Total Pageviews

Sunday, 27 January 2013

हिंदू संघटनांना डोस पाजणारे कारवाईसाठी पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांच्या घराच्या पायर्‍या झिजवणारे एकजात सगळे स्वार्थी लोककमल हसन’ला वार्‍यावर सोडून बिळात लपले आहेत.

विश्‍वरुपम! सामना अग्रलेख
कॉंग्रेसवाले काहीही बकवास करीत असले तरी दहशतवादास जात आणि धर्म नसतो. मात्र सध्या जगभरात थैमान घालणार्‍या दहशतवादाचा रंग फक्त हिरवा आणि हिरवाच आहे. हे फक्त आम्ही म्हणत नाहीतर अमेरिकेच्या ओबामापासून इंग्लंडच्या राणीपर्यंत सगळ्यांचेच यावर एकमत आहे. हिंदुस्थानचे चित्र तर अधिक भयंकर आहे. येथील मुसलमानांस शहाणपण येणार तरी कधी? याचे उत्तर प्रत्यक्ष खुदाही देऊ शकणार नाही. मुल्ला, मौलवी हाफीज सईद, लादेनछाप लोकांच्या नादी लागून त्यांनी स्वत:च्या समाजाचा धर्मांध नरक केलाच आहे, पण हिंदुस्थानचाही ते नरक करू पाहत आहेत. आपण हिंदुस्थानपासून कसे वेगळे आहोत हे दाखवून देण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. आता त्याच्या खटाटोपात भर पडली आहे तीविश्‍वरुपम’ या चित्रपटाची. कमल हसनचाविश्‍वरुपम’ हा चित्रपट मुस्लिम धर्मांधांच्या दहशतवादाचा बळी ठरला आहे. या चित्रपटात म्हणे मुस्लिम समाजाचा दहशतवादाशी संबंध जोडण्यात आला आहे. चित्रपटातील कथानकात दहशतवादी पात्रांची नावे मुसलमान असल्याने काही संघटना न्यायालयात गेल्या त्यांनी तामीळनाडूत चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणली. पाठोपाठ कर्नाटकातही बंदीचे लोण पोहोचले. हा सांस्कृतिक दहशतवाद असल्याचे कमल हसनचे म्हणणे आहे त्या दहशतवादाविरुद्ध तो आता एकाकी लढा देत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाला तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल अशी धमकी मुस्लिमांनी तामीळ सरकारला दिली. त्यामुळे मुस्लिमांच्या भावना दुखावू नयेत म्हणून कमल हसन याच्यावरच दाबदबाव आणण्याचे कायदेशीर प्रयोग सुरू आहेत. मुस्लिमांच्या भावना कधी कोणत्या
गोष्टीमुळे दुखावतील हे दुखावलेले मुसलमान भावनांचे भांडवल करून कधी रस्त्यावर उतरतील याचा नेम नाही, पणविश्‍वरुपम’च्या निमित्ताने एक बरे झाले की, या देशातील काही मुस्लिमांना आपण दहशतवादी म्हणून बदनाम झाल्याची जाणीव झाली या बदनामीविरोधात त्यांनी बांग ठोकली. प्रश्‍न इतकाच आहे की, चित्रपटाच्या पडद्यावर मुसलमानांना अतिरेकी किंवा दहशतवादी दाखवल्यामुळे जे आज खवळले आहेत त्यांनी हा बदनामीचा डाग धुऊन काढण्यासाठी काय केले? या देशातील प्रत्येक मुसलमान दहशतवादी नसेलही, पण पकडलेला प्रत्येक दहशतवादी मुसलमान का असतो? देशाच्या गृहमंत्र्यांंनी जयपूरमध्ये शेण खाऊन हिंदू संघटनांना अतिरेकी ठरविण्याचा प्रयत्न केला म्हणून मुस्लिमांवरील कलंक दूर होणार नाही. ‘विश्‍वरुपम’ चित्रपटात मुस्लिमांना दहशतवादी दाखवले हे या देशाचे कटुसत्य आहे विश्‍वरुपम’वर बंदी आणली तरी ते सत्य बदलता येणार नाही. अफझल गुरू, मोहम्मद अजमल कसाब ही नावे काय सांगतात? दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, छोटा शकील, अबू सालेम कोण आहेत? या पात्रांना दहशतवादी म्हणून पडद्यावर उभे केले तर मुसलमानांनी खवळून उठायचे तसे कारण काय? यातील बहुसंख्य नावे पाकिस्तानी आहेत हे मुसलमानांनी आधी लक्षात घेतले पाहिजे. हिंदुस्थानातील तरुणांना माथेफिरू बनवून त्यांना दहशतवादाचे प्रशिक्षण देण्याचे काम पाकिस्तानी भूमीवर राजरोस सुरू आहे आमच्याकडील मुसलमान तरुण त्यास बळी पडताना दिसत आहेत. पुण्यातले भटकळ बंधू किंवा मराठवाड्यातील अबू जिंदालसारखे तरुण आज पाकिस्तानच्या हातातील बाहुले बनून हिंदुस्थानच्या नायनाटासाठीजिहादी’ बनले त्यांच्या माथेफिरूपणाने अनेक निरपराध बळी गेले. शेवटी त्यांच्या डोक्यात धर्मांधता भिनली त्यातूनच त्यांनी पाकिस्तानलाधर्म’ म्हणून मदत केली हेविश्‍वरुपम’ला विरोध करणारे कसे विसरले? आजविश्‍वरुपम’च्या निमित्ताने ज्यांचा धर्म स्वाभिमान जागा झाला, त्यांनी आत्मपरीक्षण केले तर सत्याचे चांदतारे त्यांच्या डोळ्यांपुढेही चमकतील. मुसलमानांची बदनामी होते दहशतवादी म्हटल्यामुळे मान खाली जाते हा विचार चांगला आहे, पण ही वेळ त्यांच्यावर आणली कोणी? मुसलमानांच्या अधोगतीस ते स्वत: जबाबदार आहेत. हैदराबादचा धर्मांध नेता ओवेसी हा खुलेआम हिंदुस्थानविरोधात गरळ ओकतो, मुसलमानांना हिंदू समाजाविरुद्ध चिथावणी देतो, पंधरा मिनिटांत शंभर कोटी
हिंदूंना खतम करण्याची भाषा करतो
तिथे जमलेले हजारो मुसलमान तरुण ओवेसीचा धिक्कार करण्याऐवजी त्याचा जयजयकार करतात हे कोणत्या सभ्य सुसंस्कृत समाजाचे लक्षण समजायचे? ‘विश्‍वरुपम’ला विरोध करणार्‍या किती मुसलमान संघटनांनी त्या राष्ट्रद्रोही ओवेसीच्या जहरी थोबाडावर बंदी घालण्याची मागणी केली? ‘विश्‍वरुपम’ तर फक्त पडद्यावर आहे. ओवेसीचाहॉरर’ चित्रपट प्रत्यक्षात घडतो आहे, पण ओवेसीचा जयजयकार विश्‍वरुपम’वर बंदीची मागणी हे ढोंगच आहे. ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीतास विरोध करणे हासुद्धा एक प्रकारे दहशतवादच आहे या देशातील धर्मांध मुसलमान या दहशतवादात सामील झालेच आहेत. मुंबईत अमर जवान शिल्पावर लाथा मारणार्‍या मुसलमान झुंडशाहीचा धिक्कार किती मुसलमानी संघटनांनी केला? त्यामुळे तुमची बदनामी झाली नाही काय रे नमकहरामांनो? ‘माय नेम इज खान’च्या विरोधात एका प्रखर राष्ट्रप्रेमाने आंदोलन करणार्‍या शिवसैनिकांवर कारवाई करा अशी बांग देणारेच आजविश्‍वरुपम’च्या विरोधात जिहादच्या आरोळ्या ठोकीत आहेत. आम्हाला आश्‍चर्य वाटते ते तुमच्या सिनेमा-सिनेमावाल्यांचे. एरवी नको तिथेएकजूट’ दाखविणारे पडद्यावरील अभिव्यक्तिस्वातंत्र्यासाठी वाचाळकी करणारे हे फिल्लमबाजविश्‍वरुपम’च्या निमित्ताने कमल हसनच्या मागे ठामपणे एकजुटीने उभे राहिलेले दिसत नाहीत. ‘‘आम्ही कलाकार आहोत, त्यात धर्म किंवा राजकारण आणू नका’’ असे हिंदू संघटनांना डोस पाजणारे कारवाईसाठी पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांच्या घराच्या पायर्‍या झिजवणारे एकजात सगळे स्वार्थी लोककमल हसन’ला वार्‍यावर सोडून बिळात लपले आहेत. अपवाद फक्त त्या आमीर खानचा. त्याने चित्रपटास विरोध करणार्‍या संघटनांचा निषेध केला आहे, पण इतरांचे काय? ‘विश्‍वरुपम’ला विरोध करणारे फक्त मुसलमान आहेत. त्यांच्याशी पंगा नको म्हणून जर नौटंकीबाज अभिव्यक्तिस्वातंत्र्यवाल्यांनी शेपट्या घातल्या असतील तर त्यांचेहीविश्‍वरूप’ अशा प्रकारे चव्हाट्यावर आले. कमल हसनच्या चित्रपटावर बंदी येणे हा प्रकार चांगला नाही. हा दहशतवादच आहे, पण तो मोडून काढण्याची हिंमत आज तरी सरकारमध्ये नाही 

No comments:

Post a Comment