Total Pageviews

Monday 23 January 2017

अमेरिका फर्स्ट!‘बाय अमेरिकन, हायर अमेरिकन.’ अमेरिकन वस्तूच खरेदी करा आणि अमेरिकन कंपनीचीच सेवा घ्या.- US PRESIDENT MUST READ


January 23, 2017020 अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सूत्रे ग्रहण केल्यानंतर पहिल्याच भाषणात ‘अमेरिका फर्स्ट’ असा नारा दिला. १२ मिनिटांच्या आपल्या भाषणात त्यांनी अनेक मुद्यांना स्पर्श करीत, आपली आणि देशाची आगामी वाटचाल कशी राहील, याचे सूतोवाच केले. इस्लामिक दहशतवादाचे आम्ही जगाच्या भूमीवरून नामोनिशाण मिटविल्याशिवाय राहणार नाही, अशी गर्जना करून त्यांनी इसिस, अन्य दहशतवादी संघटना आणि त्यांना मदत करणार्‍यांना कठोर शब्दांत इशारा दिला. निवडणुकीपूर्वी त्यांनी तर असे म्हटले होते की, एकाही मुस्लिमाला यानंतर अमेरिकेत प्रवेशच नको! त्याची प्रचीती त्यांच्या भाषणातून आली. ओबामा प्रशासनावर अप्रत्यक्षपणे ताशेरे ओढताना ट्रम्प म्हणाले, गेल्या काही वर्षांत वॉशिंग्टन हे फुलले, बहरले, पण त्यातील वाटा जनतेला मिळाला नाही. एकीकडे राजकारणी नेते अधिक धनाढ्य झाले तर इकडे रोजगार गेले, कारखाने बंद पडले. अमेरिकन जनतेला त्यांच्या पाल्यांसाठी उत्कृष्ट शिक्षण हवे आहे, त्यांच्या कुटुंबीयांसाठी चांगला शेजार हवा आहे आणि युवकांना चांगला रोजगार हवा आहे. तो देण्याचा आपला पुरेपूर प्रयत्न राहील. मी ग्वाही देतो, तुम्हाला मी निराश करणार नाही. आम्ही आमचे पैसे खर्च केले आणि बाहेरच्या कंपन्यांना मलिदा दिला. आमचे उद्योग बुडीत निघाले असताना, विदेशी कंपन्यांना प्रोत्साहन दिले. आता हे सगळे बंद होईल. आम्ही अन्य देशांच्या सीमांच्या रक्षणासाठी आपला निधी, मनुष्यबळ दिले, पण आमच्या जनतेला मात्र दिलासा देऊ शकलो नाही. आम्ही हजारो कोटी रुपये विदेशी कंपन्यांवर खर्च केले, पण आमची स्वत:ची संसाधने मात्र जमीनदोस्त झाली. पण, हा आता भूतकाळ होता. अमेरिकेच्या नव्या भविष्याकडे आपणा सर्वांच्या एकजुटीने आम्हाला समोर जायचे आहे. यानंतरचा प्रत्येक निर्णय मग तो व्यापार, करप्रणाली, व्हिसा, परराष्ट्र व्यवहार असो, याबाबत आता अमेरिकन जनतेचे हित समोर ठेवूनच आम्ही घेणार आहोत, याबद्दल खात्री बाळगा. आम्ही आमची संपत्ती परत आणू, आम्ही आमचे रोजगार परत आणू. संपूर्ण अमेरिकेत चकाचक रस्ते, महामार्ग, पूल, विमानतळ, बोगदे, रेल्वेचे जाळे विणू आणि आमच्या जनतेला सर्व सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू… अशी अनेक आश्‍वासने ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या भाषणातून दिली. ट्रम्प यांनी एक नवा मंत्रही दिला- ‘बाय अमेरिकन, हायर अमेरिकन.’ अमेरिकन वस्तूच खरेदी करा आणि अमेरिकन कंपनीचीच सेवा घ्या. आम्ही अमेरिकेला पुन्हा मजबूत बनवू, धनाढ्य बनवू आणि गौरवशाली बनवू, असे उद्गार ट्रम्प यांनी काढले. या संपूर्ण भाषणात त्यांनी अमेरिकेतील बेरोजगारी हा मुद्दा आपल्या केंद्रस्थानी ठेवलेला दिसतो. ट्रम्प हे अमेरिकेतील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आहेत. त्यामुळे त्यांचा भर हा उद्योग, रोजगार, व्यापार यावर असणे स्वाभाविक आहे. ट्रम्प यांच्यासारख्या व्यक्तीच्या हाती अमेरिकेची सत्ता आल्यानंतर जग, आगामी घडामोडी काय असू शकतात, याचा बारकाईने विचार करीत आहे. अमेरिकेच्या नव्या धोरणाचा आपल्या देशावर काय परिणाम होईल, याचा विचार प्रामुख्याने चीन, रशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया, जपान यांसारख्या देशांसह भारतानेही करणे क्रमप्राप्त आहे. त्याचे कारण म्हणजे आज अमेरिकेत भारतीयांची संख्या ३४ लाख आहे. सोबतच एच-१ बी व्हिसावर काम करण्यासाठी आलेल्या लोकांची संख्या दोन लाख आहे. अमेरिकेत १२ टक्के शास्त्रज्ञ व ३८ टक्के डॉक्टर्स हे भारतीय आहेत. एकट्या ‘नासा’त (नॅशनल एरोनॉटिक्स ऍण्ड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन) ३७ टक्के शास्त्रज्ञ हे भारतीय आहेत. ट्रम्प यांनी निवडणुकीपूर्वीच एच-१ बी व एल-१ व्हिसाचे नियम अधिक कडक करण्याचा विचार मांडला होता. तो येत्या काही दिवसांत प्रत्यक्षात कायद्याच्या स्वरूपात येणार आहे. या नव्या कायद्यानुसार आता एच-१ बी व्हिसासाठी साधारणत: ४० टक्के रक्कम अधिक मोजावी लागणार आहे. अमेरिकेत ज्या प्रमुख कंपन्या आपल्या सेवा देतात, त्यात भारतातील अनेक कंपन्यांचा समावेश आहे. नव्या कायद्यानुसार एच-१ बी व्हिसाची मर्यादा एक लाख डॉलर्सपर्यंत वाढविण्यात आली आहे. आतापर्यंत साधारणत: ६१ ते ७१ हजार डॉलर्स अशी मर्यादा होती. याचा भारतातील आयटी कंपन्यांवर मोठा प्रतिकूल परिणाम होणार आहे. या कंपन्यांना आता एवढा मोठा पगार देऊन अमेरिकेत आपले कर्मचारी पाठविताना विचार करावा लागेल, असे बड्या आयटी कंपन्यांचे प्राथमिक आकलन आहे. याचा अर्थ भारताला आपल्याच देशात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्या लागतील. एकीकडे नरेंद्र मोदी ‘मेक इन इंडिया’सारखी मोहीम आखून अधिकाधिक गुंतवणूक करण्यासाठी विदेशी कंपन्यांना प्रोत्साहन देत आहेत आणि त्याला मोठा प्रतिसादही लाभत आहे. जागतिक व्यासपीठावर असे उघडपणे बोलले जात आहे की, भारतात आगामी काळात रोजगाराच्या विपुल संधी उपलब्ध आहेत. अमेरिकेने जी भूमिका घेतली आहे, त्याचा परिणाम केवळ भारतावरच नव्हे, तर अन्य विकसित आणि विकसनशील देशांवरही होणार आहे. अशा देशांती भारतात गुंतवणूक करून नवे उद्योग स्थापन करण्याच्या प्रक्रियेला अधिक गती द्यावी लागेल. भारतात कुशल अभियंते आणि तंत्रज्ञांची सध्या मोठी आहे. पण, दर्जात्मकदृष्ट्या कमी आहे. ही संख्या तातडीने वाढीस लागावी, यासाठी प्राधान्याने लक्ष द्यावे लागेल. ट्रम्प यांचा एच-१ बी व्हिसासाठी पदव्युत्तर व उच्च अभ्यासक्रमांना मात्र सूट देण्याचा विचार दिसतो. पण, सर्वसाधारण रोजगारांच्या बाबतीत त्यांचे धोरण आडमुठे आहे. मायक्रोसॉफ्टसारख्या अमेरिकन कंपनीने आपल्या सात हजार कर्मचार्‍यांची कपात केली आहे. यात भारतीयांची संख्या मोठी आहे. ट्रम्पमुळे चीनवरही परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. चीनची अमेरिकेतील बाजारपेठ समाप्त करण्यासाठी कठोर आयात कर लावण्याचा ट्रम्प सरकार विचार करीत आहे. गेल्या १५ वर्षांत चीनच्या उत्पादनांमुळे अमेरिकेतील लघुउद्योग बंद पडून ५० लाख लोक रोजगार हरवून बसले आहेत. हे सर्व रोजगार परत आणण्याचे त्यांनी वचन दिले आहे. इस्लामिक दहशतवाद समाप्त करण्याचा नारा देणार्‍या ट्रम्पमुळे पाकिस्तानला मिळणारी मदत यापुढे बंद होण्याची चिन्हे आहेत. पाकिस्तान हा सर्वाधिक धोकादायक देश असल्याचे ट्रम्प यांनी प्रचारादरम्यान म्हटले होते. पाकिस्तानने आता चीनकडे भीक मागण्याचे धोरण अवलंबिले असल्यामुळे अमेरिका चिंतित आहे. अशा स्थितीत ट्रम्प भारताला मदत करण्याची शक्यता अधिक आहे. एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, ट्रम्प यांना प्रशासनिक किंवा आंतरराष्ट्रीय संबंधांचा काहीही अनुभव नाही. त्यामुळे ज्या बाबी गुलदस्त्यात ठेवायच्या, त्या बाबी ट्रम्प उघडपणे बोलू लागल्यामुळे प्रशासन आणि पॅण्टॉगॉनही चक्रावून गेले आहे. अजून बराच कालावधी बाकी आहे. या काळात काय घडते हे पाहावयाचे

No comments:

Post a Comment