Total Pageviews

Sunday, 16 March 2014

HINDU TEMPLE ATTACKED IN PAKISTAN

पाकिस्तानात अल्पसंख्याक हिंदूंवर अधूनमधून होणारे हल्ले सुरूच असून शनिवारी रात्री सिंध प्रांतातील लरकाना परिसरातील एका मंदिरावर कट्टरपंथी मुस्लिमांनी हल्ला चढवला. संतप्त जमावाने मंदिराची धर्मशाळा जाळून टाकली. या घटनेमुळे लरकानामध्ये प्रचंड तणाव पसरला असून येथील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 'कराची पोस्ट' या पाकिस्तानी वृत्तपत्राने केलेल्या ट्वीटनुसार, शनिवारी रात्री काही संतप्त लोकांनी हिंदू समाजाच्या घरांना घेराव घातला. या लोकांनी हिंदूंच्या मालमत्तेवर हल्ले केले आणि जवळच असलेल्या मंदिराची धर्मशाळा जाळून टाकली. मनोरुग्ण असलेल्या एका हिंदू तरुणाने कुराणाची पाने जाळल्याचा आरोप करत हे हल्ले करण्यात आल्याचे सांगितले जाते. या हिंसाचाराची माहिती मिळताच पाकिस्तानी पोलीस व रेंजर्स घटनास्थळी धावले. पोलिसांनी अश्रूधूर सोडून व हवेत गोळीबार करून जमावाला पांगवले. परिस्थिती चिघळू नये म्हणून या भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सिंध प्रांताचे गव्हर्नर इशरतुल खान यांनी शांततेचे आवाहन केले असून मंदिरावर हल्ले करणाऱ्यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत.

No comments:

Post a Comment