Total Pageviews

Tuesday 4 March 2014

SAUDI ARABIA BUYS ATOM BOMB FROM PAKISTAN

मुझफ्फर हुसेनई-मेल : े ँ४२२ं्रल्ल1945८ंँ.ूेदेशो देशीराष्ट्र तर आहेच, शिवाय सौदीचे पाकिस्तानबरोबर जवळचे संबंध आहेत. राजकीयदृष्ट्या खुल्या मैत्रीशिवाय कुटनीतीच्या पातळीवर गोपनीय संबंध असे या मैत्रीचे बरेच पैलू आहेत. पुढील काळात जर कदाचित इराणने हल्ला केलाच तर त्याला शह देण्यासाठी सौदीने पाकिस्तानकडून अणुबॉम्ब खरेदी केला. स्वत: अणुबॉम्ब तयार करण्याचा घाट घालून महासत्तांची नाराजी ओढवून घेण्यापेक्षा पाकिस्तानकडून तयार बॉम्ब विकत घेणे सौदीने सुरक्षित मानले. त्या दृष्टीने १९९९ मध्ये सौदीचे संरक्षणमंत्री प्रिन्स सुलतान बिन अब्दुल अजीज अल सऊद यांनी पाकिस्तानमधील अणुभट्टय़ांना भेट दिली होती. शिवाय २00२ मध्ये सौदीने हेही मान्य केले होते की संरक्षणविषयक सौदीने पाकिस्तानशी बोलणे केलेले आहेत. या सर्व प्राथमिक तयारीनंतरच सौदी पाकिस्तानकडून अणुबॉम्बची खरेदी केली. खरे पाहता सौदी अरेबियाकडे असा कोणी शास्त्रज्ञ नाही की त्याला अणुबॉम्ब बनवण्याचे शास्त्र अवगत आहे. इतकेच नाही, तर अण्वस्त्र तंत्रज्ञानाची माहिती असलेला कुशल असा कर्मचारीवर्गही सौदीकडे नाही. तरीही अण्वस्त्रसज्ज होण्याच्या ईर्षेपायी सौदीने नवव्या दशकात चीनशी मैत्री जोडण्याचा प्रय▪करून पाहिला होता. शिवाय दोन बॅलेस्टिक मिसाईल्सही खरेदी केले होते. पाकिस्तानने बनवलेले अणुबॉम्ब कुठे ठेवले आहेत हे जगातील काही थोड्या देशांनाच माहीत असले तरी पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे हे सार्‍या जगाला ठाऊक आहे. सौदी म्हणतो की, पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मिती कार्यक्रमाशी या बॉम्ब खरेदीचा काहीही संबंध नाही किंवा या कार्यक्रमासाठी सौदीने पैसा दिलेला नाही. अर्थात त्यात तथ्य किती हे सार्‍या जगाला माहीत आहे. पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मिती कार्यक्रमासाठी सौदीने केलेले अर्थसाहाय्य लपून राहिलेले नाही. सौदीकडे तेलाचा अफाट पैसा आहे. कोणीही पैसा टाकावा आणि शस्त्रास्त्रे करेदी करावीत, असे त्यांचे धोरण आहे. जागतिक शस्त्रास्त्र बाजारात असंख्य खरेदीदार आहेत. छोट्या-छोट्या अविकसित देशांकडूनही शस्त्रास्त्रांना भरपूर मागणी आहे. त्यामुळे पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनाही सौदीशी आणखीही लष्करी करार करावे, असे वाटते. इस्लामी देशात त्यांचे त्यामुळे एक प्रकारचे वर्चस्व तयार होईल, हा आणखी एक फायदा. पाकिस्तानी बॉम्बसाठी पैसा नक्कीच सौदीने ओतला आहे आणि वर बॉम्ब विक्रीचा व्यवहार करून पाकिस्तानने एक धाडसी पाऊल टाकले आहे, असे म्हणणे योग्य होईल. मात्र, या धाडसाची किंमत पाकिस्तानला कधीही मोजावी लागू शकते, ही बाब महत्त्वाची. 'वेळ आली तर आम्ही पाकिस्तानला साथ देऊ' असा शब्द सौदीने पाकिस्तानला दिला आहे. खरोखरच जर का अमेरिकेने लष्करी साहाय्य देण्याचे थांबवले किंवा जागतिक बँकेने कर्ज देण्याचे नाकारले तर सौदी आपले पेट्रो डॉलर्स पाकिस्तानच्या पारड्यात ओतेल, अशी ग्वाही सौदीने दिली आहे.या बॉम्बबद्दलची माहिती नाटो इंटेलिजन्सने उघड केली आहे, मात्र ती चुकीची असल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. सौदीने आण्विक कराराबाबत ठाम राहू, असे वचन दिले असले तरी इंटेलिजन्सच्या अहवालानुसार यात काहीतरी गोम आहे. सौदीने बॉम्बची किंमत चुकवली आहे. आता सौदी अमेरिकेला सांगत राहील की इराणने धोक्याची पातळी कधीच ओलांडली आहे. म्हणूनच आपल्या सुरक्षिततेसाठी सौदीने पाककडून अणुबॉम्ब खरेदी केला. पाकिस्तानचे अणुबॉम्ब निर्माते शास्त्रज्ञ अणुबॉम्बविषयीच्या तंत्रज्ञानाचा चोरटा व्यापार करण्याच्या कर्तृत्वाने जगभर बदनाम झाले. अखेर अमेरिकेने दबाव आणल्यावर पाकिस्तानने त्यांना नजरकैदेत ठेवले. आजही ते पाकिस्तानच्या नजरकैदेत आहेत. असे असले तरीही आज पाकिस्तान हा देश अण्वस्त्रांची दलाली करणारा देश म्हणूनच जगभरात कुख्यात आहे. पाश्‍चात्त्य राष्ट्रे आता उघडपणे म्हणू लागली आहेत की, अब्दुल कादीर खान यांनी अण्वस्त्रांचे चिनी तत्त्वज्ञान सौदीला आणि उत्तर कोरियाला विकले आहे. आज जगात पाकिस्तानसह कोरिया आणि इराण अण्वस्त्र तंत्रज्ञान विकत सुटले आहेत. या सगळ्या स्थितीत अमेरिकेची मात्र पंचाईत झाली आहे. पाकिस्तान आणि सौदी या राष्ट्रांनी आपल्याला न विचारता हा घाट घातलाच कसा? हा प्रश्न अमेरिकेला पडला आहे. पाकिस्तान आणि सौदी जर असे जुमानेनासे झाले, तर भविष्यात विविध देश अण्वस्त्रे खरेदी करताना अमेरिकेला नुसते पाहत बसावे लागेल. त्यांच्यावर नियंत्रण घालणे अमेरिकेला शक्य होणार नाही. भारताचा विचार केला तर इतकेच म्हणावे लागेल की, या सगळ्या प्रकारामुळे भारताची डोकेदुखी निश्‍चितच वाढणार आहे! (शब्दांकन : अवंती महाजन)बॉम्बबद्दलची माहिती नाटो इंटेलिजन्सने उघड केली आहे, मात्र ती चुकीची असल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. सौदीने आण्विक कराराबाबत ठाम राहू, असे वचन दिले असले तरी इंटेलिजन्सच्या अहवालानुसार यात काहीतरी गोम आहे. सौदीने बॉम्बची किंमत चुकवली आहे. आता सौदी अमेरिकेला सांगत राहील की इराणने धोक्याची पातळी कधीच ओलांडली आहे. म्हणूनच आपल्या सुरक्षिततेसाठी सौदीने पाककडून अणुबॉम्ब खरेदी केला.जगातील सारी मुस्लिम राष्ट्रे शिया आणि सुन्नी अशा गटांत विभागली गेली आहेत. ही गोष्ट आता सर्वविदितच आहे. सीरियामध्ये नुकत्याच झालेल्या युद्धात याच गोष्टीचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले. सौदी अरेबिया हे सुन्नी राष्ट्र असून सीरिया कट्टर शियापंथी आहे. सीरियाचे प्रमुख हाफीज असद आणि त्यांचा पुत्र बशर असद हे शिया आहेत. त्यामुळे सौदीने त्यांच्या राजवटीस कधीच मान्यता दिली नाही आणि अखेर त्या गोष्टीचा स्फोट होऊन युद्ध पेटले. या युद्धात सौदी, अमेरिका आणि इस्रायल यांचा गट सुन्नी दहशतवाद्यांच्या बाजूने उभा राहिला, तर समोर होते इराण, रशिया आणि हिजबुल हे सीरियाचे सर्मथक. या युद्धात सीरियाने रासायनिक अस्त्रांचा वापर केला आणि त्यातून अणुयुद्ध भडकते की काय, अशी भीती वाटू लागली; परंतु रशियाने मुत्सद्दीपणा दाखवला. अमेरिकेनेही आपल्या स्वार्थासाठी का होईना, संयम राखला आणि अणुयुद्धाचे ढग पांगले. थोडेसे मागे वळून पाहता असे लक्षात येते की, इराणमध्ये राजा शाह पहेलवी यांचे साम्राज्य होते. तोपर्यंत इराण अमेरिकेच्या वर्चस्वाखाली होता. मात्र, तेथे आयुतुल्ला खोमेनींचा उदय होताच इराण-अमेरिकेमध्ये फूट पडली. तिकडे इराक आणि कुवेत तसेच इराक आणि इराण यांच्या दरम्यानच्या युद्धामागेही हेच कारण होते. शिया आणि सुन्नी यांच्यामधील तेढ. सीरियाच्या युद्धात सीरियाने रासायनिक अस्त्रे वापरली आणि सौदी अरेबियाचे बिनसले. केवळ अमेरिकेच्या भरवशावर विसंबून राहून आपली सुरक्षा टिकणार नाही, हे लक्षात आल्यावर सौदीने सन्मानाने मिळालेले सुरक्षा परिषदेचे सदस्यत्वसुद्धा स्वीकारले आणि अमेरिकेबाबतची आपली नाराजी व्यक्त केली. आता आपल्या सुरक्षिततेसाठी सौदी अरेबिया इतर मार्गांची चाचपणी करू लागला. इराण आज अण्वस्त्र सज्ज देश आहे, जर इराणने अचानक हल्ला केला तर त्याच्याशी दोन हात करण्याची कुवत आपल्याकडे हवी. याची सौदीला जाणीव झाली. आणि आपल्याकडेही अणुबॉम्ब असायलाच हवा, अशी सौदीचा खात्री झाली. २00३ मध्ये इराणने अण्वस्त्र कार्यक्रम अंगिकारल्यापासून तशीही सौदीची झोप उडालेली होतीच. त्यातच इराक-इराण युद्धानंतर आपणही अण्वस्त्रधारी असावे, असे सौदीला प्रकर्षाने वाटू लागले. सद्दाम हुसेनचा मृत्यू झाला आणि त्यानंतर शिया-सुन्नी संघर्ष अधिकच भडकला. याच संघर्षाचे पुढे न जाणो मोठय़ा युद्धात परावर्तन झाले तर, अशी डोकेदुखी सौदीला सतावू लागली आणि या सर्व पार्श्‍वभूमीवर आपल्याकडे अणुबॉम्ब 'असायलाच हवा' अशी ठाम भूमिका सौदीने घेतली. अणुबॉम्ब खरेदी करण्याच्या दृष्टीने पाहता, सौदीला पाकिस्तान जवळचे राष्ट्र वाटणे, यात आश्‍चर्य काहीच नाही. पाकिस्तान इस्लामी

No comments:

Post a Comment