SA
|
सामना अग्रलेख
कायदा व नियम फक्त हिंदूंसाठी, मराठी माणसांसाठी आहेत. त्यांना वाचवायला ना भाऊ, ना काका, ना मायबाप सरकार. मात्र मुसलमानांच्या बाबतीत ‘रफीकचा भाऊ हकीम’ आहे.
रफीकचा भाऊ हकीम!इन्स्पेक्टर सुजाता पाटील यांच्यामागे महाराष्ट्र उभा राहणार की नाही, हा प्रश्न आमच्या मनात आहे. लढणार्यांच्या मागे महाराष्ट्र उभा राहतो व त्यांच्या लढ्यात सामील होतो ही परंपरा आहे. त्यामुळे वसंत ढोबळे असोत की सुजाता पाटील, लढणार्यांच्या मागे बळ उभे करावेच लागेल. हेच जिवंत मनाचे व मनगटांचे काम आहे. सुजाता पाटील यांच्याबाबत सविस्तर भूमिका काल याच स्तंभात आम्ही मांडली आहे, पण आझाद मैदान दंगलीमागचे कवित्व वेगळेच काही सांगत आहे. सुजाता पाटील यांनी दंगलखोरांना दंगलखोर म्हटलं, देशद्रोह्यांना देशद्रोही म्हटलं, पण या कारणांपेक्षाही कॉंग्रेसचे एक पुढारी व अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मुनाफ हकीम यांच्या बंधुराजांवर कारवाई केल्याचा राग म्हणून सुजाता पाटील यांच्यावर कवितेचे बालंट टाकले गेले आहे. शीव जंक्शनला हकीम यांचा भाऊ रफीक याने वाहतुकीचे नियम मोडले. सुजाता पाटील यांनी त्यास रोखले, दंड वसूल केला, समज दिली. यावर ‘तुम्ही माझ्या भावास ओळखत नाही. थांबा, तुम्हाला धडा शिकवतो!’ अशी धमकी या बंधुराजांनी दिली व ‘संवाद’ पाक्षिकातील कवितेचे निमित्त करून फौजदार सुजाता पाटलांविरोधात तक्रार दाखल केली. ‘माझी कविता कोणत्याच जाती-धर्म-पंथाविरुद्ध नाही. ती आझाद मैदान दंगल या घटनेवर आहे. मी फक्त दोनच जाती मानते. एक देशभक्त आणि दुसरी देशद्रोही!’ अशी भूमिका या महिला पोलीस फौजदाराने मांडली आहे. देशद्रोह्यांना धर्म नसतो. बलात्कार्यांना जात, धर्म नसतो हे आम्हीही नेहमीच म्हणतो, पण आता यानिमित्ताने देशद्रोह्यांनी आपली ‘जात’ स्वत:च उघड केली आहे. या देशातील धर्मांध मुसलमान हा हिंदुस्थानची घटना मानत नाही, समान नागरी कायदा मानत नाही. कुटुंब नियोजनासारख्या कल्पनांवर त्यांचा विश्वास नाही, वंदे मातरम्ला त्यांचा विरोध आहे, पण आता वाहतुकीचे नियम व कायदेही त्यांना पाळायचे नाहीत. म्हणजे प्रत्येक कायदा हा जणू पायदळी तुडवण्यासाठीच आहे अशी भूमिका ही मंडळी घेत आहे. रफीकने बेफाम पद्धतीने स्कूटर चालवली, स्कूटरला नंबरप्लेट व डोक्यावर हेल्मेट नव्हते याबद्दल वाहतूक पोलिसांनी हटकताच ‘माझा भाऊ कोण आहे हे माहीत नाही काय?’ असा उटपटांग प्रश्न वर पोलिसांनाच विचारण्याची हिंमत मुळात होतेच कशी? त्या रफीकचा भाऊ कोण हे आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगावे. रफीक तुमचा कोण लागतो याचा खुलासा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी करावा. या मुनाफ व हकीम यांनी मिळून जी ‘बांग’ दिली आहे त्यामुळे कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या कमरेवरील हिरव्या लुंगीचे पुरते वस्त्रहरण झाले आहे. या बांगेने मुंबई पोलिसांच्या सत्यपालांचेही जणू धर्मांतर व नामांतर झाले आणि ते असत्यपाल बनले. फौजदार सुजाता पाटलांच्या कवितेने प्रखर राष्ट्रभक्तांना जाग आणली हे मात्र खरे. आझाद मैदानावर पोलिसांच्या डोळ्यांदेखत धर्मांध दंगलखोर का उतले व मातले याचे उत्तर आज मिळाले. दंगलखोरांच्या भावना न्याय व कायद्याच्या रखवालदारांना महत्त्वाच्या वाटतात. देशद्रोह्यांचे मन हे फुलांच्या पाकळीसारखे कोमल असते, त्यावर चरोटा मारू नये हाच धडा सुजाता पाटलांना मिळाला. मुख्य म्हणजे कायदा व नियम फक्त हिंदूंसाठी, मराठी माणसांसाठी आहेत. त्यांना वाचवायला ना भाऊ, ना काका, ना मायबाप सरकार. मात्र मुसलमानांच्या बाबतीत ‘रफीकचा भाऊ हकीम’ आहे. तेव्हा वाहतूक पोलिसांचा आडवा हात खाली खेचून रफीकने सरळ पुढे जावे. वाचवायला हकीम आहेच

No comments:
Post a Comment