Total Pageviews

Saturday, 2 April 2011

अंतिम सामन्यावर 40 हजार कोटींचा सट्टा

अंतिम सामन्यावर 40 हजार कोटींचा सट्टा विश्‍वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी मुंबईत सुरक्षा यंत्रणांनी "फिल्डिंग' लावली असतानाच बुकींनीही उद्याच्या सामन्यासाठी अधिकाधिक नफा कमविण्यासाठी रणनीती आखली आहे. या सामन्यासाठी 40 हजार कोटींचा सट्टा लागला असून सट्टेबाजांनी भारताला झुकते माप दिले आहे.
भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये अपेक्षेप्रमाणे भारत जिंकल्यामुळे सट्टा घेणाऱ्या बुकींना मोठा तोटा सहन करावा लागला होता. त्या सामन्यातील तोटा भारत-श्रीलंकेच्या सामन्यात भरून काढण्यासाठी बुकी उद्याच्या सामन्यासाठी "सेफ' गेम खेळत आहेत. भारत लंकादहन करणार असा सट्टेबाजांचा होरा असून भारताला 0.47 पैशांचा भाव देण्यात आला असून श्रीलंकेला 1.37 रुपयांचा भाव देण्यात आला आहे. या सामन्यासाठी संपूर्ण मुंबईत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आल्यामुळे बुकींनी अहमदाबाद, गोवा येथे आश्रय घेतला असून त्यांचा मुख्य कारभार दक्षिण आफ्रिकेतून चालत असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.
अंतिम सामन्यात सचिन आपले शंभरावे शतक झळकावेल यासाठीही मोठ्या प्रमाणात सट्टा लागला असून त्याला 5 रुपयांचा भाव देण्यात आला आहे. याशिवाय गंभीरच्या शतकाला सहा रुपये, युवराजच्या 6.25, सेहवागच्या 5.50 रुपयांचा भाव देण्यात आला आहे. याशिवाय या सामन्यात सचिनच्या अर्धशतकाला 90 पैसे, गंभीरच्या 1.10 रुपये, युवराजच्या 1.25; तर सेहवागच्या अर्धशतकासाठी 1.05 रुपयांचा भाव देण्यात आला आहे. याशिवाय अंतिम सामन्यात एखादा खेळाडू तरी शतक झळकावेल त्याला 0.80 पैशांचा भाव देण्यात आला आहे. तसेच प्रथम फलंदाजीसाठीही कोट्यवधी रुपये लागले असून त्यात भारताला 1.25 रुपये; तर श्रीलंका प्रथम फलंदाजी करील यासाठी 3.45 रुपयांचा भाव देण्यात आला आहे. प्रतिक्रिया भारतीय संघ सट्टेबाजांच्या मोहात पडता आपली खरी खेळी दाखवत आहे. पण पैशांचा मोह करू नका आणि शेवट चांगला करा आणि world कप जरूर आणा....... किव येते अशा बातमी ची. हि बातमी देण्याची गरज नसावी. अश्या बातमी ने लोक जास्ती सत्ता लावायला लागतील. राव सट्टा बेकायदा आहे. तुमच्या पत्रकारांना प्रत्येक खेळाच्या वेळी "विश्‍वसनीय सूत्र" खबर देतात. तेल माफियांना मध्ये खराब दिवस आले होये म्हणे ... कुठले तेरड्याचा रंग दिवस. वाळू माफियांचे असे-भाराष्टच्र्यांचे तसे-.. अत्युत्तम पत्रकारीते साठी माझ्या तर्फे तुम्हाला पुलित्झर (देशी पारितोषिक देवून उगाच कमीपणा नको, माय मराठी सोडून तुम्ही My Marathi आणि पुणे today वर उतरलेले) झोपलेल्या देशाला जागे करण्याची ताकद तुमच्या लेखणीत आहे हे दाखवून द्या. सट्ट्या चा बाजारभाव रोखे वा गुलटेकडी सारखा काय छापता? बेटिंग बेकायदेशीर असून तुम्ही त्यांची जाहिरात का करता? तुम्हाला त्यांचे दर कसे ठाऊक? पोलिसांनी सकाळवर कारवाई करावी.. हे वाचून कोबड्यांची झुंज आठवली. पण क्रिकेटर पेक्ष्या कोंबड्या चांगल्या कारण कोंबड्यांना तान्च्यावर लावलेल्या पैश्यांची माहिती नसल्याने त्या प्रामाणिक पणे लढतात. पण काहे अपवाद वागालता हे ११ + राखीव कोंबडे मात्र बे भरवश्याचे. चला एक चांगले आहे की भारतीय संघ सट्टेबाजांच्या मोहात पडता आपली खरी खेळी दाखवत आहे. नाहीतर पाकिस्तान बरोबर हरून त्यांना भरपूर पैसे कमवता आले असते.
सट्टाबाजारातही भारत श्रीलंका फायनची उत्सुकता आयसीसी वर्ल्डकप सुरू झाल्यापासून सट्टाबाजारातील बुकींची पसंती भारताच्या बाजूने आहे. त्यांनी अगदी पहिल्या मॅचपासूनच भारताची बोली ही समोरच्या टीमपेक्षा पन्नास किंवा त्यापेक्षा कमी लावली होती. पाकिस्तानविरुद्धच्या सेमीफायनलला तर भारतावर शेवटी 35 पैसे भाव होता. आता फायनलसाठी भारत फेव्हरेट असल्याने 57 पैसे भाव लावला आहे. सट्टे बाजारातील तेजीचा फायदा घेत अनेक नवीन क्‍लायंट सट्टेबाजारात दाखल झाले आहेत. दोनशे ते अडीचशे कोटींचा सट्टा औरंगाबादेत लागल्याचे बुकींनी सांगितले. सट्टाबाजारात फायनल मॅचची उत्सुकता वाढली आहे. पण त्याचबरोबर पाकिस्तानच्या मॅचवर लागलेल्या सट्ट्याची वसुलीही सुरू आहे. अनेकांनी पाकिस्तान जिंकणार म्हणून पैसा लावला होता. त्यांच्याकडे असणारी बाकी बुकींचे एजंट वसूल करू शकले नसल्याने अनेक क्‍लायंटचे अकाउंट बुकींनी सील करून टाकले आहे. त्यामुळे ज्यांचे अकाउंट सील झाले आहे, अशांना आता फायनल मॅचवर सट्टा लावता येणार नाही. त्यांची गोची झाली आहे. तरीही ज्यांचे अकाउंट सुरू आहे, त्यांच्याशी बोलून काहीजण सट्टा लावण्याच्या प्रयत्नात आहे. हेही बुकींना माहीत असल्याने त्यांनी जुन्या अकाउंटधारकांना अकाउंट सील केलेल्या क्‍लायंटच्या सांगण्यावर पैसे लावण्यास मज्जाव केला आहे. नवीन क्‍लायंटला फायनलसाठी पैसे लावताना दहा हजारांऐवजी रक्कम वाढविण्यात आली आहे. ती नेमकी रक्कम किती आहे? हे मात्र बुकींनी किंवा त्याच्या एजंटांनी कळू दिलेले नाही. या मॅचकरिता सट्टा बाजारात शुक्रवारी (ता. एक) दुपारनंतर "भाव' जाहीर झाले.
भारत श्रीलंका सट्टा मार्केट अंतिम सामन्याचे "भाव'भारत फेव्हरेट.1 रुपयाला 57-59 पैसे, फर्स्ट इंनिंगच्या नंतर भावात बदल. 1 रुपयाला 37-39 पैसे.
*
ओपनिंग पार्टनरशिप भारत 80-90 बनवणार का? 1 रुपयाला 80 पैसे भाव.
*
पहिल्या 15 ओव्हरमध्ये भारत 65-75 रन बनवणार का? 1 रुपयाला 65 पैसे भाव.
*
सामन्यादरम्यान कोणता संघ सर्वात जास्त सिक्‍स मारणार? भारतावर 90 पैसे तर श्रीलंकेवर 1.75 पैसे भाव
*
कोणता संघ सर्वात जास्त वाईड बॉल टाकणार? श्रीलंकेवर 80-90 पैशांचा भाव.
*
सचिनचे अर्धशतक होऊ शकते का? 1.50 ते 2.00 रुपये भाव
*
सामना अनिर्णीत राहू शकतो का? यावर सर्वात जास्त भाव लावण्यात आला असून 1 रुपयाला 7 रुपये
*
भारत 272-276 आणि श्रीलंका 252-256 धावांपर्यंत मजल मारतील का यावरही सट्टा लावण्यात आला आहे?हमारी पहिली पसंती इंडिया केही टीम को थी. इसलिये भाव भी उसी तरह से लगाये गये. फायनल तक इंडिया आनेवाला है, ये हमको पहिलेसेही मालूम था. उस हिसाबसे हमारे भाव निकले. पाकिस्तान के सामने इंडिया सेमी फायनल में आएगी ये भी हमनें बताया था. अब इंडिया कप जितेगा येभी हमको मालुम है. उसके हिसाब से टॉस इंडिया जितेगा और पहिले बॉलिंग करेगा. लंकाकी टिम दो सौ पचास से दो सौ साठ करेगा. इंडिया की टीम 45 या 47 ओव्हर में यह टार्गेट पुरा करेगा. उसके पाच या छह विकेट जायेंगे, एैसा हमारा अंदाज है. उस हिसाब से लंकाकी टीम पहले पंदराह ओव्हरतक अच्छी खेलेगी. उसके बाद इंडिया की बारी होगी.''
बुकींची सुरवातीपासून भारतालाच पसंती
दोनशे ते अडीचशे कोटींचा सट्टा लागणार
फायनलमध्ये भारत असल्याने बुकी सक्रिय
अनेक नवीन क्‍लायंट बाजारात
टॉसपासून ते शेवटच्या बॉल किंवा विकेटपर्यंतचा सट्टा बुकींचे लक्ष वसुलीकडे
पाकिस्तानच्या मॅचवरची वसुली जोरात
बुकींचे फोन बंद झाल्याने सट्टाबाजारात खळबळ! भारत - पाकिस्तान मॅचवर बुधवारी मोठ्या प्रमाणात सट्टेबाजांनी सट्टा लावला होता. मात्र, सामना सुरू झाल्यावर पहिल्या तीन ओव्हरनंतरच अचानक सट्टाबाजारामधील बुकींनी फक्त मॅचच्या निकालावरच (मॅच विनिंग) सट्टा घेणार असल्याचे घोषित केले. यामुळे सट्टा बाजारात मोठी खळबळ माजली होती. रात्री उशिरापर्यंत बुकींनी घेतलेल्या या निर्णयाचे कारण समजू शकले नव्हते.
विश्‍वकरंडक उपांत्य फेरीत समोरासमोर आलेल्या भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान शहरात मोठ्या प्रमाणावर सट्टेबाजांनी सट्टा लावून मोठी रक्कम गुंतविली होती. सट्टेबाजारात यानिमित्ताने मोठी उलाढाल होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. मॅचदरम्यान सुरवातीला भारत फेव्हरेट ठरला होता. एक रुपयाला 62.64 पैसे भाव सट्टे बाजारात निश्‍चितही करण्यात आला होता. मात्र, सामना सुरू झाल्यानंतर सुरवातीच्या पाच ओव्हरच्या आतच सट्टेबाजांना बुकींकडून संदेश आले. यामध्ये सट्टेबाजारात फक्‍त भारतीय संघ हरणार किंवा जिंकणार यावरच सट्टा लागणार असल्याचे सांगत मार्केट कधीही बंद होऊ शकते, तसेच भाव घेणेसुद्धा बंद करण्यात आल्याचा उल्लेख होता. त्याचप्रमाणे 15 ओव्हरपर्यंत ज्यांना सौदा करायचा त्यांनी करून घ्यावा; नंतर सौदा घेण्यात येणार नाही, असेही स्पष्ट सांगण्यात आले होते. सामन्याच्या 15 ओव्हरनंतर खरोखरच सट्टा बाजारमधील बुकींचे फोन बंद झाले होते. भारताची फलंदाजी पाहून आणि पाकिस्तानचे पारडे जड होत असल्याचे बघताच अनेकांनी भाव पलटवता येतील का, याची विचारणा केली. मात्र, बुकींकडून नकार कळवण्यात आला. पाकिस्तानची फलंदाजी सुरू झाल्यांनतर काही काळ बुकींचे फोन पुन्हा सुरू झाले होते. पाकिस्तानच्या बॅटिंगच्या पहिल्या सेशनचा भाव घेऊन पुन्हा बुकींचे फोन बंद झाले होते.

"
सट्टेबाजारातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सट्टेबाजारातील वरच्या सूत्रांनी दिलेल्या आदेशानुसार शहरातील बुकींनी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यामुळे शहरातील सट्टा लावणाऱ्या सट्टेबाजांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण पसरले होते
वरून' आदेश आल्यामुळे
-
एक बुकी

*

""


On 02/04/2011 01:04 AM Manas Shindey said:
On 02/04/2011 01:34 AM Neelesh said:
On 02/04/2011 03:14 AM Jaykumar Nimbalkar said:
On 02/04/2011 07:04 AM Aryabhat Aakdewar said:
On 02/04/2011 08:11 AM Manish said:
On 02/04/2011 09:01 AM anil nemade said:

No comments:

Post a Comment