Total Pageviews

Thursday, 2 April 2015

दहशतवादाच्या लढाईत पाकिस्तानात 80,000 जणांना मृत्यू

जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील हारदूशोरा भागात आज (गुरुवार) सकाळी सुरक्षा रक्षक व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबारात एक पोलिस कर्मचारी हुतात्मा झाला आहे. तर, एक लष्करी जवान व नागरिक जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हारदूशोरा भागातील एका घरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा रक्षक व पोलिस पथकाने संयुक्तरित्या शोधमोहिम राबविली. शोधमोहिमदरम्यान दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक पोलिस कर्मचारी हुतात्मा झाला. तर, एक जवान व नागरिक जखमी झाला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जवानांनी परिसराला घेराव घातला असून, दोन्ही बाजूकडून गोळीबार सुरू आहे. दोन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली आहे. लष्कराच्या ताफ्यावर हल्ला; 3 जवान हुतात्मा - - वृत्तसंस्था गुरुवार, 2 एप्रिल 2015 - 07:16 PM IST अरुणाचल प्रदेशमध्ये लष्कराच्या एका ताफ्यावर संशयित नागा दहशतवाद्यांनी आज (गुरुवार) अचानक हल्ला केल्याने तीन जवान हुतात्मा झाले तर तीन जवान जखमी झाले आहेत. लष्कराच्या प्रवक्‍त्याने याबाबत माहिती दिली आहे. चार वाहनांसह लष्कराचा एक ताफा लष्कराच्या आसाममधील तळापासून दिंजनहून अरुणाचल प्रदेशकडे चालला होता. दरम्यान ताफा खोंसाजवळील तोपी येथे पोचल्यावर अचानक हल्ला करण्यात आला. हा हल्ला नागा दहशतवाद्यांनी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दहशतवाद्यांनी बेछूटपणे गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये तीन जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले. तर तीन जवान जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती प्रवक्‍त्याने दिली. दहशतवादाच्या लढाईत पाकिस्तानात 80,000 जणांना मृत्यू एका नवीन अहवालानुसार 48,000 नागरिकांसह 80,000 पाकिस्तानी अमेरिकेच्या पुढाकाराने सुरु असलेल्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईत मारले गेले आहेत. बॉडी काउंट कॅज्युलिटी फिगर्स आफ्टर टेन इयर्स ऑफ द वॉर ऑन टेरर’ या नावाचे नोबल पुरस्कार विजेते, आंतरराष्ट्रीय सामाजिक बांधिलकी आणि जगाचे संवर्धन करणार्या संस्थेचे हे अहवाल आहेत. या अहवालात 2004 पासून 2013 पर्यंत एकूण 81,325 जण मारले गेल्याचे मारले आहेत. त्यात 48,504 सामान्य नागरिक, 45 पत्रकार यांचा समावेश आहे. 416 सैनिक आणि 951 नागरिक ड्रोनच्या हल्ल्यात मृत्यू पावले आहेत. 26,862 अतिरेकी ठार झाले आहेत आणि 5,498 सुरक्षा कर्मचारी मृत्यू पावले आहेत असे या अहवालात म्हटले आहे. इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या तीन देशांत अमेरिकेने केलेल्या कारवाईत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष 1.3 दशलक्ष लोकांना प्रभावित केले आहे असे यात म्हटले आहे. अफगाणिस्तान आणि इराक येथे दोन लाख 20 हजार लोक युद्धात मेले आहेत आणि हे केवळ अंदाज आहेत असे या अहवालात म्हटले आहे. प्रत्यक्षात ही आकडेवारी दोन दशलक्षपेक्षा जास्त असू शकते. पाकिस्तान सरकारने अधिकृतपणे 60,000 नागरिक आणि सुरक्षा कर्मचारी मृत पावल्याचे याआधी म्हटले होते

No comments:

Post a Comment