त्यामुळे पाकशी लढताना साम, दाम, दंड भेद नीतीचा वापर करून कौटिल्याने सांगितलेल्या शत्रूचा भेद करण्याचे सूत्र अनुसरावे लागेल. दहशतवादाच्या विरोधात एकमुखी आवाज भारताने अनेकवेळा उठविला आहे. अमेरिका, रशिया, फ्रान्स, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या सर्व लोकशाही राष्ट्रांचे ऐक्यआ कायम ठेवून पाकच्या दहशतवादाला आता सर्वांनी मिळून एकत्रितपणे लढा देण्याची गरज आहे. पाकिस्तानच्या “शॅडोवॉर’शी लढण्यासाठी पूर्वतयारी करून प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे नवे डावपेच आखले पाहिजेत.
पाकिस्तानच्या वाढत्या कुरापती आणि लष्करी छावण्यांवरील हल्ले कसे रोखायचे, हा भारतापुढील एक यक्ष प्रश्न् आहे. एकीकडे शांततेच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे सतत दहशतवादी हल्ल्यांना उत्तेजना द्यावयाचे, ही पाकिस्तानची दुहेरी नीती आहे. आतापर्यंत सर्व दहशतवादी हल्ल्यांचे एक समान तंत्र आहे. बेसावध क्षणी अचानक हल्ले करून जीवित आणि वित्त हानी करायची या तंत्राला प्रतिशह देण्यासाठी नवे डावपेच आखावे लागतील. कौटिल्याने त्याच्या राजकीय अर्थशास्त्रात सांगितलेल्या भेदनीतीचा उपयोग करून बलुचिस्तान आणि पख्तुनिस्तानमध्ये पाकिस्तानच्या नाकात दोऱ्या बांधल्याशिवाय हे दहशतवादी हल्ली कमी होणार नाहीत. विविध दहशतवादी गटांना सतत साह्य करून पाकिस्तान त्यांना सीमा ओलांडून जम्मू-काश्मी र व पंजाब भागात घुसण्यासाठी प्रवृत्त करीत असतो. या प्रकारच्या कारवायांमुळे होत असलेली नुकसानी रोखण्यासाठी काही ठाम पावले उचलण्याची गरज आहे.
आपणास नजीकच्या काळात आपली गुप्तचर यंत्रणा अधिक अद्ययावत करावी लागेल. रशियाने विकसित केलेल्या अद्ययावत माहिती यंत्रणेचा उपयोग करून आपणास अशी प्रगत सामग्री वापरली पाहिजे की त्यामुळे घुसखोरांचा प्रवेश होताच त्यांच्या हालचाली संगणकप्रणालीने उपग्रहाद्वारे आपणास शोधता आल्या पाहिजेत व त्याचा पाठपुरावा करून घुसखोरांना वेळीच रोखता आले पाहिजे. या दृष्टीने जगातील प्रगत देशात विकसित करण्यात आलेल्या स्वयंचलित प्रणालींचा उपयोग करून शत्रूंच्या हालचालींवर कडक नजर ठेवता आली पाहिजे. तसे झाले तर गेल्या काही महिन्यांत घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. सावधानता, पूर्व तयारी आणि नियोजित प्रत्त्युत्तर या मार्गाने शत्रूशी लढण्याची व राजनैतिक पद्धती विकसित करून पाकिस्तानच्या डावपेचांना उत्तर देण्याची गरज आहे.
शॅडोवार किंवा छायायुद्ध हे दुर्बल राष्ट्राचे युद्ध प्रयत्न असतात. कारण समारोसमोरच्या युद्धात आपण लढू शकत नाही, याची त्यांना जाणीव असते. दोन-तीन वेळा पराभव पत्करून मार खाल्ल्यानंतर त्यांचे युद्ध लढण्याचे नैतिक युग संपलेले असते अशा वेळी शॅडोवार लढविताना छुपे हल्ले करण्यावर भर दिला जातो. भारतीय लष्करी तळांची गोपनीय माहिती मिळवून, समप्रमाणात वाहनांची नक्कल करून, पोषाखाचे अनुकरण करून सीमा ओलांडून हल्ले केले जातात व त्यामुळे जीवित व वित्तहानी अधिक होते. पाकिस्तानने कमर जावेद बाजवा यांना लष्कर प्रमुखपदी नेमले आणि सूत्रे हाती घेताना त्यांनी देखील शांततेचे अधिवचन दिले होते; पण ते लगेचच मोडले. अशा प्रकारच्या खोट्या वचनांना काय म्हणावे? त्यामुळे जर भविष्यामध्ये शांतता प्रस्थापित करावयाची असेल तर शॅडोवॉरशी लढताना नवे तंत्र विकसित करण्याची गरज आहे.
संसदेवरील हल्ला, मुंबई दहशतवादी हल्ला, तसेच सातत्याने भारताच्या विविध भागांत झालेले हल्ले पाहता आता या सर्व दहशतवादी धोरणास प्रत्युत्तर देण्यासाठी ठोशास ठोसा धोरण आखण्याची गरज आहे. नाही तर दहशतवादी मनसुबे वाढण्याचा धोका संभवतो. भारतीय जवानांना विद्रूप करणे, त्यांचे शीर पळवणे, मुश्कीदल आचारसंहिता व नैतिक तत्त्वे पायदळी तुडविणे… या अमानुष प्रवृत्ती आहेत. जागतिक पातळीवर निषेधार्ह आणि तेवढ्याच चिंताजनक अशा या घटनामुळे संताप होतो. पाकच्या अशा धोरणांचा केवळ निषेध करून उपयोगाचे नाही तर त्यास चोख प्रत्युत्तर देण्याची गरज आहे. आयएसआयच्या वाढत्या कारवाया आणि पाक गुप्तचर यंत्रणेचे जाळे पाहता भारतानेही आपल्या गुप्तचर यंत्रणेमध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. गुप्तचर यंत्रणेतील शैथिल्य दूर करून त्यात माहिती संकलित अद्ययावत साधने दिली पाहिजे. पाकव्याप्त काश्मीशर तसेच पंजाब, सिंध आणि पाकच्या संरक्षण यंत्रणेतील हालचाली याबाबत मुक्त माहितीचा तपशील आपण प्राप्त करून घेतला पाहिजे. संवेदनाशील माहिती प्राप्त करून ती जबाबदार यंत्रणेला उपलब्ध करून दिली पाहिजे.
गुप्तचर यंत्रणेचे अत्यंत प्रगत व आधुनिक रूप विकसित केले पाहिजे. हल्ल्याबाबत सूचना प्राप्त झाल्यानंतर योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे. भविष्यकाळामधील धोके, अडचणी आणि समस्या लक्षात घेऊन दहशतवादाशी लढताना नवी पावले टाकली पाहिजेत. संरक्षणविषय गोपनीय माहिती, तसेच संरक्षण सज्जता याबाबत यथोचित काळजी घेतली पाहिजे. आपल्या सुनिश्चिित प्रयत्नातून घुसखोरी रोखण्याचा निश्चि,त आराखडा तयार केला पाहिजे.
घुसखोरी कशी रोखणार ?
पाकव्याप्त काश्मीोरमध्ये पाकिस्तान गेल्या दोन दशकांपासून 34 ते 54 एवढी प्रशिक्षण केंद्रे चालविते आहे. हा आकडा सतत वाढत गेला आहे. उपग्रह छायाचित्रे व गुप्तचर अहवाल यांच्या आधारे त्यांना रोखण्यासाठी प्रथमच सर्जिकल स्ट्राईकची आखणी काही महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. निश्चि्त कालावधीनंतर अशा योजनाची वारंवार आखणी केली पाहिजे. त्यामुळे नियंत्रण रेषा ओलांडून होणारी घुसखोरी रोखता येईल. गेल्या काही महिन्यांमध्ये पाकने बऱ्याच वेळा नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय सीमेवर गोळीबार केला. निषेधाचे पत्रे पाठवूनही त्याचा काही उपयोग होत नाही. खरे तर पाकला रोखण्यासाठी जागतिक दबाव वाढविण्यास जसे यश आले आहे, तसे दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्याची धोरणात्मक पावले टाकली पाहिजेत. संयुक्तल राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावर काश्मीकर प्रश्नापवर ठाम भूमिका घेऊन पाकला रोखावे व एकाकी पाडावे लागेल.
नियंत्रण रेषेवर गोळीबार करून त्या आडून घुसखोर पाठवण्याचे हे जुने तंत्र आहे. त्यावर उपाय म्हणून सीमा भागातील गस्त वाढवावी, तसेच सीमांचे नियुक्तीसकरण करून घुसखोरांना पायबंद घालावा लागेल आणि तसे झाले तरच सीमा भागातून होणारी सततची घुसखोरी रोखता येईल. सागरी आणि हवाई मागावर सतत देखरेख ठेवून टेहळणी वाढवावी लागेल. इस्रायलसारख्या राष्ट्राचा अनुभव समोर ठेवून आपले पारंपरिक युद्धतंत्र बदलून नव्या शास्त्रीय प्रणालींचा वापर करावा लागेल.
नियोजित प्रयत्नांची गरज
भू-राजनैतिक संरक्षण व्यवस्थेत भौगोलिक परिस्थितीचा विचार करून शत्रूशी संघर्ष करावा लागतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याचे तंत्र वापरून शत्रूला जेरीस आणले होते, त्याच पद्धतीने आपणास पाकिस्तानच्या आक्रमक हालचालींना तोंड द्यावे लागणार आहे. शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यापासून प्रेरणा घेऊन व्हिएतनाममध्ये हो-चिंग यांनी अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यांचा मुकाबला केला होता, तसेच फिडेल कॅस्ट्रो यांनी क्युघबाचे स्वातंत्र्य युद्ध गनिमी काव्याने लढले होते. पाकव्याप्त काश्मीारमधून दहशतवाद्यांना मागे रेटण्यासाठी या तंत्राचा उपयोग करून आपणास जम्मू-काश्मी रमध्ये यश संपादन करावे लागेल. नियोजित प्रयत्न करून आणि सर्व प्रकारच्या गोपनीय माहितीची चाचपणी करून नव्याने आणखी एका सर्जिकल स्ट्राईकची आखणी करणे गरजेचे आहे. भारतीय युद्धतंत्राची प्राचीन परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्या समन्वयातून ही नवी व्यूहरचना करावी लागेल.
समारोप
या सर्व चर्चेचा अर्थ असा की पाकचे शॅडोवार घातक व नुकसान करणारे आहे. त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी व्हिएतनाम आणि इस्रायलचा संघर्ष पाहता त्यापासून काही शिकले पाहिजे. सीमेवरील वाढता दहशतवाद घुसखोरी व हिंसाचार या बाबी किती सहन करावयाच्या? ही डोकेदुखी कायमची थांबवायची असेल तर 1965, 1972 व कारगिल विजयाची पुनरावृत्ती करावी लागेल.
No comments:
Post a Comment