असुरक्षित लाइफलाइन
रेल्वे स्थानके ही मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी आणि गुन्हे करण्यासाठी सुरक्षित ठिकाणे बनली आहेत की काय, असे वाटण्याजोग्या घटना घडत आहेत. रेल्वे प्रशासन आणि पोलिसांना त्याचे काहीही सोयरसुतक नसल्याचेच दिसते.मुंबईची रेल्वे ही मुंबईची जीवनवाहिनी मानली जाते.गेल्या काही आठवडय़ांतील घटना पाहता तिला मरणवाहिनी म्हणणे योग्य ठरेल. रेल्वे स्थानके ही मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी आणि गुन्हे करण्यासाठी सुरक्षित ठिकाणे बनली आहेत
रेल्वेच्या हद्दीत गेल्या पाच वर्षात दरोडय़ाच्या 239, बलात्काराच्या 18, चोरीच्या 12 हजार 344 घटना घडल्या आहेत. याशिवाय नोंद न झालेल्या गुन्ह्यांची संख्याही खूप मोठी असू शकेल. गुन्ह्यांचा आलेख वाढत चालला असताना रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांना मात्र त्याचे काहीही सोयरसुतक नसल्याचेच दिसते.
रेल्वे हद्दीतील वाढत्या गुन्ह्यांची दखल घेऊन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी बैठक घेऊन काही प्रश्नांची चर्चा केली. आसनगाव, विरार आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे रेल्वे पोलिस ठाणी बांधण्यासंदर्भात चर्चा झाली. एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. सीसीटीव्ही कॅमे-यांचा काही प्रकरणांमध्ये उपयोग होत असला तरी अनेक प्रकरणांमध्ये ते कुचकामी ठरल्याचे दिसून आले आहे. केवळ अत्याधुनिक साधनांवर अवलंबून राहून चालणार नाही. गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, त्या पोलिसांनी अधिक दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. ते घडणार नसेल तर कॅमेरे केवळ शोभेपुरतेच उरतील आणि मुंबईकरांची लाइफलाइन अधिक धोकादायक बनत जाईल.की काय, असे वाटण्याजोग्या घटना सतत घडत आहेत. कधी स्थानकावर किंवा ट्रेनमध्ये बॅगांमध्ये मृतदेह आढळतात, कधी ट्रेनच्या डब्यात फास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसते, कधी दारात लटकून प्रवास करणा-यांवर बाहेरून जीवघेणा हल्ला केला जातो, तर कधी गजबजलेल्या स्थानकाच्या परिसरात सामूहिक बलात्कार घडतो. मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर रेल्वे स्थानकांवरील सुरक्षेविषयी खूप चर्चा झाली, अनेक उपाययोजना सुचवण्यात आल्या, परंतु सुरक्षाव्यवस्थेमध्ये काहीही सुधारणा झाली नाही. म्हणूनच आज रेल्वेप्रवासी सुरक्षित असतील, तर ते केवळ दहशतवाद्यांची नजर पुन्हा रेल्वेकडे वळलेली नाही, म्हणून.छत्रपती शिवाजी टर्मिनस सारख्या महत्त्वाच्या स्थानकावर बसवलेल्या मेटल डिटेक्टरांचाही नीट वापर होत नाही आणि त्याकडे कोणी लक्ष देत नाही. मध्य, पश्चिम आणि हार्बर या तीन मार्गावर मिळून शंभराहून अधिक स्थानके आहेत. तेथील सुरक्षाव्यवस्थेची स्थिती पाहिली तर लाखो प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्यासाठी पोषक वातावरणच दिसते. दहशतवादी कारवाया किंवा मोठय़ा घातपातांची धास्ती सोडा-प्रवाशांना किमान सुरक्षित वाटण्यासारखी स्थिती नाही. कल्याण स्थानकाजवळ दोन दिवसांपूर्वी पहाटे घडलेली सामूहिक बलात्काराची घटना रेल्वे स्थानकांच्या परिसरातील असुरक्षिततेचे विदारक दर्शन घडवणारी आहे.कल्याण हे गजबजलेले आणि बकाल स्टेशन आहे. स्टेशनबाहेर रात्रभर पोलिसांच्या साक्षीने अनैतिक व्यवहार सुरू असतात. पहाटेपर्यंत गर्दुल्ले, वेश्या आणि तृतीयपंथीयांची जत्रा भरलेली असते. पोलिसांची जलद कृती दलाची एक व्हॅन स्टेशनबाहेर तैनात असते. परंतु, तेथे चकाटय़ा पिटत बसलेल्या पोलिसांची स्टेशन परिसरावर जरब दिसत नाही.त्यामुळेच हाकेच्या अंतरावर बलात्कारासारखी घटना घडते आणि त्यांना त्याचा पत्ताही लागत नाही. घटना घडल्यानंतर कल्याण रेल्वे पोलिस आणि महात्मा फुले पोलिस ठाणे यांनी नेहमीप्रमाणे हद्दीवरून वाद घातला. कल्याणच्या घटनेइतक्या गंभीर घटना गेल्या काही दिवसांत लोकलमध्ये, लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये आणि स्थानकांवर घडल्या आहेत. कामायनी एक्सप्रेसमध्ये महिलांच्या डब्यात झालेली वृद्धेची हत्या, चर्चगेट स्थानकात थांबलेल्या लोकलच्या डब्यात आढळलेला नालासोपा-यातील महिलेचा मृतदेह, दादर-परळदरम्यान एका हमालाने महिलेचा खून करून टाकलेला मृतदेह, सँडहर्स्ट रोड स्टेशनवर सुटकेसमध्ये आणून टाकलेला महिलेचा मृतदेह, कळवा कारशेडमध्ये लोकलच्या डब्यात सापडलेला तरुणीचा मृतदेह, लोकलमध्ये एकाने केलेली आत्महत्या या दोन महिन्यांतील घटना रेल्वे पोलिसांच्या हद्दीतील आहेत.

No comments:
Post a Comment