दिव्य मराठी वेब टीम | Jan 26, 2017, 12:56 PM IST
+4 शहीद हवालदार हंगपन दादांनी 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते, अशोक चक्रने सन्मान
शहीद हवालदार हंगपन दादा त्यांची पत्नी चासेनसोबत (फाइल)
नवी दिल्ली - शहीद हवालदार हंगपन दादा यांनी जम्मू-काश्मीरमधील एका एन्काऊंटरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. हंगपन दादा यांना गुरुवारी प्रजासत्ताक दिनी अशोकचक्र या सर्वोच्च शौर्य पुरस्काराने गौरवण्यात आले. राजपथावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांची पत्नी चासेन लोवांग यांना सन्मानीत केले. अशोकचक्र हे शांतीकाळातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. परमवीर चक्रच्या बरोबरीचे ते आहे.
- उत्तर काश्मीरमधील कुपवाडा येथे 27 मे रोजी 12500 फूट उंचावर दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्नात होते.
- 36 वर्षांच्या हंगपन दादा यांनी दहशतवाद्यांसोबत दोन हात करत बहादूरीचे दर्शन घडविले.
- त्यांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते, मात्र त्यांनी हार मानली नाही. चौथ्या दहशतवाद्यालाही त्यांनी यमसदनी धाडले.
हंगपन दादा हे अरुणाचल प्रदेशातील बोदुरिया गावचे रहिवासी होते. हंगपन यांना त्यांचे टीम मेंबर दादा नावाने संबोधत होते.
- गेल्या वर्षी ते हाय माऊंटन रेंजमध्ये तैनात होते.
- हंगपन 1997 मध्ये आसाम रेजिमेंटमध्ये भरती झाले होते. त्यानंतर 35 राष्ट्रीय रायफल्समध्ये त्यांची नियुक्ती झाली होती.
हंगपन यांच्या नावाने ब्लॉकचे नाव
- गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये शिलाँग येथे आसाम रेजिमेंट सेंटर येथे प्लॅटिनम ज्यूबली साजरी झाली. या उत्सवात एका अॅडमिनिस्ट्रेटीव्ह ब्लॉकला हंगपन यांचे नाव देण्यात आले.
- हंगपन यांच्यावर एक माहितीपट (डॉक्यूमेंटरी) तयार करण्यात आला आहे.
- अॅडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पब्लिक इन्फर्मेशन यांनी प्रजासत्ताक दिनी या माहितीपटाचे उद्घाटन केले.
No comments:
Post a Comment