मद्यधुंद पोलीस अधिकार्याने बालिकेस चिरडले
नाशिकरोड। दि. 6 (प्रतिनिधी)मद्यधुंद नशेत गाडी चालविणार्या मुंबई येथील सहायक पोलीस निरीक्षकाने चिरडल्यामुळे सातवर्षीय बालिका गतप्राण झाली. या घटनेत या बालिकेचे माता-पिताही गंभीर जखमी झाले आहेत. आज सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडलेल्या या प्रकारानंतर संतप्त जमावाने सदर अधिकार्यास चोप देत वाहनांवर दगडफेक केली.
नाशिक - पुणे महामार्गावरील विजय-ममता पेट्रोल पंपाजवळ स्प्रिंग व्हॅली सोसायटीत महेश गायकर आपली पत्नी व सातवर्षीय कन्येसमवेत राहतात. कन्या शुभ्रता हिचा वाढदिवस असल्यामुळे तिचे छायाचित्र काढण्यासाठी गायकर परिवार येथील शिवाजी नगरातील दत्तमंदिर येथे गेले होते. छायाचित्र काढून पायी परतत असताना गायकर परिवाराला मागून येणार्या कारने जोरात धडक दिली. सदर सॅण्ट्रो कार (एमएच 19 एई 3199) मद्याच्या नशेत तर्र असलेले मुंबई कफ परेड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक वसंत लक्ष्मण पवार (राहाणार रजनी सुधा अपार्टमेंट, आरटीओ कॉलनी, बोधलेनगर, नाशिक) बेधुंदपणे चालवित होते. त्यांच्या गाडीने जोराची धडक दिल्यामुळे महेश व त्यांची पत्नी जखमी होऊन रस्त्याच्या कडेला फेकले गेले, तर शुभ्रतासह सॅण्ट्रो कार विद्युत खांबावर जाऊन आदळली. त्यात तिला गंभीर मार लागला. तिला तातडीने बिर्ला रुग्णालयात नेण्यात आले. तथापि प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तिला नाशिकला हलविण्यात आले. खासगी रुग्णालयातून वोक्हार्ट रुग्णालयात हलविण्यात येत असतानाच तिची प्राणज्योत मालवली. गायकर पती-प}ीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकारानंतर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. पवार यांच्यासमवेत असलेल्या महिलेने जमावाबरोबर हुज्जत घालण्याचाही प्रय} केला. त्यामुळे चिडलेल्या जमावाने पवार यांना चांगलाच चोप दिला. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पवार यांना ताब्यात घेत त्यांची बिटको रुग्णालयात वैद्यकीय चाचणी केली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. पवार यांच्यावर मद्याचा इतका प्रचंड प्रभाव होता की, उपनगर पोलीस ठाण्यात त्यांना विचारण्यात आलेल्या एकाही प्रo्नाचे उत्तर देता आले नाही. या अपघातात सॅण्ट्रो कारच्या पुढील बाजूचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. पोलिसांनी तातडीने सदर गाडी बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. रात्री या घटनेची माहिती शिवाजीनगर समजताच परिसरातील संतप्त युवकांनी विजय-ममता समोरील रामदास स्वामीमार्गे पंचवटी कृषी बाजार समितीत जाणार्या भाजीपाला वाहतूक करणार्या चार वाहनांवर दगडफेक केली.
या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक दुर्गा चौधरी करीत आहेत
No comments:
Post a Comment