SPREAD MESSAGE OF INDIAN NATIONAL SECURITY TO AS MANY INDIANS AS POSSIBLE. LET US FREE INDIA OF CORRUPTION BY SPREADING THE MESSAGE TO AS MANY PEOPLE.MANY OF THE ARTICLES HAVE BEEN RECEIVED AS FORWARDED MAIL FROM VARIOUS FRIENDS . SHOULD SOME FACTS BE NOT CORRECT , YOU ARE REQUESTED TO PUT IT IN REMARKS BELOW THE ARTICLE. THIS WILL ENSURE A MORE BALANCED PERSPECTIVE OF THE SUBJECT DISCUSSED.
Total Pageviews
Friday, 17 April 2015
SHRINAGAR PROTESTS-MASARAT ALAM ARREST-देशद्रोही मशरतला अटक
देशद्रोही मशरतला अटक
श्रीनगर, दि. १७ (वृत्तसंस्था) - पाकिस्तानचा ‘चॉंदतारा’फडकवीत पाक झिंदाबादची बांग देणारा देशद्रोही दहशतवादी मशरत आलमला अखेर अटक करण्यात आली आहे. केंद्र सरकारने कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद हे ताळ्यावर आले आणि मशरतला जेरबंद केले. मात्र, फुटीरवादी हुरियत गटाचा नेता सईद अली शाह गिलानीला अद्याप नजरकैदेत घरातच ठेवले आहे. दरम्यान, देशद्रोह्याची अटक आणि लष्कराच्या कारवाईत दोन तरुणांचा झालेला मृत्यू यानंतर श्रीनगरसह अनेक भागांत फुटीरवाद्यांकडून हिंसाचार सुरू आहे. दगडफेकीत पोलिसांसह १४ जण जखमी झाले.
जम्मू-कश्मीरात पीडीपी-भाजप सरकार असले तरी मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद हे फुटीरवाद्यांवर ‘मेहरबान’ असल्याचे चित्र आहे. देशद्रोही मशरत आलमची तुरुंगातून सुटका महागात पडली. गिलानी आणि मशरत या दोघांनी बुधवारी श्रीनगरात रॅली घेऊन देशद्रोही कृत्य केले. पाकिस्तान झिंदाबादची बांग देत चॉंदतारा फडकविला. यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली. मशरतच्या मुसक्या आवळण्याची सर्वत्र मागणी होऊ लागली. केंद्र सरकारने याप्रकरणी गंभीर दखल घेतली. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मशरतवर कठोर कारवाई करा. देशाच्या सुरक्षेत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे आदेश मुख्यमंत्री सईद यांना दिले. त्यानंतर कारवाईची सूत्रे हलली.
रात्री नजरकैद; सकाळी अटक
श्रीनगरप्रमाणेच त्राल येथे देशद्रोही रॅली करण्याचा मशरत आणि गिलानीचा प्रयत्न होता. त्राल येथे लष्करी जवानांच्या कारवाईत दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. या चकमकीविरोधात वातावरण पेटविण्याचा कट मशरतने आखला. मात्र, केंद्र सरकारच्या दबावामुळे मुफ्ती सरकारने त्राल येथील रॅलीला परवानगी नाकारली. रात्री उशिरा मशरत आणि गिलानीला घरातच नजरकैद केले. त्यानंतर सकाळी पोलिसांनी मशरतला अटक केली. मशरतसह गिलानी, बशीर अहमद ऊर्फ पीर सैफुल्लाह यांच्यासह अनेक फुटीरवादी नेत्यांवर दंगल घडविणे, कट रचणे आदी गुन्हे दाखल केले आहेत.
आता मिरवैझ
मशरत आलमला अटक झाल्यानंतर आता मिरवैझ उमर फारूखने काश्मीर खोर्यात वातावरण पेटविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आज त्याने नमाजानंतर चिथावणीखोर भाषण केले. पीडीपी सरकार भाजपच्या दबावापुढे काम करीत असल्याचा आरोप केला. लष्कराला हाटविण्याची मागणी करीत त्राल येथे रॅली काढण्याचा प्रयत्न केला. रॅली रोखल्यानंतर लालचौकासह अनेक भागांत दगडफेक सुरू झाली.
पुन्हा दगडफेक सुरू
शुक्रवारच्या दुपारच्या नमाजानंतर तरुणांचा गट श्रीनगरच्या रस्त्यावर उतरला आणि दगडफेक सुरू केली. मशरत आलमची अटक आणि त्राल येथील लष्कराच्या गोळीबारात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचे पडसाद उमटत आहेत. त्याचप्रमाणे हुरियत नेता मिरवैझ उमर फारूख याने त्राल येथे रॅली काढण्याचा प्रयत्न केला. त्याला रोखल्यानंतरही हिंसाचार उसळला आहे. दगडफेकीत दोन पोलिसांसह १४ जण जखमी झाले. श्रीनगरसह कश्मीर खोर्यात सध्या तणाव असून, लष्कर आणि पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. २०१० प्रमाणे तणाव निर्माण करण्याचा फुटीरवाद्यांचा कट आहे.
गिलानी व मशरत आलम हे सर्व पाकिस्तान पुरस्कृत विषारी नाग आहेत. त्यांचे फणे कायमचे ठेचणे हाच राष्ट्रीय सुरक्षेचा मार्ग आहे. मशरत आलमने श्रीनगरात रॅली घेऊन पाकिस्तानचे झेंडे पुन्हा फडकवले. त्यामुळे केंद्राला हस्तक्षेप करून मशरत आलमला बेड्या ठोकाव्या लागल्या.
मशरतला पुन्हा बेड्या!
मशरत आलमला अखेर अटक झाली आहे. नव्हे, त्याला अटक करावी लागली. मुळात या पाक एजंटास सोडले हीच चूक होती. त्याच्या सुटकेच्या विरोधात इतके काहूर का माजले होते ते मशरत आलमने मागील दोन दिवसांत जे कारनामे केले त्यावरून कळलेच असेल. कश्मीरच्या तुरुंगात मशरत आलमला ठेवले होते. ते काही त्याने ओमर अब्दुल्लांचे पाकीट मारले म्हणून नाही. तो काही सामान्य गुन्हेगार नाही. मशरत आलमने कश्मीरात हिंदुस्थानविरोधी मोहीम चालवली. कश्मिरी तरुणांची डोकी भडकवून त्यांना हिंसाचारास प्रवृत्त केले. मशरत आलम हा पाकिस्तानचा नामचीन एजंट होता व आहेच. पाकिस्तानला जे हवे तेच तो कश्मीरच्या भूमीवर करीत होता. अशा देशद्रोह्याची सुटका करणे हाच मोठा देशद्रोह होता. कश्मीरात भाजप आणि मुफ्ती मोहम्मद सईद यांचा पीडीपी यांचे संयुक्त सरकार आहे. म्हणजे तेथे भाजपचे राष्ट्रवादी विचारांचे सरकार सत्तेवर असताना मशरत आलमसारखे अतिरेकी सुटूच कसे शकतात? हा प्रश्न होता. मशरत आलमला सोडून एक प्रकारे पाकिस्तानच्याच हातात कोलीत देण्याचा प्रयत्न झाला. कारण इकडे मशरत आलमची सुटका होताच तिकडे पाकिस्तानात ‘२६/११’ हल्ल्याचा मास्टरमाईंड लखवी याची सुटका केली गेली. तो लखवीही हिंदुस्थानविरुद्ध गरळ ओकू लागला. हा योगायोग नक्कीच नाही. मशरत आलमने सुटका होताच, ‘छोट्या तुरुंगातून मोठ्या तुरुंगात आलो’ ही भावना व्यक्त केली होती. म्हणजे कश्मीरला स्वातंत्र्य हवे व हिंदुस्थानात राहणे म्हणजे पारतंत्र्यात, म्हणजेच तुरुंगात राहण्यासारखे असल्याचे मत तो व्यक्त करतो. अशा माणसाची सुटका करून जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांना शेवटी काय मिळाले? गिलानी व मशरत आलम हे सर्व पाकिस्तान पुरस्कृत विषारी नाग आहेत. त्यांचे फणे कायमचे ठेचणे हाच राष्ट्रीय सुरक्षेचा मार्ग आहे. मशरत आलमने श्रीनगरात रॅली घेऊन पाकिस्तानचे झेंडे पुन्हा फडकवले. त्यामुळे केंद्राला हस्तक्षेप करून मशरत आलमला बेड्या ठोकाव्या लागल्या. ‘मेरी जान पाकिस्तान’ अशा घोषणा देऊन कश्मीरचा माहोल बिघडविण्याचा हा प्रकार नवे सरकार सत्तेवर येताच वाढला. यामागची कारणे कोणी शोधायची?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment