मुंबई विद्यापीठ देशद्रोही आहे का?
सुहास फडकेजून २०१२ मध्ये, मानवी हक्कविषयक अभ्यासक्रमात बदल झाले. त्यानुसार, मानवी हक्कविषयक पाठयपुस्तकात हे विधान केले आहे. पाठयपुस्तकात असलेली आणखी काही विधानेही आक्षेपार्ह आणि सरकारविरोधी आहेत.
ती पुढीलप्रमाणे...
भारतात अल्पसंख्याकांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होते आहे. आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. तेथे मुस्लिम तरुणांना बाँम्बस्फोटाच्या प्रकरणात अडकवले जाण्याचे प्रमाण वाढले होते. परंतु, बेकायदा कोठडीत डांबण्याची प्रकरणे उघडकीस येऊ लागल्याव त्यांना इतर प्रकरणांत अडकवले जाते. तेथे मग पुराव्याअभावी त्यांची निर्दोष सुटका होते.
महाराष्ट्रातही काँग्रेसचे सरकार असून तेथे हीच स्थिती आहे. यो दोन्ही राज्यांत कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती चिघळत चालली आहे. मुसलमान युवकांना एन्काऊंटरमध्ये पोलीस ठार मारतात. ह्या पध्दतीने शेकडो तरुणांचा बळी पोलिसांनी घेतला आहे.
ओरिसा आणि भाजपाचे सरकार असलेल्या कर्नाटकात ख्रिश्चनांचे जिणे कठीण बनले आहे. कर्नाटकात आता मुस्लिमांना लक्ष्य केले जाते आहे.
……………
फाऊंडेशन कोर्सच्या ह्या अभ्यासक्रमात शंभर गुणांच्या परीक्षेसाठी हे पुस्तक लावण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी ते मन लावून वाचतान आणि साहजिकच त्यांच्या मनावर याच बाबी बिंबतात.
या पुस्तकातील विधानांमुळे विद्यापीठ भारत सरकारविरुध्द आहे असे मला का वाटले या प्रश्नाचे उत्तर वाचकांना देणे आवश्यक आहे.
गेली सुमारे तीन दशके, युरोपिय देश आणि अमेरिका येथे भारतात अल्पसंख्याकांचा छळ होतो आहे अशी प्रतिमा निर्माण केली जात आहे. यात भारतातील संघटना आणि बु्ध्दिवादी ह्यांचा समावेश आहे. त्या देशांत वास्तव्य करणा-या काही भारतायांनीही यात भर घातली आहे.
याचा फायदा उठवत तेथील सरकारांनी भारताला याबाबत जाब विचारावा अशी मागणी तेथील राजकीय नेते आणि इतर काही जण करीत असतात. काही जण तर, भारताची आर्थिक मदत बंद करावी अशी मागणीही करतात.
आपल्या मागणीच्या समर्थनार्थ ते असा काही मजकुर शोधतच असतात. आता तर, सरकारी मदत असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या पाठयपुसतकात अशी विधाने असतील तर त्यांचा फायदा तेथील मंडळी उठवणारच.
ह्या पाठयपुस्तकाचे लेखक, मायकेल वाझ ह्यांनी पुस्तकात,आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ कधी नाव न ऐकलेल्या मानवी हक्क चळवळीच्या कार्यकर्त्याचा दाखला दिला आहे. कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. आता वाझ म्हणतात की, 'मला काही आठवत नाही मी काय लिहिले आहे ते. आपण पुन्हा एकदा पुस्तक वाचून बघू.'
वाझ यांचीच पूर्वपिठीका आता तपासण्याची गरज आहे. एखाद्या शक्तीच्या हातातले ते बाहुले ते बनले आहेत का असा प्रश्न पडतो. हे पुस्तक मंजुर करताना संबंधितांनी नेमक्या कोणत्या गुणांच्या आधारे निर्णय घेतला हेही त्यांना विचारण्याची गरज आहे
No comments:
Post a Comment