Total Pageviews

Tuesday, 8 January 2013

BRIG HEMANT MAHAJAN ON IBN LOKMAT

BRIG HEMANT MAHAJAN ON IBN LOKMAT 10 -1045 PM 08 JAN 2013

PAK TROOPS KILL TWO INDIAN SOLDIERS IN KG SECTOR


REPEAT TELECAST 9 AM 10 AM  ON 10 JAN 2013

दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद
शस्त्रसंधीचे उल्लंघन

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय हद्दीत 600 मीटरपर्यंत घुसखोरी करून पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. पाक सैनिकांनी जवानांची गळा कापून हत्या तर केलीच, शिवाय एकाचे मुंडके त्यांनी सोबत नेल्याचेही वृत्त आहे. अन्य दोन जवान जखमीझाले आहेत. मंगळवारी हा प्रकार घडला.
त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पाककडूनभारताच्या सात चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. त्याला भारताकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले.या घटनेनंतर नियंत्रण रेषेवर तणाव निर्माण झाला आहे. लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाककडून घुसखोरीचा प्रयत्न झाला. त्यासाठीच गोळीबार करण्यात आला. दाट धुके घनदाट जंगलाचा फायदा घेऊन भारतीय हद्दीत 100 मीटरपर्यंत घुसखोरी केलेल्या पाक सैनिकांनी गस्त घालणा-या भारतीय पथकावर हल्ला चढवला. दोन तास दोन्ही बाजूंनी चकमक सुरू होती. हल्ल्याच्या वेळी पाककडून तोफगोळ्यांचाही वापर झाला. पाक सैनिकांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची नावे लान्स नायक हेमराज लान्स नायक सुधाकर सिंह अशी आहेत. हल्ल्यानंतर त्यांची शस्त्रे पाक सैनिक त्यांच्यासोबत घेऊन गेले आहेत. हल्ल्यातील जखमींवर उधमपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भारतीय जवानांनी दिलेल्या चोख प्रत्युत्तरानंतर पाक सैनिक हल्लेखोर पळून गेले. त्यात काही दहशतवादीही असल्याचा संशय आहे. लष्करप्रमुख विक्रमसिंग यांनी उत्तरी विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल केटी परनायक यांच्याकडून या हल्ल्याबाबत माहिती घेतली आहे. परनायक यांनी गोळीबार झालेल्या चौक्यांना भेट दिली. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी अधिका-यांची बैठक घेतली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही देशांदरम्यान 2003 मध्ये युद्धबंदी लागू झाली होती. परंतु गेल्या काही दिवसांत पाककडून युद्धबंदीचे वारंवार उल्लंघन केले जात आहे. गेल्या 48 तासांत पाकिस्तानकडून दोनवेळा गोळीबार करण्यात आला. थंडीच्या काळात सीमेपलिकडून घुसखोरीच्या प्रयत्नात वाढ होते. गेल्या महिन्याभरात पाक लष्कराने किमान बारा वेळा गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. रविवारी काश्मीरच्या उडी सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारास भारताकडून प्रत्युत्तर देण्यात आले. त्यात एका पाक सैनिकाचा मृत्यू झाला.

No comments:

Post a Comment