमशुल हुदा हा हिंदुस्थानातील कानपूर रेल्वे बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड आहे. या स्फोटात १५० रेल्वे प्रवासी ठार तर २०० पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले होते. नेपाळमध्ये घडलेल्या एका गुन्ह्याचा तपास करत असतांना मोतिहारी आणि नेपाळमधील कुविख्यात गॅंगपर्यंत नेपाळी पोलीस पोहोचले. त्यांच्या कबुली जबाबात शमशुल हुदाचे नेपाळ – पाकिस्तान – दुबई कनेक्शन उजेडात आले. हुदा हा ब्रिज किशोर गिरी उर्फ बाबा गिरी, शम्भू गिरी आणि मुजाहिर अंसारी या नेपाळमधील सहकाऱ्यांमार्फत आपले नेटवर्क चालवत होता. हिंदुस्थानात बॉम्बस्फोट करण्यासाठी हुदाने ब्रिजच्या मार्फत उमाशंकर पटेल, मोतीलाल पासवान आणि मुकेश यादव यांना तीन लाख रुपये दिले आणि इंदुर -पाटणा एक्सप्रेस व सियालदेह-अजमेर एक्सप्रेसमध्ये स्फोटके ठेवण्यास सांगितली होती. नेपाळ सरकारने या तपासाची सर्व माहिती हिंदुस्थानी पोलिसांना दिली आहे. हिंदुस्थानातील नॅशनल इन्वेस्टिगेशन एजंसी आणि रॉचे अधिकारी नेपाळमध्ये पोहोचले आहेत. त्यांनी उमाशंकर पटेल, मोतीलाल पासवान आणि मुकेश यादव यांची कसून चौकशी केली असून शमशुल हुदा हा पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयचा एजंट असल्याचे कबूल केले आहे. कानपुर रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाचा सूत्रधार शमशुल हुदा हाच असून त्याच्याच सांगण्यावरून रेल्वेत स्फोटके ठेवल्याचा कबुली जबाब त्यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment