Total Pageviews

Tuesday, 14 April 2015

NARENDRA MODI POPULARITY RISES ON SOCIAL MEDIA AFTER HIS FOREIGN TOUR

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा ग्राफ पुन्हा एकदा उंचावला आहे. काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या 'फेसबुक पेज'च्या लाइक्स तब्बल एक लाखाने कमी झाल्या होत्या. मात्र, विदेश दौर्यामुळे नरेंद्र मोदींची टॉप लेव्हल गाठली आहे. दरअसल, विविध मुद्यावर विरोधकांनी मोदी सरकारला कोंडीत पकडल्याने 'फेसबुक'वर नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेचा आलेख 7 एप्रिलला खाली आला होता. देशातील शेतकर्यांची स्थिती आणि भूमी अधिग्रहण कायद्याला होणार विरोध या मुद्यावरून नरेंद्र मोदी यांच्या 'फेसबुक' लाइक्स एक लाख कमी झाल्या होत्या. परंतु, नऊ एप्रिलपासून नरेंद्र मोदी फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडाच्या दौर्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर मोदीच्या 'फेसबुक पेज'च्या लाइक्स पुन्हा वाढून त्या 2 कोटी 79 लाख 21 हजारांच्या घरात पोहोचल्या आहेत. सोशल मीडियात No.1 आहेत मोदी... सोशल मीडियात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अव्वल स्थानी आहेत. मोदींचे 'ट्विटर' फॉलोअर्स 1.17 कोटी आणि फेसबुक लाइक्स 2.79 कोटी आहेत. दोन्ही एकत्र केल्यास ही संख्या चार कोटींच्या घरात जाते. देशातील कोणत्याही व्यक्तीचे ट्विटरवर इतके फॉलोअर्स नाहीत. नरेंद्र मोदींचा लोकप्रियतेचा आलेख 2013मध्ये उंचावला... सोशल मीडियात नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेचा आलेख जुलै 2013 पासून उंचावण्यास सुरवात झाली. 2003 मध्ये पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा झाली होती. 1. 23 लाख लाइक्स 13 जुलैला 2013 ला 23 लाख लाइक्स होत्या. पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा होणे, हे प्रमुख कारण आहे. 2. 1.56 कोटी लाइक्स लोकसभा निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेण्याच्या एक दिवस आधी 23 मे, 2014 ला त्यांच्या 'फेसबूक पेज'च्या लाइक्स संख्या 1.56 कोटी होती. 3. 2.36 कोटी लाइक्स महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला. 26 ऑक्टोबर, 2014 ला मोदींच्या 'फेसबूक पेज'च्या लाइक्स 2.36 कोटींवर पोहोचल्या होत्या. 4. 2.67 कोटी लाइक्स दिल्ली विधानसभा निवडणुकीच्यानंतर 7 जानेवारीला मोदींच्या फेसबुक पेजच्या लाइक्स 2.67 कोटी होत्या. 5. 2.79 कोटी लाइक्स अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी जानेवारी 2015 मध्ये भारत दौरा केला. या दौर्यात मोदींच्या महागड्या सूटचा मुद्दा चांगलाच गाजला. यामुळे मोदींच्या फेसबुक लाइक्स जवळपास 20 लाखांनी वाढल्या. 6 मार्चला मोदींच्या फेसबुक लाइक्स 2.79 कोटी होत्या. 6. 2.78 कोटी देशात सर्वत्र अवकाळी पाऊस कोसळतो आहे. परिणामी शेतकर्यांच्या शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकर्यांच्या आत्महत्येची प्रमाण आढले आहे. मोदींवर घणाघाती टीका होत आहे. त्यात भूमी अधिग्रहण विधेयकावरून विरोधकांनी मोदी सरकारला घेरले आहेत. परिणामी मोदींच्या लाइक्स 7 एप्रिलला एक लाखाने कमी झाल्या होत्या. 7. 2.79 कोटी पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन देशांच्या दौर्यावर आहेत. त्यामुळे मोदींच्या लोकप्रियता पुन्हा वाढली आहे. 13 एप्रिलला मोदींच्या 'फेसबुक लाइक्स' वाढून 2.79 कोटींवर पोहोचल्या आहेत

No comments:

Post a Comment