Total Pageviews

Wednesday, 6 April 2011

क्रिकेटपेक्षा अण्णांना पाठिंबा द्या

क्रिकेटपेक्षा अण्णांना पाठिंबा द्या वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडियाला चीअर अप करण्यासाठी खास स्टेडियममध्ये हजेरी लावणारा ' लगान ' फेम सिनेअभिनेता आमीर खान यानेही सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. क्रिकेटपेक्षा अण्णांच्या आंदोलनाला लोकांच्या पाठिंब्याची खरी गरज आहे, असे मत आमीर खानने व्यक्त केले आहे.
लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांनी राजधानी दिल्लीतील जंतरमंतर भागात आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे. आमीर खानने खास अण्णांना पत्र लिहून, त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. भ्रष्टाचाराचा मुद्दा जास्त महत्त्वाचा असून, त्याचा परिणाम आपणापैकी प्रत्येकाला भोगावा लागत आहे. त्यामुळे अण्णांच्या आंदोलनाला सर्वांनीच पाठिंबा दिला पाहिजे. वर्ल्ड कप जिंकणा-या भारतीय क्रिकेट टीमपेक्षा अण्णा हजारेंना लोकांनी पाठिंबा देणे जास्त गरजेचे आहे, अण्णा हजारे हे भारतातील तरूण पिढीसाठी आदर्श बनले आहेत. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अण्णांच्या मागण्यांकडे तत्काळ लक्ष द्यावे, अशी विनंती करणारे पत्र आमीर खानने पंतप्रधान सिंग यांनाही एप्रिल रोजी पाठवले आहे. अण्णा हजारे जी मागणी करत आहेत, ती योग्यच असल्याचे मला वाटते. देशातील भ्रष्टाचाराचा फटका कोट्यवधी सामान्य माणसांना बसत असून, मी देखील त्यापैकीच एक आहे. गेल्या काही महिन्यात तर भ्रष्टाचाराची अनेक धक्कादायक प्रकरणे उजेडात आली आहेत. किंबहुना गेल्या दशकभरात या रोगाने समाजालाच पोखरले आहे. भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशा मतापर्यंत मी आलो आहे,
अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात हळुहळु देशातील सामान्य जनता सहभागी होत आहे. वयाच्या ७२ व्या वर्षी भ्रष्टाचाराविरोधातील लढ्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देण्याची तयारी दर्शवणा-या अण्णांच्या समर्थकांपैकी मीही एक आहे, असेही त्याने पत्रात म्हटले आहे

No comments:

Post a Comment