Total Pageviews

Wednesday 12 March 2014

KASMIRI STUDENTS INDO PAK CRICKET MATCH

काश्मिरी विद्यार्थ्यांवरील राजद्रोहाचा गुन्हा एक योग्य निर्णय ३ मार्चला जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील एका कनिष्ठ न्यायालयावर अतिरेक्यांनी हल्ला केला. यात दोन पोलिस शहीद झाले. दोन नागरिक जखमी झाले .बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या 'आशिया कप' स्पर्धेमध्ये १ मार्चला भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना झाला. या सामन्यात पाकिस्तानने भारतावर विजय मिळवल्यानंतर मीरतमधील 'स्वामी विवेकानंद सुभारती विद्यापीठा'च्या ६० काश्मिरी विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणाऱ्या या विद्यार्थ्यांनी आपापल्या खोलीतून बाहेर येऊन 'पाकिस्तान जिंदाबाद!' अशा स्वरूपाच्या घोषाण दिल्या. त्यांच्या या कृत्यामुळे विद्यापीठ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या क्रिकेट सामन्यात पाकिस्तान विजयी झाल्यानंतर येथे आनंद साजरा करणाऱ्या काश्मिरी विद्यार्थ्यांवर उत्तर प्रदेश पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. मात्र रात्री हा देशद्रोहाचा गुन्हा मागे घेण्यात आला. शत्रू जिंकल्यावर उत्सव साजरे करणे हे फ़क़्त फितुरांचे लक्षण आहे. आणि या साठी कायदाची नाही तर नितीमत्तेची गरज आहे.अशाच प्रकारची घटना हरयानामध्ये गुरगाव येथे पण घडली.तिथे पण ४ काश्मिरी विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखील करण्यात आला आहे. देशामधल्या काही प्रतिक्रिया भारताच्या पराभवाबद्दल पाकिस्तानचे उदात्तीकरण करण्याच्या या प्रकारामुळे सार्या क्रिकेटप्रेमींमध्ये संतापाची लाट उठली नसती तरच नवल. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वत्र या काश्मिरी विद्याथ्यार्र्ंविरुद्ध संतापाची लाट उसळली. काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया:- ज्या भूमीने आपल्याला वाढवले,खाऊ पिऊ घातले, सन्मानाने जगू दिले त्या भूमी बद्दल असे ?? यांना तिकडे पाठवून द्या.म्हणजे तिकडे जाता क्षणीच भारतीय म्हणून गोळ्या घालतील. अतिशय भयानक प्रकार आहे .अनेक मुलांना पालक कोणती शिकवण देत असतील ,देशविरोधी भावना किती प्रमाणत देशात खदखदत आहे ,अनेक तरुणांना भारता पेक्षा पाकिस्तान जवळचा वाटत आहे. भारत जर धर्मनिरपेक्ष आहे तर पाकिस्तानला पाठींबा द्यायला काय हरकत आहे? अनेक जण कोणत्याच महाविद्यालयात शिकत नाहीत आणि पाकिस्तान सामना जिंकल्यावर जल्लोष करतात, अश्या लोकांचे काय करायचे? असे लोक महाराष्ट्रात देखील बघायला मिळतात. पाकिस्तानचा विजयोत्सव साजरा करणाऱ्या या विद्यार्थ्यांचे वर्तन राष्ट्रविरोधी असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या विद्यापीठात विविध शाखेत २०० काश्मिरी विद्यार्थी शिकत आहेत. काश्मीर खोऱ्यात पडसाद काश्मिरी विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केल्याचे पडसाद काश्मीर खोऱ्यात उमटले. या विद्यार्थ्यांवर नोंदवलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत आणि विद्यापीठ प्रशसनाने राष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी 'पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी'ने केली आहे. सत्ताधारी 'नॅशनल कॉन्फरन्स'नेही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीमुळे राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यात आलेली आहे.काश्मिरी राजकीय पक्ष दहशतवादी किंवा फ़ुटीरवाद्यांच्या विरुध्द ब्र पण काढत नाही.पण राष्ट्रद्रोही कारवायांचे नेहमी्च समर्थन करतात. काश्मिरी विद्यार्थ्यांवरील कारवाईवर पाकिस्ताननेही मतप्रदर्शन केले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांचा हा निर्णय दु:खद आणि दुर्दैवी आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये मतप्रदर्शन करण्यास वा भावना व्यक्त करण्यास विद्यार्थ्यांना मोकळीक असावी, असे पाकिस्ताने सांगितले. काश्मिरी विद्यार्थ्यांवरील राजद्रोहाचा गुन्हा आणि कारवाई योग्य की अयोग्य यावर वाद सुरू आहे. पाकिस्तानच्या विरोधात जेव्हा सामना असतो, तेव्हा निव्वळ खेळाचा विचार होत नाही; कारण पाकिस्तान हा भारताचा शत्रू आहे. या दोन देशांमध्ये फाळणीचे कटू वास्तव आहे. त्यानंतरही पाकिस्तानने भारताच्या विरोधात चार वेळा युद्ध केले आहे. काश्मीरवरील आपला दावा कायम ठेवत तेथे गेल्या अडीच दशकांपासून छुपे युद्ध छेडले आहे.काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना, दहशतवाद्यांना फूस देण्याबरोबरच त्यांना लष्करी प्रशिक्षण देत आला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या विरोधातील क्रिकेटचा सामना हा फक्त खेळापुरता मर्यादित राहत नाही. काश्मीर र्खोर्यामध्ये अनेक पाकिस्तान धार्जिणे अनेक भारतीयांना काश्मीर मधील सत्य परिस्थिती माहित नाहीं. काश्मीर र्खोर्यामध्ये(काश्मीरची २०% लोक संख्या) मध्ये अनेक पाकिस्तान धार्जिणे आहेत, तिथे लहान मुले पण भारतीय तिरंग्याला किवा राष्ट्र गीताला मानत नाहीत. ते जरी भारतात असले तरी , आजून पण तेथील लोक भारत आपला देश मानत नाहीत.१४ ऑगस्टला पाकिस्तानचा झेंडा फडकवला जातो.१५ ऑगस्टला भारतीय ध्वज फ़डकवला जात नाही. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंतविधी करता पुर्ण शहर लोट्ते, -- अमर रहे अश्या घोषणा केल्या जातात.जेंव्हा सैनिक शहिद होतात, तेंव्हा अंतविधीस कोणीच नसते.ऊलट्या जखमी सैनिकांना घेऊन जाणार्या गाड्यांवर दगड फ़ेक केली जाते.आज हे ६७ सापडले पण असे असंख्य देशद्रोही आपल्या दे्शामध्ये आहेत आणि मते कमी पडत आहेत म्हणून बंगला देशातून ४-५ कोटी घुसखोरांना आपण भारतात येण्याचे आमंत्रण दिले. काश्मिरी कुरापत आता काश्मिरच्या बाहेर पण ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे हे नारे निवडणुकीच्या उत्सवातील नव्हते, तर ते होते पाकिस्तानने भारताच्या केलेल्या पराभवाबद्दल, पाकिस्तानचा जयघोष करणारे . असे आक्षेपार्ह नारे देणारे युवक पाकिस्तानी नव्हते, तर ते होते , देशाचा अविभाज्य भाग असलेल्या जम्मू-काश्मीरमधील. या घोषणा देणार्या काश्मिरी युवकांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून उत्तरप्रदेशमधील मेरठच्या प्रशासनाने योग्य तीच कारवाई केली होती. भारताचा पराभव अशा पद्धतीने साजरा व्हावा, ही बाबच देशाच्या जखमेवर मीठ चोळणारी म्हणावी लागेल. हा सारा प्रकार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडल्याने आणि आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची भावना झाल्याने, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी जो टाहो फोडला, त्याचे मुळीच समर्थन होऊ शकत नाही. उत्तरप्रदेश सरकार एकाएकी का झुकले, यामागे मतपेटीचे राजकारण जबाबदार आहे. ओमर अब्दुल्लांना देशद्रोहाची खरी व्याख्या तरी समजते काय? अरब देशांमध्ये देशद्रोहाच्या आरोपाखाली किती कठोर शिक्षा आहेत, हे अखिलेश आणि ओमर या मुख्यमंत्रिद्वायांनी जाणूनच घ्यायला हवे. मनात आले तर दाखल केला देशद्रोहाचा गुन्हा आणि कुणी दबाव टाकला म्हणून काढून टाकले ते गुन्हे, इतके का कुचकामी कायदे झालेत आपले? कुणीही यावे, भारताविरुद्ध घोषणा द्याव्या आणि त्यांच्याविरुद्ध कारवाईच्या नावाने बोंब, इतका का लवचीक झालाय् आपला कायदा? राहिला प्रश्न काश्मिरी विद्यार्थ्यांनी दिलेल्या ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या नार्यांचा, त्यांच्यावर कायद्यानुरूप कारवाईच केली जायला हवी. खबरदार! असा इशारा देत काश्मिरी कुरापतखोरांना बेनकाब करण्याची कठोर कारवाई झाली, तरच भविष्यातील अशा घटनांपासून भारताला मुक्ती मिळू शकेल.

No comments:

Post a Comment