http://maharashtratimes.indiatimes.com/nation/aap-kashmir-india/articleshow/31830496.cms?
देशातील प्रस्थापित व भ्रष्ट व्यवस्था बदलायला निघालेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने देशाचा नकाशाच बदलून टाकला आहे. भारताचा अविभाज्य भाग असलेले 'पाकव्याप्त काश्मीर' आम आदमी पक्षाने थेट पाकिस्तानला देऊन टाकले आहे. 'आप'च्या वेबसाइटवर तसे स्पष्टपणे दाखविण्यात आले आहे. त्यामुळे 'आप'च्या भूमिकेबाबत संशय निर्माण झाला आहे.
'आप'ला देणगी देणाऱ्यांची यादी पक्षाने वेबसाइटवर टाकली आहे. ही माहिती देणाऱ्या पेजवर 'आप'ने भारताचा नकाशाही टाकला असून त्या नकाशातून पाकव्याप्त काश्मिर काढून टाकण्यात आले आहे. या नकाशाच्या खाली @ AAP2014 ट्विटर हँडलकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यानुसार हा नकाशा भारताचा खरा नकाशा नाही. देशाच्या ज्या भागांतून 'आप'ला देणग्या मिळाल्या आहेत, तेवढेच भाग या नकाशात दाखवण्यात आल्याचा खुलासा करण्यात आला आहे. मात्र, हा खुलासा 'आप'चा अधिकृत खुलासा आहे की एखाद्या समर्थकाने हे टाकले आहे, हे कळू शकलेले नाही.
'आप'च्या देणगीदारांची यादी www.aaptrends.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे. या साइटवर विविध देशांतून 'आप'ला मिळणाऱ्या देणग्यांची यादी दिसते. त्यासाठी By Country या बटनावर क्लिक करताच संपूर्ण जगाचा नकाशा समोर येतो. याच नकाशात काश्मीर भारतापासून तोडण्यात आले आहे.
काश्मीरबाबत आम आदमी पक्षाची भूमिका नेहमीच संदिग्ध राहिली आहे. 'आप'चे एक नेते प्रशांत भूषण यांनी यापूर्वी अनेकदा काश्मीरमधून सैन्य काढून घ्या आणि काश्मिरींना भारतात राहायचे की नाही हे जाणून घेण्यासाठी सार्वमत घ्या, अशी भूमिका घेतली होती. त्यांच्या या भूमिकेला 'आप'ची मान्यता आहे की काय, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
No comments:
Post a Comment