Total Pageviews

Thursday 10 January 2013

अकबरुद्दीन ओवेसी की बॅरिस्टर जीनाचा पुनरजन्म ?
हैदराबादमध्ये आमदार असलेले अकबरूद्दीन ओवेसी यांनी आमदार असूनही आपण पाकिस्तानमध्ये असल्याप्रमाणेच वक्तव्ये केली आहेत आणि त्यामुळे भारतातील लोकशाही धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकशाहीला धोका निर्माण होईल अशी वक्तव्ये हल्ली सर्रास केली जात आहेत. याला भाषण स्वातंर्त्य म्हणायचे की अभिव्यक्ती स्वातंर्त्य? संविधानाने प्रत्येकाला स्वातंर्त्य दिले आहे, याचा अर्थ लोकशाही धोक्यात येईल, असे वक्तव्य करणे कितपत योग्य आहे. आमदार अकबरूद्दीन ओवेसी यांनी भारतीय लोकशाहीच्या चिंधडय़ा उडवल्या आहेत. बॅ. जीना यांनी स्वतंत्र पाकचा हट्ट धरला आणि दोन देश जन्माला आले. पाकपेक्षा जास्त मुस्लिम भारतातच राहिले. आजही त्यांना जे भारतात स्वातंर्त्य मिळत आहे ते पाकमध्ये मिळाले असते का? पाकमध्ये आजची स्थिती काय आहे? पाकमध्ये मुस्लिम सुरक्षित आहे का? आपण जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन भारताची लोकशाही जपतो आहोत. संपूर्ण जगात भारतातील लोकशाही सर्वात मोठी आणि सर्व धर्म आणि भाषा यांना एकत्रपणे नांदणारी लोकशाही म्हटले जाते. काही विघ्नसंतोषी लोक या सलोख्याला तोडायचा प्रयत्न करतात. आजही भारतात असे काही भाग आहेत जिथे पाकिस्तानची क्रिकेट टीम जिंकल्यानंतर फटाके वाजवले जातात. अकबरूद्दीनसारखे लोक लोकशाहीच्या आडून धर्माधता वाढवत आहेत.
अकबरुद्दीन ओवेसी यांची यापूर्वीची वादग्रस्त वक्तव्यं
2007 - सलमान रश्दींना जीवे मारण्याचा फतवा
2007 -
बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांना जीवे मारण्याचा फतवा
2012 -
प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गेल्या डिसेंबर महिन्यात एफआयआर दाखल

देशद्रोही वक्तव्ये करणाऱ्या अकबरुद्दीनने डिसेंबरमध्ये सगळीच पातळी सोडली. आंध्र प्रदेशमध्ये आदिलाबाद येथे २४ डिसेंबरला झालेल्या जाहीर सभेत देशद्रोही वक्तव्याबरोबरच देशाला शिव्यांची लाखोलीही वाहिली होती. हा देश, या देशातील बहुसंख्याक आमचे शत्रू असून त्यांना धुळीला मिळवू, त्यांना कधीही शांततेने जगू देणार नाही, असे या सभेत जाहीरपणे म्हणायला अकबरुद्दीन कचरत नाही. आंध्र प्रदेशमधील कुनुल येथे २०११मध्ये जाहीर सभेत बोलताना माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचे निधन झाले नसते तर मी त्यांना माझ्या हाताने ठार मारले असते, असे विधान केले होते. हिंदूंना नपुंसक आणि पोलिसांना नपुंसकाचे लष्कर म्हणणा-या अकबरुद्दीनवर आतापर्यंत पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, ही आश्चर्याची गोष्ट आहे. मात्र, जनहित याचिकेवरील सुनावणीनंतर ओवेसीविरोधात कारवाईचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानंतर अकबरुद्दीनला त्याच्या सोयीने इंग्लंडवरून परतल्यानंतर एखाद्या ज्येष्ठ राजकीय नेत्याप्रमाणे जानेवारीला अटक करण्यात आली. स्वातंत्र्यापूर्वीच्या हैदराबाद संस्थानात निजामाने पायाभरणी केलेल्या याएमआयएम पक्षाचा प्रमुख अकबरुद्दीनचा मोठा भाऊ असाऊद्दीन ओवेसी हा खासदार आणि बॅरिस्टर आहे. आंध्र प्रदेशात सात आमदार असलेल्या या पक्षाची विचारसरणी देशाचा समूळ विनाश या मुद्दयावरच तयार झालेली दिसते. राज्यातल्या नांदेड जिल्ह्यात अलीकडे झालेल्या निवडणुकीतएमआयएमचे ११ नगरसेवक निवडून आले आहेत. राज्यातील स्फोटांप्रकरणीलष्कर--तोयबाच्या हस्तकांना, दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. त्यातएमआयएमच्या नांदेडमधील एका कार्यकर्त्यांचा समावेश आहे. थोडक्यात, ‘एमआयएमची वाटचाल देशात बंदी घालण्यात आलेल्यासिमीच्या मार्गाने होऊ लागल्याचे चित्र आहे.केवळ १५ मिनिटांसाठी पोलीस हटवा , २५ कोटी मुसलमान १०० कोटी हिंदूंना आपली ताकद दाखवतील ,' अशी गरळ ओकून देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे हैदराबादचे आमदार अकबरउद्दीन ओवेसी (४२) यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. ओवेंसींविरोधात भारतीय दंड विधान कलम १५३ (धार्मिक तेढ निर्माण करणे) , २९५ (मुद्दाम धार्मिक भावना दुखावणे) आणि १२१ (देशाविरुद्ध युद्ध पुकारण्याचा प्रयत्न) अंतर्गत उस्मानिया विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जुन्या हैदराबाद शहरात प्रचंड तणाव
त्याच्या अटकेच्या वृत्ताने जुन्या हैदराबाद शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पोलिस बंदोबस्तामुळे कुठलीही अनुचित घटना घडली नाही. सौम्य लाठीमार करून पोलिसांनी ओवेसी समर्थकांना शांत केले. ओवेसीला अटक करण्यात येणार असल्याचे वृत्त जुन्या हैदराबाद शहरात वार्‍यासारखे पसरल्यानंतर एमआयएमचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. पोलिसांनी आधीच जलद कृती दलाचे जवान आणि राज्य पोलिसांना मोठ्या संख्येत तैनात केले होते. ओवेसीला गांधी रुग्णालयातच अटक करण्यात आल्यानंतर अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत २०० किलोमीटरचे अंतर पार करून त्याला अदिलाबाद जिल्ह्यातील निर्मल शहरात आणण्यात आले. हैदराबादमधील चारमिनार भागातील भाग्यलक्ष्मी मंदिराबाबत बोलताना प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल ओवैसी यांच्याविरोधात निर्मल हैदराबादखेरीज राज्यात अन्य ठिकाणीही गुन्हे नोंदविले आहेत. भारतात मुसलमानांना पुरेसे संरक्षण नाही इथपासून त्यांचे जीवित व मालमत्ता येथे सुरक्षित नाही एवढे बोलूनच तो थांबला नाही तर भारत आणि आंध्रचे सरकार मुसलमान समाजाच्या सुरक्षेकडे व हिताकडे लक्ष देत नाही असेही तो म्हणाला आहे. ही व्यवस्था बदलण्याची व त्यासाठी पडेल तो संघर्ष करण्याची भाषा त्याने वापरली आहे. याच भाषणासाठी त्याच्याविरुद्ध सरकारने पोलिसात तक्रार दाखल करून त्याला अटक केली आहे. अकबरुद्दीनचे पाठिराखे व इत्तेहादूलचे सभासद त्याच्या अटकेविरुद्ध निदर्शने करायला निर्मलमध्ये जमले तेव्हा त्या छोट्याशा व शांत शहराला लष्करी छावणीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे सार्‍यांना दिसले.प्रक्षोभक भाषणविरोधी कायदे

1)
कलम 153 - प्रक्षोभक भाषण करून दंगली भडकवणे
-
वॉरंटशिवाय पोलीस थेट अटक करू शकतात- अजामीनपात्र गुन्हा- 3 वर्षांची शिक्षा किंवा जेल किंवा दोन्हीही - जर असं भाषण धार्मिक स्थळावरून केलं असल्यास 5 वर्षांची शिक्षा
2)
कलम 153 A - प्रक्षोभक भाषण करून दोन धर्मांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे
-
वॉरंटशिवाय पोलीस थेट अटक करू शकतात- अजामीनपात्र गुन्हा- 3 वर्षांची शिक्षा किंवा जेल किंवा दोन्हीही
3)
कलम 153 B - प्रक्षोभक भाषण करून देशाची एकता धोक्यात आणणे
-
वॉरंटशिवाय पोलीस थेट अटक करू शकतात- अजामीनपात्र गुन्हा- 3 वर्षांची शिक्षा किंवा जेल किंवा दोन्हीही एमआयएम चा ईतिहासमजलिश--इत्तेहादूल मुसलमीन (एमआयएम) ही १९२७ मध्ये जुन्या हैदराबाद संस्थानात स्थापन झालेली भारतविरोधी संघटना आहे. तिचा संस्थापक पुढारी बहादूर यारजंग हा कमालीचा भारतद्वेष्टा आणि हैदराबाद संस्थानच्या भारतातील विलिनीकरणाचा कडवा विरोधक होता. आपल्या संघटनेची तशी घटना, ध्वज व भूमिका जाहीर करून त्याने तेव्हाच्या मुस्लीम लीगशी संबंध जोडले होते. तेवढय़ावर न थांबता कासीम रिझवीच्या नेतृत्वात दीड लाख रझाकारांची सशस्त्र संघटना स्थापन करून तिच्यामार्फत हैदराबाद संस्थानातील जनतेला धमकावण्यात व धाकात ठेवण्यातही त्याचा पुढाकार होता. १५ सप्टेंबर १९४८ या दिवशी भारताने निजामाविरुद्ध पोलीस कारवाई केली आणि त्याचे संस्थान १७ सप्टेंबर या दिवशी भारतात विलीन केले. त्याच दिवशी इत्तेहादूल मुसलमीन या संस्थेवर भारत सरकारने बंदी घातली. ती १९५७ मध्ये उठविण्यात आली. कासीम रिझवीच्या कारावासाचा काळही हाच होता. आपल्या सुटकेनंतर तो पाकिस्तानच्या आश्रयाला गेला व तेथेच मृत्यूही पावला. इत्तेहादूलचा मूळ इतिहास येथे संपला असला तरी तिची पाळेमुळे जिवंतच राहिली. १९७४ मध्ये तिच्या उर्वरित अंशांना एकत्र करून आपल्या नियंत्रणात आणण्याचे काम सुलतान सलाऊद्दीन औवेसीने केले. औवेसीने इत्तेहादूलच्या जुन्या भूमिका पुनरुज्जीवित करण्याचे आणि इस्लामी राजवटीच्या प्रस्थापनेचे राजकारण आखले. त्यातले अपयश त्याला दिसत असतानाही त्याची व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा व सत्ताकारणाची उबळ यातून त्याने ते राबविले.

1956
साली हैदराबादमध्ये एमआयएमची पुनरस्थापना
1956 साली हैदराबादमध्ये एमआयएमची स्थापना झाली. अकबरुद्दीन ओवेसी आणि त्यांचा भाऊ असादुद्दीन ओवेसी यांचा जुन्या हैदराबादमध्ये मोठा दबदबा आहे. नेहमी वाद निर्माण करण्यात या दोघा भावांचा हातखंडा आहे. आंध्रप्रदेशात त्यांचा एमआयएम हा पक्ष लहान असला तरी, त्याचा प्रभाव मात्र मोठा आहे. ओवेसी बंधूंची जुन्या हैदबादमध्ये सत्ता चालते. इथल्या लोकांमध्ये त्यांच्याबद्दल दहशत आहे. आणि त्यांना विरोध करण्याची हिंमतही कोणी दाखवत नाही. त्यांचा पक्ष मजलिस- इत्तहदुल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएमचा हैदराबादमध्ये दबदबा आहे. मोठा भाऊ असादुद्दीन ओवेसी हे हैदराबादमधून खासदार आहेत. तर लहान भाऊ अकबरुद्दीन ओवेसी आमदार आहेत. हे दोघेही उच्चशिक्षित आहेत. पण स्थानिक घाणेरडं राजकरण करण्यात माहीर आहेत. चुकीच्या कारणांसाठीच नेहमी त्यांची चर्चा होते. पण त्यांची आंध्रप्रदेशातल्या मुस्लीम समाजावर मात्र पकड तितकीशी पकड नाही. तरी पण ते नेहमी सरकारला त्यांच्या कृत्यांकडे डोळेझाक करायला भाग पाडतात.अनिष्ट व देशविरोधी प्रवृत्ती अकबरुद्दीन, त्याचा थोरला भाऊ असदुद्दीन आणि त्यांची इत्तेहादूल ही संघटना ही राजकारणातील एक अनिष्ट व देशविरोधी प्रवृत्ती आहे. तिच्या मागे १९२७ पासूनचा प्रदीर्घ इतिहास आहे. इत्तेहादूलसारख्या संघटनांपासून स्वत:ला दूर ठेवणारा व देशाच्या एकूण भवितव्याशी आपले भविष्य जोडून घेणारा मोठा वर्ग मुस्लीम समाजात पूर्वी होता आणि आजही आहे. असदुद्दीन, अकबरुद्दीन किंवा त्यांची इत्तेहादूल ही संघटना या समाजाची दिशाभूल करण्याचा, त्याला देशाच्या मुख्य प्रवाहापासून दूर नेण्याचा आणि जमेल तेथे त्यांच्यात संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करणार्‍यांमध्ये आहेत. या प्रयत्नांचा कायदेशीर व कठोर बंदोबस्त करीत असतानाच त्यांच्या प्रचार यंत्रणांनाही प्रभावीपणे तोंड देणे गरजेचे आहे.जातीय तणाव, तेढ निर्माण करण्याबरोबर हा देशही धुळीला मिळवू, देशातील बहुसंख्याकांना १५ मिनिटात छाटून टाकू, अजमल कसाबसारख्यामुलाला फाशी द्यायला नको होती, त्याचबरोबर मी फक्त मुस्लिमांचाच प्रतिनिधी आहे, अशी प्रक्षोभक विधाने करत भारतीय राज्यघटना, देशातील लोकशाही आणि संपूर्ण देशाच्या मानसन्मालाच पायदळी तुडवण्याची कामएमआयएमचा आमदार अकबरुद्दीन ओवेसी याने वारंवार केले आहे. २००९ मध्ये आमदार म्हणून निवडून आलेल्या अकबरुद्दीनने त्याच्या पक्षाला साजेशा विचारधारेनुसारच जाहीर भाषणातही देशाविरोधात विखारी भाषणांची मालिका सुरू ठेवली. देश स्वातंत्र्याच्या उंबरठयावर उभा असताना बॅरिस्टर जीनांनीही हिंदू-मुस्लीम तेढीबरोबर देशाचे तुकडे करण्याचे, वक्तव्ये जाहीर भाषणातून केली होती व देशाची फ़ाळ्णी केलि होति. ‘मजलिस--इत्तेहाद-अल-मुसलमीन (एमआयएम) या हैदराबादस्थित जहाल विचारसरणीच्या मुस्लीम पक्षाचा आमदार अकबरुद्दीन ओवेसी याला बॅरिस्टर जीनांच्या पावलावर पाऊल ठेवण्याची घाई झालेली दिसते.

No comments:

Post a Comment