Total Pageviews

Saturday, 2 April 2011

देशातील राज्यकर्ते व क्रिकेटपटूंचीच जान तेवढी महत्त्वाची व इतरांचें जीव म्हणजे पालापाचोळा

देशातील राज्यकर्ते क्रिकेटपटूंचीच जान तेवढी महत्त्वाची इतरांचें जीव म्हणजे पालापाचोळा
मोहालीत भारत-पाकिस्तान सामन्याच्या वेळीही जी काही अभेद्य सुरक्षा व्यवस्था ठेवली होती तसा ,चोख बंदोबस्त इतरवेळी कोठे जातो?
क्रिकेटचा विश्‍वचषक म्हणजे जणू उत्साहाला उधाणच आलेले आहे. ठीक आहे. खेळाची आवड लोकांना असू शकते, पण त्याचा इतका अतिरेक म्हणजे कमालच आहे. ‘अतिरेकी’पणा म्हणजे काय या शब्दाचा अर्थ या सर्व प्रकारातून समोर आला. क्रिकेटला युद्धभूमीचे स्वरूप आले आहे मोहाली काय किंवा आता मुंबईचे वानखेडे काय, ‘क्रिकेटपटूं’साठी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे . बाप रे बाप! काय हा बंदोबस्त! मोहालीत भारत-पाकिस्तान सामन्याच्या वेळीही जी काही अभेद्य सुरक्षा व्यवस्था ठेवली होती तसा चोख बंदोबस्त इतरवेळी कोठे जातो? मोहालीतील सामन्यावर हल्ला करून तो उधळून लावण्याची धमकीतोयबा’पासूनअल कायदा’पर्यंत सगळ्यांनीच दिली होती. आता जबाबदारी मुंबई पोलिसांवर आल्याने त्यांनीही प्रचंड मेहनत घेतल्याचे दिसत आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी वानखेडे आसपासच्या परिसराची पाहणी करून अतिरेकी वगैरे मंडळींना इशारे दिले. त्यामुळे वानखेडेच्या आसपास फिरकण्याची हिंमत कुणी करील असे वाटत नाही. क्रिकेटचा फायदा काय असे विचारणार्‍यांनी या बदलाची दखल घेतलीच पाहिजे. गेट वेवरील ताज हॉटेलात क्रिकेटपटू उतरले आहेत. त्यामुळे ताज आसपासचा सर्व परिसर रिकामा केला गेला आहे. पर्यटकांवर बंदी घातली. समुद्रातल्या बोटी बंद करून लांब नेल्या. ताजच्या परिसरात कुणीही फिरकू शकत नाही. वानखेडे ताज परिसराची लष्करी छावणीच झाली आहे. वानखेडेचा परिसरनो फ्लाइंग झोन’ घोषित केला. मुंबई पोलीस दलाबरोबरच एन. एस. जी., फोर्स वन, शीघ्र कृती दल, एसआरपी रॅपिड ऍक्शन दलाने ठिकठिकाणी पोझिशन घेतल्या आहेत. १८० सीसी टीव्ही कॅमेरे बसवून संशयितांवर नजर ठेवली जाणार आहे. पण हा जो बंदोबस्त क्रिकेटच्या निमित्ताने दिसणार आहे तो क्रिकेटची जत्रा संपल्यावर दूर होणार जनता पुन्हा राम भरोसे राहणार. या देशातील राज्यकर्ते क्रिकेटपटूंचीच जान तेवढी महत्त्वाची इतरांचें जीव म्हणजे पालापाचोळा असे आता वाटू लागले आहे. पोलिसांच्या या बंदोबस्तालाही वर्ल्ड कप पुरस्कार द्यावाच लागेल.
क्रिकेटचे वेड केवळ एका वर्गापुरते मर्यादित नाही
 देशात १९ फेब्रुवारीपासून सुरू झालेली विश्वचषक क्रिकेटची रणधुमाळी आज संपेल. हा सामना पाहणे (किमान टीव्हीवर) सर्वाना शक्य व्हावे म्हणून मुंबईतल्या अनेक कंपन्यांनी अध्र्या दिवसाची सुट्टी जाहीर केली. सरकारी कार्यालयेच नव्हे; तर विधिमंडळालाही अध्र्या दिवसाची सुट्टी दिली गेली होती. त्या दिवशी कोणत्याही राजकीय पक्षाने बंदचे आवाहन केलेले नव्हते किंवा काही अघटितही घडले नव्हते तरी मुंबईतले सारे रस्ते निर्मनुष्य झाले. नेहमी ओसंडून वाहणाऱ्या बसेस आणि लोकलगाडय़ा रिकाम्या धावत होत्या. घराघरात, चौकाचौकात, गल्लीबोळात आणि मुख्य रस्त्यांवर भारत-पाकिस्तान संघांचा सामन्याशिवाय दुसरे काहीच दिसत नव्हते. मुंबईकरच नाही तर देशातले बहुसंख्य नागरिक हा सामना डोळय़ात प्राण आणून बघत होते. भारताने हा सामना जिंकावा अशीच सगळय़ांची इच्छा होती, त्याच बरोबर सचिनचे शतकांचे महाशतकही याच सामन्यात झळाकावे, अशीही त्यांची अपेक्षा होती. क्रिकेटचा ज्वर जसा वाढत गेला तसा देवाचा धावा करण्यालाही वेग आला. नवसाला पावणा-या देवांची आपल्या देशात कमी नाही. अशा सा-या देवी-देवतांना साकडे घालण्याची स्पर्धा सुरू झाली. कोणी नवसाला पावणा-या आणि सर्वसंकटांतून निभावून नेणा-या संकटविमोचकाला पाण्यात बुडवून संकटात टाकले तर कोणी दुर्जनांचा निप्पात करणा-या देवीची खणा-नारळाने ओटी भरत तिचा भार वाढवला. अनेकांनी कोंबडय़ांपासून बक-यांपर्यंत जे जे शक्य होईल त्याचे बळी देण्यास सुरूवात केली. होम-हवनाला तर सीमाच राहिली नाही. त्यातून तयार होणारी ऊर्जा आपल्या खेळाडूंना जिंकण्यासाठी आवश्यक ते बळ मिळवून देईल, या अपेक्षेने वेगवेगळे होमही सुरू झाले. केवळ हिंदूंनीच आपल्या देव-देवतांना असे साकडे घातले असे नाही तर चर्चमध्ये प्रार्थना आणि मशिदींमध्ये नमाजही पढले गेले. जात, धर्म, प्रांत यापैकी कशाचाही भेदभाव मनात धरता सर्व धर्माच्या आणि पंथांच्या क्रिकेटरसिकांनी आपापल्या देवतांना संघाच्या विजयासाठी साकडे घातले. भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग ढोणी याच्या रांची या गावात असलेल्या देवीवर ढोणी कुटुंबीयांची अपार श्रद्धा आहे. ढोणी रांचीला आला की या देवीचे दर्शन घेतल्याशिवाय राहात नाही. विश्वचषकाचे सामने सुरू झाल्यापासून या देवीची रोज महापूजा सुरू आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सचिनला मिळालेली सहा जिवदाने हा या देवीचाच प्रसाद असल्याचे रांचीत मोठय़ा अभिमानाने सांगितले जाते आहे.क्रिकेटवर भारतीयांचे अपरंपार प्रेम आहे. एक वेळ देवदेवतांची सारी नावे क्रिकेटरसिकांना ठाऊक नसतील; मात्र सचिनच्या शतकांची आकडेवारी त्यांना तोंडपाठ असते. क्रिकेटची बॅटही कधी हातात धरलेल्यांच्याही अंगात क्रिकेट संचारते आणि कोण कसा चुकला आणि कोणत्या वेळी कोणी कसे खेळायला हवे होते, असे सल्ले देण्याचीही स्पर्धा सुरू होत असते. विश्वचषकाची प्रतिकृती आपल्या डोक्यावर कोरून किंवा केसांची तशी रचना करून फिरणाऱ्यांना त्यात आपण काही वावगे करतो, असेही वाटत नाही. क्रिकेटचे हे वेड केवळ एका वर्गापुरते मर्यादित आहे असेही नाही. हातावर पोट असणारेही आपापल्या परीने विजयाचा आनंद केवळ अनुभवण्याचाच नाही तर इतरांना वाटण्याचाही प्रयत्न करत असतात. त्यांच्या क्रिकेटवेडाला अशा वेळी उधाणच येते. कोणी हेअरकटिंग सलूनवाला आपल्या संघाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी दोन दिवस दाढी-कटिंग मोफत करून देण्याची घोषणा करतो. तर रस्त्याच्या कोप-यावर साधी चहाची टपरी चालवणारा संघाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी सर्वाना मोफत चहा पाजतो. त्यासाठी त्या दिवसाच्या उत्पन्नावर पाणी सोडायलाही तो तयार होतो.क्रिकेटपटू आणि त्यांच्या चाहत्यांनाही अशा वेळी हुरूप येतो. सामना जिंकून देणा-या किंवा घणाघाती फलंदाजी करणा-या खेळाडूचे मैदानात धावत जाऊन चुंबन घेणा-यांची तसेच अंगावरची वस्त्रे फेडून मैदानाला प्रदक्षिणा घालणा-या महिलांचीही उदाहरणे चवीने दिली जातात. मध्यंतरी क्रिकेट सामन्याचे समालोचन करणा-या मंदिरा बेदी या महिलेला समालोचनातल्या उंचीपेक्षा तिच्या कपडय़ांच्या तोकडेपणानेच अधिक प्रसिद्धी मिळवून दिली. सध्या पूनम पांडे या मॉडेलचे नाव गाजते आहे. आतापर्यंत कोणाला फारशी माहिती नसणारी ही तरुणी या स्पर्धेच्या काळात एकाएकी प्रकाशात आली. भारतीय संघाने ही स्पर्धा जिंकली तर खेळाडूंच्या ड्रेसिंगरूममध्ये जाऊन सर्व खेळाडूंसमोर आपल्या अंगावरील सर्व कपडे उतरवण्याचा तिचा हट्ट आहे.

No comments:

Post a Comment