कलमाडी, तेलगी, हसन अली, बलवा भाग्यवान: सरकारचे जावई
VS ANNA HAJARE -INDIA AGAINST CORRUPTION & BAD GOVERNANCE STORY 97
WILL PUBLISH ARTICLES REGULARLY ON CORRUPTION / BAD GOVERNANCE IN INDIA . PASS ON TO AS MAY HONEST INDIANS AS POSSIBLE
http://brighemantmahajan.blogspot.com/व्यक्तिमहात्म्याचा अतिरेक सीबीआयने डबल धमाका उडवून दिला. राष्ट्रकुल स्पर्धेत करोडोंचा घपला करणार्या सुरेश कलमाडींना अटक केली तर स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी करूणानिधींची कन्या कानिमोझीविरुध्द आरोपपत्र दाखल केले. कलमाडींच्या प्रतापांमुळे राष्ट्रकुल स्पर्धाच धोक्यात आली होती. ती कशीबशी पार पडली. त्यालाही सहा महिने लोटले. दरम्यान राष्ट्रकुल स्पर्धा आयोजन समितीतील कलमाडींच्या काही वरिष्ठ सहकार्यांना अटक झाली. कलमाडी मात्र काही ना काही सबबी सांगत चौकशीला सामोरे जाण्याचे टाळत राहिले. सीबीआयनेसुध्दा त्यांचे ते चोचले पुरवले. आता अटक झाली तरी कलमाडींची बडदास्त राखण्यात काही कसर राहणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली जात आहे. न्यायालयाने कलमाडींना आठ दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. प्रत्यक्षात वातानुकूलित कक्षात त्यांच्या मुक्कामाची सोय करण्यात आली आहे. घरचे जेवण, अंथरूण-पांघरूण पुरवण्यात आले आहे. कलमाडींचा मोबाईल तेवढा काढून घेतला गेला, असे सांगितले जाते. कलमाडी अजून गुन्हेगार ठरलेले नाहीत, आरोपी आहेत असे समर्थन त्याबाबत सीबीआयकडून करण्यात आले. मग सगळ्या आरोपींची अशीच ठेप सीबीआय का ठेवत नाही? बर्याच आरोपींसाठी कोठडीचा काळ छळ छावण्यांसारखा ठरतो. कलमाडी, तेलगी, हसन अली, बलवा असे मोजके भाग्यवान मात्र सरकारचे जावई ठरतात. व्यक्तिपूजा हे भारताचे वैशिष्ट्यच आहे.
No comments:
Post a Comment