Total Pageviews

Monday, 10 March 2014

TWO TERRORIST KILLED IN KASHMIR MAJOR INDIAN ARMY INJURED

काश्‍मीरमध्ये दोन दहशतवादी ठार - - पीटीआय सोमवार, 10 मार्च 2014 - 03:28 PM IST Tags: terrorism, kashmir, military, national, army श्रीनगर - जम्मु काश्‍मीरमधील कुपवाडा जिल्ह्यामध्ये आज (सोमवार) झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना यमसदनी धडले. यावेळी लष्कराचा एक अधिकारीही जखमी झाला. कुपवाडा जिल्ह्यातील विलगाम या गावामध्ये दहशतवादी दडून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय रायफल्स व जम्मु काश्‍मीर पोलिस दलाच्या विशेष पथकाने संयुक्तरित्या ही कारवाई केली. "येथील एका घरामध्ये दडून बसलेल्या दहशतवाद्यांना शरण येण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र त्यास न जुमानता त्यांनी बेछूट गोळीबार सुरु केला. यानंतर या गोळीबारास उत्तर देण्यात आले. अजूनही चकमक सुरु असून राष्ट्रीय रायफल्सचा एका अधिकारी (मेजर) जखमी झाला आहे,'' असे एका ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे अद्याप कळू शकलेली नाहीत.

No comments:

Post a Comment